Scheme For Women in Maharashtra
महाराष्ट्रातील महिलांसाठी निघालेल्या विविध योजना आहेत. त्या योजना संबंधी माहिती आज आपण जाणून घेऊ. केंद्र किंवा राज्य सरकारकडून महिलांसाठी विविध योजना राबवण्याचे एकमेव उद्देश म्हणजे महिलांना त्यांच्या पायावर उभे राहता यावे व त्या योजनांमधून येणाऱ्या रकमेत स्वतःच्या व कुटुंबाच्या गरजा भागवेल. हाच या सर्व योजना राबवण्यामागचा उद्देश आहे. या सर्व बाबींचा विचार करून महिलांच्या कामासंबंधीत असणारे काम तसेच शिवणकाम विणकाम इत्यादी अशा अनेक प्रकारच्या योजनांचा समावेश महिलांसाठी शासनाकडून करण्यात आलेला आहे.
महिलांना व्यवसायाची चालना देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे. त्यांच्या सशक्तीकरणाला चालना देणे. हा शासनाचा विविध योजना राबवण्याचा उद्देश आहे. तसा जर आपण विचार केला तर मुलीला समाजामध्ये एवढा मान नसतो म्हणजेच कमी मान दिला जातो. लहानपणापासून त्यांच्यावर दबाव टाकला जातो. घराच्या बाहेर त्यांना जाऊन देत नाही. त्यामुळे महिलांना सुद्धा सन्मान मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांसाठी बारा योजना सुरू केल्या आहे आहेत.
Scheme For Women in Maharashtra खालीलपैकी महिलांसाठी बारा योजना आहेत:-
1. लाडकी बहीण योजना
2. महिला समृद्धी कर्ज योजना
3. जननी सुरक्षा योजना
4. सुकन्या समृद्धी योजना
5. माझी कन्या भाग्यश्री योजना
6. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
7. विधवा पेन्शन योजना
8. महिला सन्मान योजना
9. उद्योजक धोरण योजना
10. स्वर्णिमा योजना
11. महिला उद्योगिनी योजना
12. लेक लाडकी योजना
Scheme For Women in Maharashtra सविस्तर माहिती:-
1. लाडकी बहीण योजना:-
या योजनेंमध्ये सगळ्यात लोकप्रिय योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आहे. या योजनेची सुरुवात जुलै 2024 मध्ये झाली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये रक्कम वितरित केली जाते. ही योजना महिलांना सशक्त व आर्थिक मदत मिळावी म्हणून शासनाने सुरू केली आहे.अधिक माहितीसाठी येथे वाचा.
2. महिला समृद्धी कर्ज योजना:
महिला समृद्धी कर्ज योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व सहाय्य विभागाकडून खास करून महिलांसाठी राबविण्यात येणारी कर्ज योजना आहे. महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी ही योजना काढण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या कर्जावर 4% व्याजदर आहे व परतफेडीचा कालावधी 3 वर्षाचा आहे.
3.जननी सुरक्षा योजना:
ही योजना भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याकडून गरीब कुटुंबातील गरोदर महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना शासनाकडून 1400 रुपये आर्थिक मदत करण्यात येते. याव्यतिरिक्त गर्भवती महिलांना मदत करणाऱ्या संयोगिता यांना प्रसूती प्रोत्साहनासाठी 300 व प्रसूतीनंतर 300 इतकी रक्कम देण्यात येते.
4. सुकन्या समृद्धी योजना:
सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात 22 जानेवारी 2015 ला झाली. ही योजना केंद्र सरकारची असून या योजनेमध्ये मुलींच्या पालकांना 250 रुपये पासून दीड लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करता येते.या योजनेमधून मुलीच्या भविष्यासाठी फायदा होईल.
5. माझी कन्या भाग्यश्री योजना:
या योजनेची सुरुवात ही 1 मे 2017 ला झाली. या योजनेचा उद्देश हा मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी व स्री शिक्षणाला चालना देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली. जर पहिली मुलगी जन्माला आल्यास त्या मुलींच्या वडिलांच्या खात्यात 50 हजार रुपयांची रक्कम जमा होईल.
6. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0
ही योजना खास करून गरोदर असताना महिलांसाठी राबविण्यात येत आहे. अशा महिलांना या योजनेअंतर्गत 5 हजार रुपयांची मदत केली जाते. ही योजना केंद्र शासनाची असून ही योजना महिला आणि बालविकास मंत्रालयामार्फत चालवण्यात येते.
7. महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना
जर एखाद्या महिलेच्या पतीचा अकस्मात किंवा इतर कारणांमुळे मृत्यू झाला असेल. अशा महिलांना समाजात वावरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हे लक्षात घेऊन विधवा महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शासनाने या योजनेची सुरुवात केली. या योजनेतून विधवा महिलांसाठी 1000 रुपये दर महिन्याला राज्य शासनाकडून देण्यात येते.
8. महिला सन्मान योजना:
या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प मध्ये जाहीर करण्यात आलेल्या लेक लाडकी योजनेस महिलांसाठी विविध योजनांची घोषणा केली आहे. या योजनेमध्ये एसटी महामंडळामध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना 50 टक्के सूट दिली आहे.
9. उद्योजक धोरण योजना:
पुरुषाप्रमाणेच महिलांना देखील प्रत्येक क्षेत्रात स्थान मिळावे म्हणून शासनाने महिलांसाठी कर्ज योजना सुरू केली आहे. महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 20 लाख पासून तर 1 कोटी पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
10. स्वर्णिमा योजना:
स्वर्णिमा योजना ही महिला स्वयंरोजगार योजना अंतर्गत येणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना उद्योगासाठी दोन लाख पर्यंत खर्च उपलब्ध करून देण्यात येते.
11. महिला उद्योगिनी योजना:
ही महाराष्ट्रातील एक महिला कर्ज योजना असून ती योजनेच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय करण्यासाठी जास्तीत जास्त 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देते.
Scheme For Women in Maharashtra या पोस्ट आपण महिलांसाठी कोणकोणत्या योजना राबवल्या जातात ते बघणार आहोत. व्यवसायासाठी महिलांना कर्ज देणारी योजना आहेत, महिलांना व्यवसायासाठी उपकरणे किंवा वस्तू देणाऱ्या योजना आहेत, महिलांना प्रवासात सूट देणाऱ्या योजना आहेत, महिलांना प्रसूतीनंतर लाभ देणाऱ्या पण योजना आहेत, मुलींसाठी गर्भवती महिलांसाठी लाभ देणाऱ्या पण योजना आहेत.