namo shetkari yojana आत्ता शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला 12000 रुपयांचा लाभ
namo shetkari yojana नमस्कार मित्रांनो भारत सरकारने गेल्या 6 वर्षापासून शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात सहा हजार रुपयांचा थेट लाभ देण्यास सुरुवात केली आहे. या योजनेचा मूळ उदेदेश म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या दैनिक गरजा भागवण्यास मोठा हात मिळत आहे. ही योजना दुष्काळी भागातील होणारे शेतीचे नुकसान अतिवृष्टी गारपीट तसेच अन्य नैसर्गिक आपत्ती या संकटात शेतकऱ्याला थोडा फार हातभार लागावा म्हणून भारताचे माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी 2019 साली सुरु केली. प्रधान मंत्री सम्मान निधी योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जात आहे. तसेच नमो शेतकरी महासम्मान निधी योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आली आहे या योजनेत सुध्दा शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये मिळत आहे तर दोन्ही योजना एकत्र करून वार्षिक 12000 रुपये मिळत आहे.
योजना | नमो शेतकरी महासम्मान निधी योजना |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी |
सुरु केले | महाराष्ट्र शासन (2023-24) |
लाभ | वर्षाला 6000 रुपये तीन टप्यामध्ये |
अधिकृत वेबसाईट | pmkisan.gov.in |
हे पण वाचा! महाराष्ट्राला 20 लाख घरे मंजूर महाराष्ट्र आता थांबणार नाही पहा सविस्तर बातमी.
टीप:- सरकार फेब्रुवारी 2025 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा 19 वा हप्ता जमा करेल.
namo shetkari yojana लाभार्थी लिस्ट:-
namo shetkari yojana यादी बघण्यासाठी तुम्हाला दोन पर्याय दिलेले आहे.
१) मोबाइल नंबर २) रेजिस्ट्रेशन मोबाइल नंबर यातील कोणताही एक पर्याय निवडा त्यात तुमचा मोबाईल नंबर टाका. त्यानंतर Captcha कोड भरून Get Mobile Otp बटन वर क्लिक करा आणि खाली दिलेल्या box मध्ये तुमच्या मोबाईल वर आलेला Otp टाका व नंतर Get Data या बटनावर क्लिक करा.
तुम्ही आत्ता तुमचे लाभार्थी नाव यादीत पाहू शकता.
namo shetkari yojana रेजिस्ट्रेशन:-
या योजनेसाठी नव्याने नोंदणी करण्याची गरज नाही महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सम्मान निधीचे अनुदान मिळत आहे त्या सर्व शेतकऱ्यायांना या योजनेचा लाभ मिळेल, जर तुम्ही पी एम किसान सम्मान निधी योजने साठी अर्ज केला नाही तर लवकरात लवकर करून यो दोन्ही योजनांचा लाभ घ्या.
नवीन नोंदणी करण्यासाठी पी एम किसान सम्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जा. तसेच खाली दिल्या-प्रमाणे तुम्हाला एक form दिसेल त्यात गरजेची माहिती भरा.
namo shetkari yojana आवश्यक कागदपत्रे:-
namo shetkari yojana लाभ:-
FAQ:-
NSMNY योजनेचा हप्ता कालावधी कधी आहे ?
एप्रिल – जुलै, ऑगस्ट – नोव्हेंबर आणि डिसेंबर – मार्च
NSMNY योजनेसाठी नोंदणी कशी करावी लागेल ?
तुम्हाला NSMNY योजनेसाठी नोंदणी करण्याची गरज नाही. PM KISAN नोंदणीकृत पात्र लाभार्थी हे NSMNY चे लाभार्थी असतील.
NSMNY योजनेत लाभ मिळालेली रक्कम किती ?
रु. 6000/- वार्षिक तीन समान टप्यात हस्तांतरित केले जातील.
योजनेचा पेमेंट मोड कोणता आहे?
पेमेंट मोड म्हणजे DBT म्हणजे थेट शेतकऱ्याच्या खात्यात.
NSMNY साठी DBT सक्षम बँक खाते आवश्यक आहे का?
हो , NSMNY योजनेचा लाभ फक्त DBT बँक खात्यात जमा होतो.
बँक खाते आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे का?
होय, NSMNY चा लाभ मिळवण्यासाठी बँक खाते आधारशी लिंक असणे अनिवार्य आहे.
NSMNY योजनेचे पात्रता निकष?
लाभार्थी पीएम किसान योजनेत पात्र असावा.
NSMNY नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
तसे पहिले तर कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही. NSMNY चा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला PM किसान योजनेत नोंदणी करावी लागेल.
पीएम-किसान मध्ये नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्याने जमिनीच्या नोंदींचे तपशील देणे अनिवार्य आहे का?
हो, PM-KISAN अंतर्गत शेतकऱ्याने स्वत:ची नोंदणी करण्यासाठी जमिनीच्या कागद पत्तरांची तपशील अनिवार्य आहेत. भूमी अभिलेख तपशील प्रविष्ट केल्याशिवाय, शेतकरी पोर्टलवर आपला अर्ज सादर करू शकणार नाही.