Farmer Id Registration फार्मर आयडी नसल्यास होणार PM किसान योजना बंद! लवकर अर्ज करा!

Farmer Id Registration:-

सर्व शेतकरी बांधवांना माहीतच असेल की भारत सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी काही लाभकारी योजना घेऊन येत आहे. या योजनेच्या अंतर्गत नुकताच सरकारने शेतकऱ्यांसाठी अग्रीस्टॅक म्हणून एक नवीन योजना चालू केली आहे. शेतकऱ्यांची ओळख कन्फर्म करण्यासाठी फार्मर आयडी ही योजना काढली आहे. फार्मर आयडी असं कागदपत्र आहे की जे शेतकऱ्यांची ओळख सगळ्यांना दाखवते. सरकारने सर्व शेतकऱ्यांना हे कार्ड बनवण्यासाठी आग्रह केला आहे. ही आयडी केवळ शेतकऱ्यांची ओळख नसून त्यामध्ये एक युनिक नंबर आहे. जो प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळा दिला जाईल.
जर तुम्ही शेतकरी आहात तर तुम्हाला पण स्वतःची फार्मर आयडी बनवावी लागेल. यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रक्रिया करावी लागेल. पुढे आम्ही तुम्हाला फार्मर आयडी कशा पद्धतीने बनवता येईल. याबद्दलची माहिती दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भारत हा कृषीप्रधान देश आहे आपली अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे शेती क्षेत्राला अधिक शाश्वत आणि प्रगत बनवण्यासाठी केंद्र सरकारने ॲग्रीस्टॅक योजना सुरू केली आहे ही योजना 14 ऑक्टोबर पासून देशभरात लागू होत आहे.

फार्मर आयडी हा शेतकऱ्यांसाठी एक ओळख क्रमांक आहे.तो त्यांच्या डिजिटल प्रोफाइलशी जोडला जातो.त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे फायदे मिळतील.
जसे प्रधानमंत्री किसान योजना, पिक विमा कर्ज व इतर सरकारी योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील.किसान क्रेडिट कार्ड आणि शेती विकासासाठी आवश्यक असलेले कर्ज शेतकऱ्यांना सहज रितीने मिळेल.पिकांच्या नुकसान भरपाई चे सर्वेक्षण आणि मदत वाटप यासाठी या फार्मर आयडीची मदत होईल.फार मराठीच्या माध्यमातून पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी डेटा वापरला जाईल.शेतमाल खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सोपी होईल.

Farmer Id Registration बद्दल थोडक्यात माहिती:-

योजनेचे नाव Farmer Id Registration
पोस्ट प्रकार किसन आयडी, Farmer ID
कार्ड विभाग एग्रीकल्चर डिपार्टमेंट ऑफ इंडिया
कार्ड चे नाव फार्मर आयडी
आयडी कार्ड कार्डचा लाभ योजनेचा लाभ घेण्यासाठी
लाभार्थी- सर्व शेतकरी
उद्दिष्ट शेतकरी असल्याची ओळख पटवून देणे.
अधिकृत वेबसाईट upfr.agristack.gov.in

 

फार्मर रजिस्ट्री (Farmer Registry) काय आहे?

फार्मर रजिस्ट्री हे एक नवीन फीचर आहे.जे शेतकऱ्यांची माहिती व्यवस्थित आणि डिजिटल पणे अटॅच करते.
याचा मुख्य उद्देश हे निश्चित करायचे की शेतकऱ्यांच्या सरकारी योजना सबसिडी आणि इतर सुविधांचा लाभ व्यवस्थित आणि वेळेत मिळतो की नाही. या रजिस्ट्रीमध्ये शेतकऱ्यांची ओळख त्यांची जमीन पिके आणि शेतीसंबंधी इतर महत्त्वपूर्ण माहिती गोळा करून सुरक्षित ठेवले जाते. हे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण काम करते.

Farmer registry चे फायदे:-

प्रत्येक शेतकऱ्याला एक ID Card मिळणार असून भविष्यात याच कार्डच्या आधारे सर्व शासकीय योजनांचा लाभ, कर्ज, अनुदान,pm किसान किंवा इतरही सर्व विभागाच्या योजनांचा लाभ या कार्डच्या आधारे देण्यात येणार आहे.
डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) च्या माध्यमातून सरकार सर्व निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते .जेणेकरून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि प्रभावी होते. डीबीटीचा लाभ केवळ शेतकऱ्यांनाच मिळतो. त्यामुळे अपात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
याव्यतिरिक्त डीबीटी मार्फत कृषी क्षेत्रामध्ये अधिक सुधारणा झाली आहे. कारण यामुळे प्रभावी कार्य संपन्न होते, त्यातून भ्रष्टाचार कमी करण्यास मदत मिळते. यातून नकली लाभार्थी किंवा अपात्र लाभार्थ्यांना लाभ घेता येत नाही.

हे सुद्धा वाचा !PM kisan Yojana 19th Installment Date 19 वा हप्ता लवकरात जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात!

Farmer Id Registration आवश्यक कागदपत्रे:-

1. आधार कार्ड
2. पॅन कार्ड
3. बँक पासबुक
4. आय प्रमाणपत्र
5. जात प्रमाणपत्र (cast certificate)
6. रहिवासी प्रमाणपत्र
7. मोबाईल नंबर
8. पासपोर्ट साईज फोटो

Farmer Id Registration ऑनलाइन पद्धतीने कसे करावे?

प्रत्येक राज्याचा सरकारी एक पोर्टल असते .त्यामध्ये शेतकऱ्यांना लागणारे सर्व माहिती असते.तुम्हाला सर्वात आधी आपल्या राज्याच्या कृषी विभाग ऑफिशियल वर वेबसाईट जायचे आहे.

  • online पद्धतीने farmer id registration साठी आधार कार्ड ला mobile नंबर लिंक असणे आवश्यक आहे.
  • upfr.agristack.gov.in या वेबसाईटवर जाऊन न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करा.
  • त्यानंतर फार्मर रजिस्ट्रेशन ऑप्शन वर जा त्यात तुमचा आधार नंबर मोबाईल नंबर व इतर महत्त्वाची माहिती टाका.
  • रजिस्ट्रेशन नंतर काही आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, जसे ओळखपत्र व जमिनीचे काही कागदपत्रे.
  • कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा.
  • तुमचं फॉर्म सफलतापूर्वक जमा होईल .
  • फॉर्म सबमिट केल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबरची तुम्हाला एक पावती मिळेल.

तसेच तुम्ही जवळच्या CSC केंदात जाऊन देखील Farmer Id Registration करू शकता.

Farmer Id Registration: नव्या नोंदणीसाठी फार्मर आयडी आवश्यक:

केंद्र सरकारने पी एम किसान सन्मान निधी योजनेची नोंदणी करताना (Farmer Id Registration)फार्मर आयडी क्रमांक नोंदवणे बंधनकारक केले आहे. केंद्र कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. पी एम किसान सन्मान योजनेच्या नव्या नोंदणीसाठी फार्मर आयडी नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या योजनेच्या नोंदणीसाठी साधारणपणे दोन लाख नव्याने अर्ज सादर होत आहेत.
फार्मर आयडीमुळे अर्ज सादर करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर जर शेतजमीन असल्याची खात्री होते. त्यामुळे पीएम किसान संबंधी योजनेची पडताळणी प्रक्रिया देखील सोपी होते.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पी एम किसान सन्मान निधीसाठी नव्याने अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी नोंदणी करावी लागेल. त्यानंतर जो फार्मर आयडी क्रमांक मिळेल तो पी एम किसान सन्मान निधीच्या अर्जात नोंदवावा लागेल. ही प्रक्रिया देशातील 10 राज्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे. एक जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पी एम किसान संबंधी योजनेमध्ये आत्तापर्यंत 18 हप्त्यांमध्ये 3.46 लाख कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्यात आली आहे. या योजनेचा जवळपास 11 कोटी शेतकऱ्यांना 18 हप्त्यांचा लाभ देण्यात आला आहे.

जिल्ह्यात ॲग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत असून आजपर्यंत 16 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. शेतकरी बांधवांना मी आव्हान करतो की त्याने तलाठी, कृषी सहाय्यक विकासाचा अधिकारी यांच्या मार्फत सीएससी केंद्र मार्फत नोंदणी करण्यात यावी अथवा शेतकरी स्वतःचे मोबाईल द्वारे स्थान नोंदणी करू शकतात. तरी शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा. असे पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणतात.

Leave a Comment