Vihir Anudan Yojana Maharashtra 2025 ! नवीन विहिरीसाठी पाच लाख रुपये अनुदान! लवकरच अर्ज करा!
Vihir Anudan Yojana Maharashtra 2025: नमस्कार मित्रांनो, विहीर योजना 2025 महाराष्ट्र या योजनेअंतर्गत नवीन विहिरीसाठी पाच लाख रुपये अनुदान कसे मिळवायचे. जाणून घ्या! मनरेगा (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act) योजना ही भारत सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत गावातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. तसेच ग्रामीण भागातील पाणी व्यवस्थापन करण्याचे उद्दिष्टे आहे. थोडक्यात ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचे जीवनमान बदलण्याचे या योजने मागचे धोरण आहे. या योजनेमध्ये लोकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे कामे रोजगारासाठी उपलब्ध केले जातात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांसाठी नवीन विहिरीसाठी पाच लाख रुपयांचे अनुदान पण दिले जाते. जर तुमच्याकडे छोटीशी जागा आहे आणि तुम्हाला त्यात विहीर खोदायची असेल तर तुम्ही या योजनेद्वारे लाभ घेऊ शकता. तर आपण जाणून घेऊ, या अनुदानाचा लाभ कसा मिळवायचा.
Vihir Anudan Yojana Maharashtra 2025 Eligibility(विहीर योजना 2025 महाराष्ट्र पात्रता):-
- या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच घेता येईल.
- अर्जदार व्यक्ती हा शेतकरी असला पाहिजे आणि त्याच्याजवळ शेती करण्यासाठी योग्य जमीन असायला हवी.
- सरकारी विहीर योजनेसाठी अर्ज करताना आधीपासून शेतामध्ये विहीर नसावी.
- अर्जदाराचे राष्ट्रीय बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे. तसेच बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
- अर्जदार शेतकऱ्याकडे कमीत कमी ०.४० हेक्टर म्हणजे (1 एकर ) इतकी जमीन असणे आवश्यक आहे.
- शेतामध्ये ज्या ठिकाणी विहिरीचे खोदकाम करायचे आहे त्या ठिकाणापासून ५०० मीटर पर्यंत दुसरी या योजनेतून घेतलेली विहीर नसावी.
- अर्जदार शेतकऱ्याची जमीन ही विहीर खोदण्यासाठी तांत्रिक दृष्टीने पात्र असणे आवश्यक असणार आहे. ( यासाठी शाखा अभियंता किंवा उप अभियंता यांनी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे अधिकारी यांच्यासोबत जागेची पाहणी करून त्याचा अहवाल घेण्यात येईल त्याला आपण Geo-tagging देखील म्हणतो.
- अर्जदार व्यक्तीच्या 7/12 उताऱ्यावर यापूर्वी विहिरींची नोंद नसली पाहिजे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
- समजा अर्जदार शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये सह हिस्सेदार असतील तर अशा वेळी अर्जदाराला अर्जासोबत त्या हिस्सेदारांचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
नवीन विहिरी साठी अर्ज कसा करावा?
अर्जदार ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो.
1. ऑनलाईन पद्धत:-
मोबाईलवर किंवा कम्प्युटरद्वारे तुम्ही दहा ते पंधरा मिनिटात अर्ज भरू शकता.
2. ऑफलाइन पद्धत:-
यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीकडे जाऊन अर्ज करावा लागेल.
3. शासन निर्णय Download करा.
येथे तुम्ही शासन निर्णय बघू शकता.
हे पण वाचा ! तरुणांसाठी अत्यंत महत्वाची बातमी मिळणार 25 लाखांपर्यंत कर्ज
तर आपण जाणून घेऊ ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा. ही प्रक्रिया खूप सोपी आहे. तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकता.
Vihir Anudan Yojana Maharashtra 2025 ऑनलाइन प्रक्रिया:
विहीर योजना 2025 महाराष्ट्र या योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला (mahaEGS) या ॲप्लिकेशनची आवश्यकता आहे.
1. mahaEGS एप्लीकेशन डाउनलोड करा. सर्वात आधी अर्जदाराने मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोअर वर जाऊन mahaEGS हे ॲप्लिकेशन शोधा. शोधल्यानंतर ते इन्स्टॉल करा.
2. ॲप ओपन करा :
एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला दोन लॉगिन ऑप्शन दिसतील.
- विभाग लॉगिन
- लाभार्थी लॉगिन
त्यात तुम्हाला लाभार्थी लॉगिन सिलेक्ट करायचा आहे.
3. विहीर अर्ज हा पर्याय निवडा: लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तीन पर्याय दिसतील .
- बागायती लागवड अर्ज
- विहीर अर्ज
- अर्जाची स्थिती
इथे विहीर अर्ज सिलेक्ट करा.
हे पण वाचा ! तरुणांसाठी अत्यंत महत्वाची बातमी मिळणार 25 लाखांपर्यंत कर्ज
4. आता फॉर्म भरा:
फॉर्म मध्ये खाली माहिती भरायची आहे.
सर्वात आधी अर्जदाराने आपले संपूर्ण नाव टाकावे व मोबाईल नंबर टाकावा. तुमची जमीन ज्या ठिकाणी आहे ते जिल्हा, तालुका व गाव सिलेक्ट करा. तुमच्याकडे जर मनरेगा जॉब कार्ड असेल तर तो नंबर तिथे टाका. जर तुमच्याकडे जॉब कार्ड नसेल किंवा हरवले असेल तर तुम्ही ते ऑनलाईन डाउनलोड करू शकता. त्यानंतर तुमची वर्गवारी निवडा. अर्जदाराच्या नावावर पाच एकर जमीन असणे आवश्यक आहे. तुमचे क्षेत्र टाका. तुमच्या जमिनीचा गट नंबर टाका. तुमच्या जमिनीचे सातबारा इथे अपलोड करा.
5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा:
अर्जदाराने मनरेगा जॉब कार्ड आणि 7/12, 8/A ही कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात अपलोड करा.
6. संपूर्ण फॉर्म वाचून सबमिट करा:
फॉर्म भरल्यावर तुम्हाला संमती पत्र वाचण्यास मिळेल. त्यानंतर अर्ज सबमिट करा. तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो ओटीपी प्रविष्ट करा.
7. अर्जाची स्थिती तपासा:
अर्ज भरल्यानंतर अर्जाची स्थिती बघू शकता. अर्जाची स्थिती प्रलंबित किंवा स्वीकृत अशी दिसेल.
विषय तपशील
योजनेचे नाव | मनरेगा योजना |
---|---|
उद्दिष्टे | ग्रामीण क्षेत्रातील तरुण तरुणींना रोजगार देणे |
अनुदान | नवीन विहिरीसाठी पाच लाख रुपये देणे |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन व ऑफलाईन |
अर्जासाठी एप्लीकेशन | mahaEGS |
कागदपत्रे | मनरेगा जॉबकार्ड, सातबारा, आठ ,जमिनीचा गट क्रमांक, प्रस्तावित मजुरांचा जॉब कार्डक्रमांक |
क्षेत्र | अर्जदाराच्या नावावर 5 एकर जमीन असणे आवश्यक आहे |
FAQ:-
1. विहीर योजना 2025 महाराष्ट्र योजनेअंतर्गत नवीन विहिरीसाठी किती अनुदान मिळते?
या योजनेअंतर्गत नवीन विहिरीसाठी पाच लाख पर्यंत अनुदान मिळते.
2. विहीर मंजुरीसाठी अर्ज कसा करावा?
यासाठी अर्जदार दोन पद्धत वापरू शकतो.
ऑनलाइन:
यामध्ये एप्लीकेशनच्या मदतीने फॉर्म भरू शकतो.
ऑफलाइन:
ग्रामपंचायत व पंचायत समितीमध्ये जाऊन अर्ज करू शकतो.
3.विहीर योजना 2025 महाराष्ट्र ऑनलाइन अर्ज कसा भरायचा?
महाएजीएस ॲप डाऊनलोड करा. लाभार्थी लॉगिन वर सिलेक्ट करून विहीर सिलेक्ट करा. अर्ज सबमिट करा.
4.योजनेच्या अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?
सातबारा, आठ, मनरेगा जॉब कार्ड, अर्जदाराच्या जमिनीचा गट क्रमांक, बाकीच्या मजुरांचा जॉब कार्ड क्रमांक.
5.विहिरीचा अर्ज भरत असताना जिल्हा तालुका व गाव कोणता निवडावा?
अर्जदाराची जमीन ज्या गावामध्ये,तालुक्यात व जिल्ह्यात असेल तो पर्याय निवडावा.
6. अर्जदार अर्ज स्थिती कसा तपासू शकतो?
तुम्हाला अर्जाची स्थिती तपासण्यासाठी ओटीपी मिळेल. अर्जाची स्थिती ही प्रलंबित स्वीकृत व अस्वीकृत अशा प्रकारची दर्शवली जाईल.
7. आवश्यक कागदपत्रे कशी अपलोड करावी?
7/12 व 8/A ही कागदपत्रे जेपीजी किंवा पीडीएफ फॉरमॅटमध्ये अपलोड करावी.
8.मनरेगा जॉब कार्ड नंबर कसा शोधावा?
हा नंबर ग्रामपंचायतकडून दिला जातो.
9.विहीर योजना 2025 महाराष्ट्र च्या मंजुरीसाठी किती क्षेत्र असावे?
अर्जदाराच्या नावावर पाच एकर जमीन असावी.
10.ऑनलाईन अर्जासाठी किती वेळ लागतो?
ऑनलाईन अर्जासाठी कमीत कमी पाच ते दहा मिनिटांचा वेळ लागतो.