RationCard E-KYC Check On Mobile:
रेशन कार्ड ची E-KYC ही एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे ,जी रेशन कार्डधारकांसाठी अनिवार्य आहे. याचा मुख्य उद्देश असा की सरकारी योजनेचा लाभ फक्त पात्र व्यक्तींना झाला पाहिजे.E-KYC च्या माध्यमातून रेशन कार्ड ची सर्व माहिती आधार कार्ड ला जोडली जाते. त्यातून नकली लाभार्थ्यांना रोखले जाते. रेशन कार्ड ची E-KYC झाली की नाही हे मोबाईलच्या माध्यमातून बघणे अत्यंत सोपे झाले आहे. या पोस्ट मधून आम्ही तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या रेशन कार्ड ची e-kyc स्थिती कशी चेक करायची हे सांगणार आहोत.बरोबरच e-KYC प्रक्रिया, त्याचे महत्त्व आणि त्याच्या बद्दलची अधिक माहिती पण सांगणार आहोत.
रेशन कार्ड बद्दल बरेच लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात पण आम्ही तुम्हाला रेशन कार्ड ची केवायसी बद्दल माहिती देणार आहोत. त्याच्या मदतीने तुम्हाला समजणे सोपे होईल की तुम्ही घरबसल्या केवायसी कशी करू शकता. त्याबरोबरच त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे आवश्यक असेल. कारण याच्या मदतीने तुम्ही सर्व प्रोसेस फॉलो करू शकता. त्यामध्ये काही गोष्टींना ध्यान देने आवश्यक आहे.
रेशन कार्ड E-KYC काय आहे?
रेशन कार्ड E-KYC ही एक अशी प्रक्रिया आहे. ज्याद्वारे रेशन कार्ड धारकांची माहिती इलेक्ट्रॉनिक रूपात साठवली जाते.या प्रक्रियेमध्ये रेशन कार्ड ची माहिती आधार कार्ड ला जोडली जाते.जेणेकरून लाभार्थ्याची ओळख निश्चित केली जाते.
रेशन कार्ड E-KYC बद्दल अधिक माहिती
प्रक्रियेचे नाव | रेशन कार्ड E-KYC |
कोणासाठी गरजेचे | सर्व राशन कार्ड धारकांसाठी गरजेचे आहे |
आवश्यक कागदपत्रे | आधार कार्ड रेशन कार्ड |
प्रक्रियेचा लाभ | नकली लाभार्थ्यांवर आळा घालता येईल |
वेळ | सरकार द्वारे निर्धारित तपासण्याची |
पद्धत | मोबाईल ॲप किंवा वेबसाईट |
रेशन कार्ड E-KYC ची आवश्यकता:-
1. नकली लाभार्थ्यांवर आळा घालता येईल:E-KYC च्या माध्यमातून नकली रेशन कार्ड धारकांची ओळख होऊ शकते.
2. अचूक माहिती: सरकार जवळ लाभार्थ्यांची बरोबर आणि अचूक माहिती डेटाबेस मध्ये समाविष्ट होईल.
3. पात्र व्यक्तींना सरकारी योजनेचा लाभ मिळेल.
4. रेशन वितरण प्रक्रियेला डिजिटल बनवण्यास मदत मिळेल.
रेशन कार्ड E-KYC कशी करावी?
1. ऑनपद्धत E-KYC पद्धत:
- सरकारी वेबसाईट किंवा पोर्टलवर जा.
- रेशन कार्ड E-KYC चा ऑप्शन निवडा.
- रेशन कार्ड आणि आधार कार्ड ची माहिती भरा.
- ओटीपी च्या माध्यमातून सत्यापित करा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- सबमिट बटन वर क्लिक करा.
2. ऑफपद्धत E-KYC पद्धत:
- जवळच्या रेशन दुकान किंवा सीएससी केंद्रावर जाऊन भेट द्या.
- आवश्यक कागदपत्रे घेऊन जा.
- फॉर्म भरा आणि कागदपत्रे जमा करा.
- बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करा.
- सर्व झाल्यास पावती घ्या.
मोबाईल द्वारे रेशन कार्ड E-KYC चेक करण्याची पद्धत:
1. मेरा रेशन हे ॲप डाऊनलोड करा: Google Play Store मधून मेरा रेशन ॲप डाऊनलोड करा.
2. ॲप ओपन करून लॉगिन करा :तुमच्या मोबाईल नंबर द्वारे ॲप लॉगिन करा.
3. E-KYC स्टेटस चेक करा: मेन्यू मध्ये जाऊन E-KYC status या ऑप्शन वर क्लिक करा.
4. रेशन कार्ड नंबर टाका: तुमचा रेशन कार्ड नंबर तिथे टाका.
5. त्यानंतर तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड ची E-KYC स्थिती दिसेल.
रेशन कार्ड E-KYC साठी आवश्यक कागदपत्रे:-
1. रेशन कार्ड (मूळ प्रत)
2. आधार कार्ड (कुटुंबातील सर्व व्यक्तींचा)
3. मोबाईल नंबर (आधार ला लिंक असलेले)
4. पासपोर्ट साईज फोटो
5. बँक पासबुक
6. पत्त्याचा पुरावा (विज बिल)
रेशन कार्ड E-KYC न केल्याचे परिणाम:-
रेशन कार्ड ची सुविधा बंद होईल. सरकारी योजनेचा लाभ घेता येणार नाही .
रेशन कार्ड रद्द होईल.
भविष्यात नवीन रेशन कार्ड साठी अपात्र ठराल.
रेशन माहिती E-KYC बद्दल महत्वपूर्ण माहिती
- ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे.
- ही प्रक्रिया सुरक्षित आणि गुप्त पद्धतीची आहे.
- E-KYC नंतर रेशन कार्ड डिजिटल होते.
- कोणत्याही समस्येसाठी हेल्पलाइन नंबर उपलब्ध आहे.
- E-KYC स्टेटस कोणत्याही वेळी चेक करू शकता.
रेशन कार्ड E-KYC चे फायदे:-
- रेशन वितरण प्रणाली मध्ये पारदर्शिता येईल.
- डिजिटल प्रक्रियेमुळे वेळेची बचत होईल.
- भ्रष्टाचारावर आळा बसेल.
- पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
- लाभार्थ्याचा डेटा सुरक्षित राहील.
FAQS:-
1.E-KYC करण्यासाठी काही फी द्यावी लागते का?
नाही,ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे.
2. E-KYC साठी आधार कार्ड आवश्यक आहे का?
होय, यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे.
3.E-KYC न केल्यास काय होईल?
E-KYC न केल्यास रेशनची सुविधा बंद होईल.
4. ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करता येईल का?
हो ,E-KYC ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने पण करता येऊ शकते.