APAAR ID For Student :
नवीन शिक्षण नीतीअंतर्गत APAAR ID For Student कार्ड आणले आहे. देशभरात ते विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता आधार कार्ड प्रमाणेच प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 12 अंकी अपार कार्ड बनवले जाईल. यामध्ये त्यांच्या शैक्षणिक तपशील आणि इतर नोंदी असतील. हे वन नेशन ,वन स्टुडन्ट आयडी म्हणून वापरले जाऊ शकते.
अपार आयडी कार्ड ही अशी प्रणाली आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना 12 अंकी क्रमांक दिला जातो. त्याच्या मदतीने भविष्यात त्यांची शैक्षणिक प्रगती होईल. हे कार्ड प्राथमिक ते माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बनवले जाईल. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तपशील आणि इतर नोंदी केल्या जातील.
आपण आयडी कार्ड द्वारे शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा तपशील, त्यांच्या गुणपत्रिका इत्यादी संबंधित माहिती अपार आयडी मध्ये जतन केले जाईल. Digilocker च्या मदतीने सर्व शैक्षणिक नोंदी पाहता येतील. याप्रमाणे गळतीचे प्रमाण कमी होऊ शकते आणि अशा मुलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेता येईल. या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या शाळांमधून गळतीचे प्रमाण कमी होऊ शकते आणि अशा मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यात खूप मोठी मदत होईल.
APAAR ID चे पूर्ण नाव Automatic Permanent Academic Account Registry ऑटोमेटेड परपोरेंट अकॅडमी अकाउंट रजिस्ट्री आहे.
हे कार्ड एका प्रकारचे रेकॉर्ड आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे सर्व Academic रेकॉर्ड व त्यांना मिळालेले अवार्ड्स पाहता येईल. हे सरकारी आणि खाजगी दोन्ही ठिकाणी बनेल. परंतु आई-वडिलांच्या परवानगीशिवाय Apaar Id बनू शकत नाही.
APAAR ID कार्ड मध्ये विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड सेव राहतात. त्याचबरोबर काही पर्सनल इन्फॉर्मेशन जसे त्यांची हेल्थ डिटेल, वजन, हाईट इत्यादी विषयी माहिती असते. त्यामुळे अपार आयडी बनवण्यासाठी त्यांच्या आई वडिलांची आवश्यकता असते. यातून आई-वडिलांना माहीत असते की आपण आयडी मध्ये मुलांची माहिती सेव आहे. आई-वडिलांच्या सहमतीसाठी एक कॉन्सन्ट फॉर्म भरावा लागतो.
APAAR ID For Student चा कन्सेंट फॉर्म कसा भरावा?
- सर्वात आधी तुम्हाला अपार आयडीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- तिथे resources सेक्शन मध्ये जाऊन अपार पेरंटल कन्सेंट फॉर्म डाऊनलोड करावा लागेल.
- त्यामध्ये सर्व माहिती भरल्यानंतर तो फॉर्म विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये जमा करावा लागेल.
- सरकारी वेबसाईटनुसार आत्तापर्यंत 31 करोड पेक्षा अधिक मुलांनी अपरायडी साठी रजिस्ट्रेशन केले आहे.
हे पण वाचा : GATE 2026 ECE अभ्यासक्रम : नवीन मूल्याची माहिती आणि परीक्षा नमुना
APAAR ID For Student कशी बनवावी?
- शिक्षण मंत्रालय अंतर्गत येणारी वेबसाईट academic Bank of credit (ABC ) च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- तिथे टॉप राईट कॉर्नरला my account या सेक्शन वर क्लिक करा आणि स्टुडन्ट पर्याय निवडा.
- त्यानंतर digilocker व रजिस्टर करा तिथे रजिस्ट्रेशन केल्यानंतर विद्यार्थ्याला तुमचा आधार नंबर आणि इतर माहिती टाकावी लागेल.
- Digilocker मध्ये लॉगिन केल्यानंतर केवायसी व्हेरिफिकेशन साठी आधार डिटेल्स द्यावी लागेल.
- इतर आवश्यक माहिती जसे, अकॅडमी माहिती स्कूलचे नाव द्यावे लागेल. सबमिट केल्यानंतर आपण आयडी तयार होईल.
APAAR ID For Student डाऊनलोड कसे करावे?
- तुम्हाला academic Bank of credit च्या वेबसाईटवर जावे लागेल आणि लॉगिन करावे लागेल.
- डॅशबोर्ड मध्ये Apaar card download पर्यायावर क्लिक करावे.
- आयडीला डाऊनलोड किंवा प्रिंट करण्याचा ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करा.
- अपार आयडी सर्वांसाठी बनवणे अनिवार्य नाही आहे. बरेच सरकार त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी अपर आयडी बनवण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. हे कार्ड बनवण्याची काही फायदे आहेत, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड डिजिटल पद्धतीने स्टोर राहतात व विद्यार्थ्यांना नवीन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी सुविधा होते. कारण या कार्डमध्ये विद्यार्थ्यांची पूर्ण शैक्षणिक रेकॉर्ड असतील.
APAAR ID For Student अर्ज कोण करू शकतो?
अपार आयडी तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय कमीत कमी 5 वर्ष असावे लागते. यापेक्षा कमी वय असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अपार आयडी तयार केले जाणार नाही. अपार आयडी तयार करण्यासाठी विद्यार्थ्याला कोणत्यातरी मान्यता प्राप्त शाळा, कॉलेज किंवा विद्यापीठात प्रवेश घेतलेला असावा लागतो त्याचबरोबर अर्जदार भारतीय नागरिक असावा लागतो.
APAAR ID For Student कार्ड चा फायदा:
- अपार आयडी कार्ड विद्यार्थ्यांसाठी आजीवन आयडी आहे. जे त्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रगती आणि कामगिरीचा सहज मागोवा घेण्यास मदत करते. त्याचबरोबर त्यांची माहिती सुरक्षित ठेवते.
- विद्यार्थी उच्च शिक्षण किंवा विद्यापीठ प्रवेश परीक्षांसाठी त्यांचा अपार आयडी क्रेडिट स्कोर वापरू शकतात.
- विद्यार्थ्याला त्यांचे शैक्षणिक कागदपत्रे जसे की बक्षीस, पदवी, शिष्यवृत्ती आणि इतर क्रेडिट्स डिजिटल ट्रान्सफर किंवा सुरक्षितपणे शेअर करण्याची परवानगी देते.
- हे विद्यार्थ्यांच्या गळतीचा मागवा घेण्यास मदत करते जेणेकरून सरकार त्यांना शिक्षणात परत आणण्यासाठी काम करू शकेल.
- विद्यार्थ्यांना त्यांच्या आयडीचा वापर करून सरकारी योजना मधून थेट लाभ मिळू शकतो.
- अनेक फायद्यांबरोबर शिक्षण मंत्रालय हे सुनिश्चित करते की अपार कार्डवर संग्रहित सर्व माहिती सुरक्षित राहील, ज्यामुळे गैरवापराचा धोका कमी होईल.
- हा डेटा फक्त शैक्षणिक उद्देशासाठी वापरला जाईल.