Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana:
Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana ही योजना 2018-19 पासून राज्यात नव्याने सुरू केलेली तसेच शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चे लाभार्थी किंवा शेतकरी फळबाग लागवड या बाबीचा लाभ घेऊ शकत नाही अशा सर्व शेतकरी व लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. ही योजना शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत राबवले जाते.
Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana लाभ कसा घ्यावा हे अजून तुम्हाला माहीत नसेल किंवा आपण घेतला नसेल तर आज आपण या आर्टिकल मध्ये ही योजना काय आहे, या योजनेपासून किती अनुदान मिळते, पात्रता निकष काय आहे, कोणकोणते कागदपत्रे लागतील आणि अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
साधारणता आपल्या राज्यात प्रामुख्याने शेतकरी हे पारंपारिक पद्धतीने सोयाबीन, तूर, कापूस यासारखेच पीके जास्त घेतात. परंतु यामुळे त्यांना हवे तसे उत्पन्न किंवा इन्कम होत नाही आणि शेतकरी कर्ज खाली दबत जातो. शेतकरी हा फळबाग शेतीकडे वळायला हवा त्यामुळे त्यांचे उत्पन्न देखील वाढेल व राज्यात शेतकरी समृद्ध वरील हेच ध्येय ठेवून सरकार ही योजना राबवत आहे.
Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana उद्देश:
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून पीक आणि पशुधन याबरोबरच सहभागीच्या रूपाने शेतकऱ्यांना उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा उत्पादनात वाढ करण्यास आणि उत्पन्न दुप्पट करण्यास मदत होणार आहे.
- प्रक्रिया उद्योगांसाठी आवश्यक कच्च्या मालाच्या उत्पादनात वाढ करणे.
- त्याचबरोबर पीक रचनेत बदल घडवून आणणे.
देशाचा आणि राज्याचा विकास हा पूर्णपणे शेतकऱ्यावर अवलंबून आहे. कारण आपल्या भारत देशामध्ये बहुसंख्य नागरिक शेतकरी आहेत त्यामुळे शेतकऱ्याचा विकास होत असणे आवश्यक आहे. हेच उद्दिष्ट समोर ठेवून सरकार शेतकरी बांधवांसाठी दरवर्षी नवनवीन योजना घेऊन येत आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि त्याचा सर्वांगीण आर्थिक विकास होईल.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही अतिशय वेगळी योजना सरकारने शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीसाठी सुरू केली आहे. कारण आत्तापर्यंत सर्व शेतकरी हे पारंपारिक पीक घेत आलेली आहे त्यामुळे जणू त्यांच्या जमिनी हा निकस झाले आहेत.
Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana लाभ:
या योजनेमार्फत शेतकऱ्याला शंभर टक्के अनुदान एकूण ५३५६१ रुपये सरकार देणार आहे पण ते कशाप्रकारे आपण खालील प्रमाणे बघू:
योजनेसाठी पात्र झालेल्या अर्जदारास/ शेतकऱ्यास सरकार प्रथम वर्षी 50 टक्के द्वितीय वर्षी 30% आणि तृतीय वर्ष 20% असे टप्प्याटप्प्याने अनुदान देणार आहे.
पहिल्या वर्षी अनुदान मिळाल्यानंतर शेतकरी जो फळबाग लावेल त्याची तो व्यवस्थित काळजी घेत असेल तरच त्याला दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाची बाकीचे अनुदान दिले जाणार आहे. जसे की जर कोरडवाहू झाडे असतील तर त्याची किमान 80 टक्के झाडे बागायती असतील.
Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana पात्रता:
अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा शेतकरी असणे गरजेचे आहे.
पात्र अर्जदाराला योजनेचा लाभ मिळालेल्या फळबागेसाठी शेतामध्ये ठिबक सिंचन असणे आवश्यक आहे.
ज्या दर्जेदार शेतकऱ्यांचे कुटुंब हे संपूर्णपणे शेतीवरच आधारित आहे त्याला योजनेच्या लाभांमध्ये प्रथम प्राधान्य देणार आहे.
योजनेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे शेती स्वतःच्या नावाने असलेला सातबारा देखील असावा.
जर शेतीमध्ये इतर हिसे असतील तर पुढील हिस्सेदाराचे संमती पत्रक असणे गरजेचे आहे.
पात्र शेतकऱ्याने जर याआधी देखील सरकारच्या इतर कुठल्या योजनेचा लाभ घेऊन फळबाग लावली असेल तर तेवढे क्षेत्र सोडून बाकी राहिलेल्या जागेसाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे.
लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे :
- आधार कार्ड
- सातबारा आणि आठ अ
- जातीचा दाखला
- स्वयं हमीपत्र
- इतर हिस्सेदार असतील तर त्यांचे संमती पत्र
Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana अशाप्रकारे अर्ज प्रक्रिया करा?
महाराष्ट्र शासनाच्या Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana चा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी आपले कागदपत्रे गोळा करणे महत्त्वाचे आहे.
- सरकारने प्रसारित केलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. त्यानंतर apply online यावर क्लिक करा.
- सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्यापुढे एक डॅशबोर्ड
तयार होईल. - त्यानंतर तुम्हाला Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana या पर्यावर क्लिक करायचे आहे.
- तुमच्या पुढे योजनेचा अर्ज येईल.
- त्यामध्ये सर्व आपले वैयक्तिक माहिती भरायची आहे.
- माहिती भरून झाल्यावर काही कागदपत्रे देखील अपलोड करावी लागतील.
- सर्व माहिती एकदा व्यवस्थित चेक करा आणि सबमिट बटन वर क्लिक करा.
- अशाप्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही या योजनेचा अर्ज भरू शकता.
FAQs वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये किती अनुदान मिळणार आहे?
फळबाग लागवडीसाठी आणि त्या फळबागेच्या सिंचन सोयीसाठी सरकारकडून 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
2. फळबाग लागवड योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?
तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये फळबाग लागवड करायची आहे व त्यासाठी सरकारी योजनेमार्फत अनुदान मिळवायचे असेल तर महाडीबीटी या पोर्टलवर जाऊन तुम्ही योजनेचा अर्ज करू शकता.
3. या योजनेमध्ये किती रुपये अनुदान देण्यात येते?
शासनाने जाहीर केलेल्या अधिकृत जीआर नुसार पात्र शेतकऱ्याला फळबाग लागवडीसाठी 53561 रुपयांची अनुदान दिले जाते.