mpsc group b exam उमेदवार पात्रता:-
जर तुम्ही पण एमपीएससी गट ब आणि क स्पर्धा परीक्षांसाठी अर्ज भरण्याचा विचार करत असाल तर त्याआधी तुम्हाला या परीक्षेचा पात्रता निकष बघावा लागेल.
MPSC (Maharashtra Public Service Commission) म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब आणि क पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी विशेष पात्रता आवश्यक करते. यामुळे उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर महत्त्वपूर्ण अटींचा समावेश आहे. या परीक्षेमध्ये केवळ पात्र विद्यार्थीच भरती प्रक्रियेत पुढे जातात.
परीक्षा कोण घेते | महाराष्ट्र लोकसेवा आयोग |
पद | गट व आणि क |
वयोमर्यादा / mpsc eligibility criteria 2025 | 19 ते 38 |
उमेदवार | महाराष्ट्राचा रहिवासी |
प्रयत्नांची संख्या | मर्यादा नाही |
वेबसाईट | mpsc.gov.in |
एमपीएससी परीक्षा गट व आणि क या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी उमेदवाराकडे मान्यता असलेल्या विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवाराची पदवी कला विज्ञान वाणिज्य किंवा इतर कोणत्याही शाखेतील असेल तर तो अर्जासाठी पात्र आहे. याव्यतिरिक्त जर उमेदवार पदवीच्या शेवटच्या वर्षात जरी असला तरी तो या पदासाठी अर्ज करू शकतो. याशिवाय उमेदवाराला मराठी भाषा येणे आवश्यक आहे, कारण ही परीक्षा मराठी भाषेतच होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे २०२५ मधील विविध परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हे जाहीर केलेले वेळापत्रक अंदाजित वेळापत्रक असणार आहे. यामध्ये काही बदलही होऊ शकतात. या अंदाजित वेळापत्रकानुसार २०२५ सालची महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा २८ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. याची जाहिरात जानेवारी २०२५ मध्ये येण्याची शक्यता आहे. तर या परीक्षेचा निकाल २०२६ च्या जानेवारी महिन्यात लागणार आहे.
९ नोव्हेंबरला गट-ब परीक्षा होणार
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या पदाची पूर्व परीक्षा १२ ऑक्टोबर २०२५ रोजी होईल. तर या पूर्व परीक्षेचा निकाल जानेवारी २०२६ मध्ये लागेल आणि मुख्य परीक्षेचे दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. त्यानंतर महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ या परीक्षेद्वारे सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, दुय्यम निबंधक (श्रेणी एक)/ मुद्रांक निरीक्षक ही पदे भरली जातील. या पदांसाठीची पूर्व परीक्षा ९ नोव्हेंबर २०२५ रोजी होईल. याचा निकाल फेब्रुवारी २०२६ मध्ये जाहीर करण्यात येईल. तसेच मुख्य परीक्षांच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील.
mpsc group b exam वयोमर्यादा:-
एमपीएससी गट ब आणि क या स्पर्धा परीक्षांमध्ये वयोमर्यादा खूप महत्त्वाचे असते. उमेदवाराचे वय कमीत कमी 19 व जास्तीत जास्त 38 वर्ष पाहिजे. एमपीएससी विशिष्ट श्रेणीमधील उमेदवारांना वयाची सवलत देते. खालील तक्त्यामध्ये गट ब आणि क उमेदवारांसाठी वयाच्या तरतुदी आहेत.
श्रेणी वय
SC/ST/OBC 5 वर्षांपर्यंत अनाथ 5 वर्षांपर्यंत
माजी सैनिक 5 वर्षांपर्यंत
पात्र खेळाडू 5 वर्षापर्यंत
अपंग व्यक्ती 7 वर्षांपर्यंत
mpsc group b exam number of attempt: किती वेळा परीक्षा देऊ शकतो?
उमेदवार परीक्षा किती वेळा देऊ शकतो हे त्याच्या श्रेणीवर अवलंबून आहे. सामान्य श्रेणीतील उमेदवार 6 वेळा परीक्षेचा प्रयत्न करू शकतात. ओबीसी मधील उमेदवार नऊ वेळा प्रयत्न करू शकतात. उमेदवारांच्या प्रयत्नांच्या मर्यादा नाही जोपर्यंत त्यांच्या वयाची अट संपत नाही तोपर्यंत ते उमेदवार प्रयत्न करू शकतात.
mpsc group b exam राष्ट्रीयत्व
या परीक्षेमध्ये भाग घेण्यासाठी उमेदवार हा भारताचा नागरिक असावा त्यासाठी उमेदवाराने त्याचे प्रमाणपत्र जमा करावे.
mpsc group b exam पात्रता
2025 साठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पात्रता आवश्यकता स्पष्टपणे सांगितले आहेत. अर्ज करण्यापूर्वी तुम्ही शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, राष्ट्रीयत्व आणि इतर निकषांची पूर्तता करत असल्याची खात्री करा. या आवश्यकता आधी चेक केल्याने तुमचा वेळ वाचेल जर तुम्ही पात्रता अटी पूर्ण करत असाल तर तुम्ही गट व आणि क या स्पर्धा परीक्षांचा अर्ज भरण्यास पात्र आहात. अधिक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
FAQ-
1. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी कमीत कमी किती शिक्षण पाहिजे?
उमेदवाराने कोणत्याही शाखेतून व शासकीय विद्यापीठातून पदवी घेतलेली पाहिजे किंवा जर उमेदवार शेवटच्या वर्षात जरी असला तरी त्याला परीक्षेला अर्ज भरता येईल.
2.mpsc group b exam date 2025 या पदांसाठी उमेदवाराची वय किती असावे?
उमेदवाराचे वय 19 आणि 38 च्या दरम्यान असावे.
3. राखीव प्रवर्गासाठी वयात काही सूट आहे का?
हो, राखीव प्रवर्गासाठी वयात सुट आहे त्यात एससी/एसटी/ओबीसी या प्रवर्गासाठी पाच वर्षांपर्यंत जे अनाथ आणि माजी सैनिक आहे त्यांना पण पाच वर्षापर्यंत आणि अपंग व्यक्तीला सात वर्षांपर्यंत सूट आहे.
4.mpsc group b exam date 2025 परीक्षेसाठी उमेदवार किती वेळा प्रयत्न करू शकतो?
सामान्य उमेदवार सहा वेळा ओबीसी उमेदवार नऊ वेळा आणि एससी एसटी यांना कोणतीच मर्यादा नाही.
5. एमपीएससी या परीक्षेसाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे का?
होय.
6. एमपीएससी गट ब आणि परीक्षेसाठी इतर राज्यातील उमेदवार अर्ज करू शकतात का?
केवळ महाराष्ट्रातील रहिवासी वयाच्या सवलतीसाठी पात्र आहेत. इतर राज्यांमधील उमेदवारांचा सर्वसाधारण प्रवर्गात विचार केला जाईल.