Tractor Anudan Yojana 2025! लवकर अर्ज करा ! अर्ज प्रक्रिया सविस्तर मार्गदर्शन पहा

Tractor Anudan Yojana 2025 योजना

ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान मिळवायचे असेल तर त्यासाठी लाभार्थ्याला महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. या अर्जाची प्रक्रिया थोडी वेळखाऊ वाटली तरी योग्य मार्गदर्शनाने ती सोपी होऊ शकते. अर्ज करण्यासाठी वेबसाईट https://mahadbt.maharastra.gov.in वापर करा. Tractor Anudan Yojana 2025 ऑनलाइन नोंदणी सगळ्यात आधी अर्जदाराने शासनाची अधिकृत वेबसाईट https://mahadbt.maharastra.gov.in ओपन करा. त्यात New Applicant Registration वर क्लिक करा. अर्जदाराने आपल्या आधार नंबर, ई-मेल आयडी टाकून ओटीपी च्या साह्याने पडताळणी करून घ्या.
नोंदणी पूर्ण झाल्यावर अर्जदाराला युजर आयडी व पासवर्ड मिळेल. त्याची नोंद करून ठेवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
योजनेचे नाव  Tractor Anudan Yojana Maharashtra 2025
उद्देश शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करणे.
लाभ 1.25 लाखाचे अनुदान
लाभार्थी फक्त महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन/ऑफलाईन
हे पण पहा! बांधकाम कामगारांसाठी खुशखबर! लवकरच अर्ज करा !

योजनेचा हेतु:

  1. राज्यातील शेतकऱ्यांना शेती कार्यासाठी ट्रॅक्टर खरेदीसाठी 1 लाख रुपये अनुदान उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  2. शेतकऱ्यांना शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे.
  3. शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन देणे तसेच राज्यातील इतर नागरिकांना शेती क्षेत्राकडे वळवणे.
  4. शेतीची कामे जलद गतीने करून देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.

Tractor Anudan Yojana अंतर्गत दिले जाणारे अनुदान:

  1. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 1.25 लाख रुपयांचे आर्थिक अनुदान देण्यात येते.
  2. या योजनेअंतर्गत 8 एचपी ते 20 एचपीच्या ट्रॅक्टर साठी 75 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येईल.
  3. या योजनेअंतर्गत 20 एचपी ते 40 एचपीच्या ट्रॅक्टर साठी 1 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येईल.
  4. जर ट्रॅक्टर 40 पेक्षा जास्त ते 70 एचपी पर्यंत असेल तर अनुदान हे 1 लाख 25 हजार रुपये असेल

Tractor Anudan Yojana 2025 लॉगिन:-

MahaDbt पोर्टल मध्ये जाऊन लॉगिन पर्याय निवडा आणि तुमचा युजर आयडीपासवर्ड वापरून लॉगिन करा.
लॉगिन झाल्यानंतर होम पेजवर योजना विभागात ट्रॅक्टर अनुदान योजना शोधा.

Tractor Anudan Yojana 2025 अर्ज भरणे व सबमिट करणे:-

योजनेवर क्लिक केल्यानंतर अर्ज फॉर्म उघडेल. आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा, जसे तुमचे नाव, जमिनीची माहिती ,बँक खाते इत्यादी. सर्व माहिती भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.शेवटी सबमिट बटन वर क्लिक करून अर्ज सादर करा.

Tractor Anudan Yojana 2025 अर्जाची स्थिती तपासा:-

अर्ज भरल्यानंतर महाडीबीटी पोर्टलवर माझे अर्ज किंवा अर्जाची स्थिती विभागात जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती तपासा.
अनुदान मंजूर झाल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर मेसेज येईल. त्यानंतर तुम्हाला संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागेल.

Tractor Anudan Yojana 2025 महत्त्वाची माहिती:-

जर तुम्ही तुमचा अर्ज भरण्यासाठी कोणत्याही सायबर कॅफे ची मदत घेत असाल. तर तुम्ही तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड कोणाला सांगू नका. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास पोर्टलवरील हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता किंवा जवळच्या कृषी कार्यालयाला भेट देउ शकता. ही प्रक्रिया तुम्ही तुमच्या मोबाईल वरून देखील करू शकता.

हे पण वाचा! बांधकाम कामगारांसाठी खुशखबर! लवकरच अर्ज करा !

Tractor Anudan Yojana 2025 लागणारी आवश्यक कागदपत्रे:-

1. अर्ज प्रक्रियेमध्ये वेळ वाचवण्यासाठी कागदपत्रे स्कॅन करून पीडीएफ फॉर्म मध्ये ठेवा.
2. शेत जमिनीचा सातबारा व 8 अ उतारा
3. आधार कार्ड
4. बँक पासबुक
5. ओळखपत्र
6. जमीनधारणा प्रमाणपत्र
7.प्रतिज्ञा पत्र
8.पासपोर्ट आकाराचे फोटो
9.रहिवाशी दाखला
10.रेशन कार्ड

असा करा ऑफलाईन अर्ज:

  • अर्जदार शेतकऱ्याला आपल्या जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जावे लागेल.
  • कृषी विभागात जाऊन ट्रॅक्टर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व सदर अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल.

नियम व अटी:

  • जरी या योजनेअंतर्गत 50 टक्के इतके अनुदान देय असले तरी सुद्धा 1.25 लाखापेक्षा जास्त अनुदान देण्यात येणार नाही.
  • फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • फक्त शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे तसेच त्याच्याजवळ शेती साठी स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकऱ्याने या पूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर चा लाभ मिळवला असता कामा नये.
  • एका कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला या योजनेचा लाभ घेता येईल.
  • अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असल्यास त्या शेतकऱ्याकडे जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • जर अर्जदाराने एखाद्या घटकासाठी अर्ज केल्यास पुढील 10 वर्षे त्याला त्याच घटकासाठी अर्ज करता येणार नाही परंतु तो इतर घटकांसाठी अर्ज करू शकतो.

Tractor Anudan Yojana 2025 या योजनेअंतर्गत निवडलेल्या शेतकऱ्यांचे अनुभव:-

1.शेतकरी सुरज शिंदे (सोलापूर) :
सुरज यांनी सांगितले की, पहिले नांगरणीसाठी मजुरांवर अवलंबून राहावे लागायचे. यासाठी वेळ आणि खर्च अधिक होत होता. ट्रॅक्टर मिळाल्यामुळे आता नांगरणी व रोटावेटर ची कामे वेळेत पूर्ण होतात. त्यामुळे शेतातील उत्पन्न देखील वाढले आहे.

2. शेतकरी संतोष पाटील (अहमदनगर) :
संतोष यांना शासनाकडून 125000 रुपये अनुदान मिळाले. त्यामुळे त्यांना कमी भांडवलामध्ये ट्रॅक्टर खरेदी करता आला.आता त्यांनी नांगरणीचा धंदा चालू केला आहे. या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न कमवत आहे.

3. शेतकरी शेखर वाघ (कोल्हापूर) :
शेखर यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 100000 रुपये अनुदान मिळाले. त्यांचा अनुभव असा आहे की ट्रॅक्टर घेतल्यामुळे त्यांच्या शेतीतील कामात खूप सुधारणा झाली. आधी कष्टाची असणारी कामे आता ट्रॅक्टर मुळे सोपी झाली.

4. शेतकरी शिवम पवार (विदर्भ) :
पवार यांनी सांगितले की, शासनाच्या अनुदानामुळे त्यांना ट्रॅक्टर स्वस्तात मिळाला. आता ते स्वतःच्या शेतीबरोबरच दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात नांगरणी पेरणी व रोटावेटर ची कामे करतात. त्यातून त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते.

यावरील लाभार्थ्याच्या अनुभवातून एवढे समजते की त्यांना या ट्रॅक्टर अनुदानामुळे खूप फायदा झाला आहे. त्यांचे काम खूप सुरळीत झाले आहे.

FAQ:-

2025 मध्ये ट्रॅक्टर सबसिडी योजना काय आहे?

ही एक शेतकऱ्यांना व्यवसायात तसेच शेतीची कामे सुरळीत व्हावे यासाठी सरकार 125000 रुपयांपर्यंत अनुदान देते. जेणेकरून वाढलेल्या महागाईच्या काळात त्यांना जास्त आर्थिक फटका बसू नये हे या योजनेचा मूळ उद्देश आहे.

tractor वर सब्सिडी कशी भेटेल?

  1. शेतकऱ्याजवळ स्वतःची जमीन असली पाहिजे.
  2. शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाखाच्या आतमध्ये असले पाहिजे.
  3. एक व्यक्ती एकदाच या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
  4. लाभार्थ्याचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत जोडलेले असावे.
फ्री ट्रॅक्टर योजना काय आहे ?
मुख्यमंत्री योजनेंतर्गत शेतकरी गटाला स्वयं सहायता बचत गट तसेच शेतकरी गटाला दिले जातात. जर शेतकरी ट्रॅक्टरसोबत दोन अवजारे घेत असेल तर त्याला ट्रक्टरवर 50 टक्के अनुदान मिळेल.
कोणत्या ट्रॅक्टरवर सबसिडी दिली जाते?
महाराष्ट्र शासनाने कृषी विकास योजने मधून अनुसूचित जातीतील व्यक्तींना 45 HP व त्यापेक्षा जास्त शक्ती असलेल्या ट्रॅक्टरवर 100000 रुपये सवलत दिली आहे. याचा अर्थ कि सरकार ती रक्कम आपल्या तिजोरीतून देणार आहे. या योजनेसाठी शेतकरी online अर्ज करू शकतो.

Leave a Comment