Ayushman Card Apply Online
नमस्कार मित्रांनो आपण आज Ayushman Card Apply Online बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. आयुष्यमान भारत योजनेला प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या नावाने सुद्धा ओळखले जाते. या योजनेचा उद्देश आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असलेल्या नागरिकांना आरोग्यासाठी वेगवेगळ्या सुविधा प्रदान करणे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरवर्षाला पाच लाखापर्यंत मोफत आरोग्याचा विमा मिळतो.
आता या योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आली आहे. जेणेकरून लोक घरबसल्या आयुष्यमान कार्ड साठी अर्ज करू शकतील.
आयुष्यमान कार्डचा लाभ घेण्यासाठी पात्रता तपासणी आता सोपी झाली आहे. या पोस्टमध्ये आपण आयुष्यमान काळासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया त्याच्या आवश्यक कागदपत्रे इत्यादी बद्दल अधिक माहिती बघणार आहोत.
आयुष्मान कार्ड बद्दल माहिती :-
योजनेचे नाव | Ayushman Card (आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना) |
---|---|
लाभार्थ्यांची संख्या | 30 करोड पेक्षा जास्त |
मोफत स्वास्थ्य विमा | महाराष्ट्र |
वर्ष | पाच लाख प्रति वर्ष |
अर्जाची प्रक्रिया | ऑफलाईन आणि ऑनलाईन |
आवश्यक कागदपत्रे | आधार कार्ड, रेशन कार्ड ,मोबाईल नंबर इत्यादी. |
Ayushman Card येथे Download करा
Ayushman Card म्हणजे काय आहे?
आयुष्यमान कार्ड ही एक सरकारी योजना असून तिचा उद्देश गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या कुटुंबांना आरोग्य सेवा प्रदान करणे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षाला पाच लाखापर्यंत मोफत इलाज करता येतो. हे कार्ड नागरिकांना वेगवेगळ्या सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करण्याला मंजुरी देते.
या योजनेअंतर्गत लाखो कुटुंबांना लाभ मिळाला आहे आणि त्याची संख्या पण वाढतच आहे.
आयुष्यमान भारत योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2018 मध्ये झारखंड राज्यांमध्ये सुरू केली. आयुष्यमान कार्ड हे एक हेल्थ कार्ड आहे.आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत रजिस्टर लाभार्थ्यांना दिले जाते. या कार्डच्या अंतर्गत गरीब पात्र नागरिकांना पाच लाखापर्यंत मोफत इलाज केला जातो.
आयुष्यमान भारत राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत दहा करोड गरीब आणि दुर्बळ परिवारांना मोफत इलाज देण्याचे धोरण आहे आणि आतापर्यंत 30 करोड पेक्षा अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला आहे.
Ayushman Card पात्रता:–
अर्जदार हा भारताचा रहिवासी पाहिजे .
अर्जदार हा बीपीएल श्रेणीमध्ये असावा .
सामाजिक आर्थिक आणि जनगणना 2011 मध्ये सहभागी असलेल्या कुटुंबांना प्राथमिकता दिली जाईल.
जर आपण राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम च्या अंतर्गत लाभ घेत असाल तर आपण या योजनेसाठी अर्ज करू शकता.
Ayushman Card आवश्यक कागदपत्रे:-
1. आधार कार्ड
2. रेशन कार्ड
3. मोबाईल नंबर
4. बँक पासबुक
5. पासपोर्ट साईज फोटो
हे देखील वाचा! आत्ता राज्यातील गरीब कुटुंबांना मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचार
Ayushman Card साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
आयुष्यमान कार्ड साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही खूप साधी सरळ सोपी आहे.
- सर्वात आधी अधिकृत शासकीय वेबसाईटला भेट द्या. (beneficiary.nha.gov.in)
- वेबसाईटवर गेल्यानंतर या beneficiary login ऑप्शन वर क्लिक करा त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका आणि ओटीपी घ्या.
- ओटीपी टाकून लॉगीन करा तुमच्या नावाने किंवा आधार नंबर टाकून पात्रता तपासा.
- जर तुम्ही पात्र असाल तर केवायसी ऑप्शन वर क्लिक करा त्यानंतर आधार ऑथेंटीकेशन करा आणि ओटीपी टाका.
- कुटुंबातील एक व्यक्ती निवडा ज्याचे तुम्हाला आयुष्यमान कार्ड बनवायचे आहे सगळी आवश्यक माहिती भरा जसे मोबाईल , धर्म ,जन्म तारीख.
- तुमचा फोटो अपलोड करा.
- त्यानंतर फॉर्म एकदा व्यवस्थित तपासा आणि सबमिट बटन वर क्लिक करा.
- राज्य सरकारची एजन्सी तुमचे आवश्यक कागदपत्रे तपासतील. काही दिवसानंतर तुमचे आयुष्यमान कार्ड अप्रूव्ह होईल.
Ayushman Card download कसे करायचे?
- अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
- Download Ayushman Card या ऑप्शन वर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका व ओटीपी भरा आवश्यक असलेली माहिती टाका आणि डाऊनलोड बटन वर क्लिक करा.
- आयुष्यमान कार्ड तुम्ही दोन पद्धतीने डाऊनलोड करू शकता.एक आयुष्यमान ॲपच्या मदतीने आणि दुसरे अधिकृत आयुष्यमान वेबसाईटच्या मदतीने
Ayushman Card या योजनेचा लाभ:-
ही योजना खास करून गरीब लोकांसाठी मोफत आरोग्य सेवा प्रदान करते.
या योजनेतर्फे दरवर्षाला पाच लाखांपर्यंत रक्कम मिळते. लाभार्थी या योजनेचा लाभ वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये मोफत इलाज करून घेऊ शकतो.
ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया ही अर्जदार घरबसल्या पण करू शकतो.