Ladki Bahin Yojana New Update
महाराष्ट्र राज्य मध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणाऱ्या महिलांना डिसेंबरचा सहावा हप्ता हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ, शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पंधराशे रुपये देऊन त्यांचे वचन पूर्ण केले आहे. आत्तापर्यंत या योजनेमध्ये 2 कोटी 40 लाख पेक्षा जास्त महिला पात्र आहेत. या योजनेमध्ये आतापर्यंत खूप महिला पात्र झाल्या आहेत. लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांसाठी शासनाने पात्रता निकष लावले आहेत. आता लाडकी बहीण लाभार्थ्यांची छाननी सुरू होणार आहे व नियमबाह्य अर्ज केलेल्या महिलांना या योजनेमध्ये अपात्र करण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर जाणूया सविस्तरपणे.!
महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी मागच्या मुलाखतीमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या महिलांच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे तसेच ज्यांच्याकडे चारचाकी गाडी आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्याबरोबरच त्यांनी हे हि सांगितले कि अपात्र महिलेंकडून रक्कम मागे घेणार नाही.तसेच ज्या कुटुंबाला नमो किसान योजनेचा लाभ मिळतो त्यांना जास्तीत जास्त 1500 रुपये मिळणार आहे.स्थानिक प्रशानाकडून मिळालेल्या माहिती नुसार शासन पुढची भूमिका घेणार आहे असे देखील त्यांनी सांगितले.ज्या महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी नसून लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतात त्यांची छाननी करून त्यांची योजना रद्द करण्यात येणार आहे.
हे देखील वाचा! आत्ता राज्यातील गरीब कुटुंबांना मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचार
लाडकी बहीण योजनेचा 6 वा हप्ता जमा: Ladki Bahin Yojana New Update
लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या लाभार्थी महिलांच्या खात्यात हिवाळी अधिवेशनानंतर शासनाने पंधराशे रुपये जमा केले आहे .आत्तापर्यंत या योजनेचा महिलांना खूप फायदा झालेला आहे. त्यामध्ये दोन कोटी चाळीस लाख पात्र महिला आहेत. जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या योजनेतून राज्यामधून 2 कोटी 63 लाख अर्ज जमा झाले होते. त्यामधून 2 कोटी 47 लाख अर्ज पात्र झाले आहेत .त्यात 12 लाख भगिनींचे बँक खाते आधार नंबर शिल्लक नसल्याने त्यांना पैसे आले नाही. ज्या महिलांनी प्रोसेस पूर्ण केली,त्यांना डिसेंबर मध्ये वाढीव हप्ता देण्यात आला आहे.
या महिला ठरणार अपात्र | Ladki Bahin Yojana New Update
या योजनेअंतर्गत पात्र झालेल्या महिलांची आता छाननी होणार आहे .कोणत्याही लाभार्थी महिला संदर्भात तक्रार प्राप्त झाली तर तिच्या अर्जाची छाननी करून त्यांनी जर नियमाविरुद्ध अर्ज केले असतील तर त्यांना अपात्र करण्याचा निर्णय महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केला आहे.
तक्रारी शिवाय आम्ही कोणत्याच अर्जाची छाननी करणार नाही असे अदिती तटकरे म्हणल्या.
अडीच लाखापेक्षा ज्या महिलांची उत्पन्न जास्त असेल तर त्या या योजनेत पात्र ठरणार नाही .ज्यांच्या घरी चार चाकी गाडी असेल त्या महिला पण अपात्र ठरतील. ज्यांचा आंतरजातीय विवाह झाला आहे त्या सुद्धा अपात्र ठरतील .ज्यांचे आधार कार्ड व बँक खात्यावर वेगवेगळे नाव असेल त्या महिला सुद्धा पात्र ठरतील ,असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या.
या प्रकारच्या बहिणींच्या अर्जाची चौकशी होणार!
1. त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे
2. कुटुंबातला व्यक्ती सरकारी नोकरीत आहे .
3. एकच महिलेने दोन अर्ज केले असतील तर
4. कुटुंबातला कोणी आमदार खासदार असेल तर
5. कुटुंबात चार चाकी वाहन असेल तर
6. आधार व बँक खात्यावरील नाव वेगवेगळे असेल तर
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :-
- लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
- महिलेचे आधार कार्ड.
- महिलांच्या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्माच्या दाखला, रेशन कार्ड, मतदान कार्ड .
- सक्षम अधिकाऱ्याकडून दिलेल्या कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, राशन कार्ड.
- बँकेच्या पासबुकची झेरॉक्स कॉपी.
- फोटो KYC करीता.
- रेशन कार्ड .
- लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्थीचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.
हे देखील वाचा! आत्ता राज्यातील गरीब कुटुंबांना मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचार
लाडकी बहिण योजनेसाठी कोणत्या महिला असणार अपात्र :-
- ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे.
- ज्या महिला कुटुंबातील सदस्य income tax भरतात.
- कुटुंबातील सदस्य सरकारी कंत्राटी कामगार म्हणून काम करणारे, भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीनंतर वेतन घेतात.
- ज्या महिला सरकारी नोकरी करतात.
- याआधी लाभार्थी महिलेने सरकारी योजनांचा लाभ घेतला असेल.
ज्या कुटुंबातील सदस्य माजी आमदार- खासदार आहे. - ज्या कुटुंबातील सदस्यांकडे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे.
- ज्याच्याकडे चार चाकी वाहन (ट्रॅक्टर सोडून) आहे.
हे देखील वाचा! आत्ता राज्यातील गरीब कुटुंबांना मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचार
FAQ:-
लाडकी बहीण योजना यादीत नाव कसे शोधावे?
- प्रथम ladakibahin.maharashtra.gov.in वेबसाइटवर जा.
- वेबसाइटच्या होमपेजवर “निवडलेल्या अर्जदारांची यादी” या बटणावर क्लिक करा.
- मंजूर लाभार्थ्यांची यादी नवीन पानावर उघडेल.
- जर तुम्ही योजनेसाठी निवडले असाल तर तुमचे नाव त्या यादीत दिसेल.
- “डाउनलोड” बटणावर क्लिक करून यादी जतन करा.
लाडकी बहीण योजना पैसे आले कसे बघायचे?
लाडकी बहीण योजेनेत जर तुम्ही अर्जात भरलेले बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे, तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही, याची खात्री करून घ्या. तसेच जर बँक खाते लिंक असेल तर ऑनलाईन बँकींग अॅपद्वारे तुम्ही खात्यात पैसे आले आहेत की नाही हे चेक करू शकता.लाडकी बहीणयोजनेमध्ये तुम्ही अर्जात दिलेले बँक खाते जर आधारकार्ड ला जोडलेले असेल तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे.त्यासाठी तुमचे बँक खाते आधारकार्डशी लिंक आहे की नाही याची खात्री नक्की करून घ्या.त्याबरोबरच तुम्ही mobile बँकिंग द्वारे देखील पैसे आले की चेक करू शकता.
लाडकी बहिन योजनेची रक्कम जमा झाली की नाही हे कसे तपासायचे?
- ज्या अर्जदारांनी योजनेसाठी अर्ज केला आहे ते अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
- होमपेजवर “payment status” पर्यायाखाली “DBT status tracker” वर क्लिक करा.
- श्रेणी, DBT स्थिती निवडा, नंतर बँक, अर्ज आयडी, लाभार्थी कोड, खाते क्रमांक टाकून पडताळणी करा.