PM Awas Yojana Gramin: पीएम आवास योजना ग्रामीण सर्वे फॉर्म झाले सुरू!

PM Awas Yojana Gramin:

भारत सरकार द्वारे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण क्षेत्रासाठी सर्वे सुरू केले आहे. कारण पीएम आवास योजनेचा लाभ पात्र कुटुंबांपर्यंत पोहोचेल आणि जर तुम्हाला पण या सर्वे बद्दल काही माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या क्षेत्रातील सर्वे मध्ये अर्ज करू शकता व लाभ घेऊ शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भारत सरकार द्वारे देशातील ग्रामीण क्षेत्रातील गरीब किंवा बेघर कुटुंबांसाठी पक्के घर उपलब्ध करून देणे हा या योजनेमागचा उद्देश आहे. PM Awas Yojana Gramin अंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी व्यक्तींनी अर्ज करणे गरजेचे आहे.
ज्या परिवारांना पीएम आवास योजने अंतर्गत अजून पर्यंत लाभ भेटला नाही. त्या सर्व व्यक्तींनी या योजनेसंबंधी अर्ज करणे आवश्यक आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की सरकार द्वारा अर्ज प्रक्रिया अधिक सुटसुटीत व सोपी करण्यासाठी सरकारने एक नवीन ॲप लॉन्च केले आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकता.

PM Awas Yojana Gramin:

ग्रामीण क्षेत्रातील गरीब नागरिक जे पीएम आवास योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छित असाल. तर ते व्यक्ती या पोस्टच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया कशी करायची व कोण कोणती कागदपत्रे लागतील ही सर्व अधिकृत माहिती या पोस्ट मधून तुम्हाला मिळेल.

याव्यतिरिक्त जर तुम्हाला नवीन ॲपवर अर्ज प्रक्रिया कशी करायची याबद्दल माहिती नसेल. तर या पोस्टच्या माध्यमातून मोबाईल ॲप वर अर्ज प्रक्रिया कशी करायची याबद्दल सांगितले आहे. तर त्यास स्टेप बाय स्टेप फॉलो करून सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.

PM Awas Yojana Gramin Eligibility: पात्रता

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण साठी पात्रता खालील प्रमाणे आहे:

  • असे सर्व कुटुंब ज्यांच्याकडे राहण्यासाठी पक्के घर नाही.
  • आर्थिक रूपाने दुर्बळ असलेले कुटुंब या पात्र श्रेणीमध्ये येतात.
  • अनुसूचित जाती आणि जमाती वर्गातील अल्पसंख्यांक.
  • अशा व्यक्ती ज्यांची वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे.
  • दारिद्र्यरेषेखालील कुटुंब या योजनेसाठी पात्र असेल.
  • ज्या व्यक्तींचे रेशन कार्ड पिवळे आहे ते सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरतील.

PM Awas Yojana Gramin Amount: एकूण रक्कम

जसे की तुम्हा सर्वांना माहितीच असेल भारत सरकार द्वारा पीएम आवास योजनेअंतर्गत पात्र व्यक्तींसाठी घर निर्माण करण्यासाठी एकूण रक्कम बँक अकाउंट मध्ये उपलब्ध केली जाते. ज्याच्या अंतर्गत भारत सरकार मैदान क्षेत्र असलेल्या पात्र व्यक्तींसाठी 120000 रुपयांची रक्कम अकाउंट मध्ये ट्रान्सफर करते आणि डोंगराळ भागातील निवासी असलेल्या नागरिकांना 130000 रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाते.

PM Awas Yojana Gramin अपात्र व्यक्ती :

  • आयकर दाता कुटुंब पीएम आवास योजनेसाठी अपात्र ठरेल.
  • ज्या व्यक्तीकडे चार चाकी वाहन असेल ते पण अपात्र ठरतील. सरकारी नोकरी असलेले कुटुंब अपात्र ठरतील.
  • ज्यांच्याकडे राहण्यासाठी पक्के घर आहे ते पण अपात्र ठरतील.

PM Awas Yojana Gramin आवश्यक कागदपत्रे

या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक ठरतील:

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदान कार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • आय प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • उत्पन्नाचा दाखला
  • सही

 

PM Awas Yojana Gramin अर्ज प्रक्रिया कशी करायची?

तुम्ही पीएम आवास योजनेमध्ये अर्ज करू इच्छित असाल मोबाईल ॲपच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता खालील प्रमाणे:

  • सर्वात आधी तुम्ही गुगल प्ले स्टोअर वर जाऊन AwaasPlus ॲप इंस्टॉल करा.
  • ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करून आधार नंबर टाका.
  • आता तुम्हाला फेस ऑथेंटीकेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
  • त्यात तुम्हाला स्वतःचे नाव, पत्ता, कुटुंबाची माहिती आणि आवश्यक असलेली माहिती टाकावी लागेल.
  • त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • त्यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
  • एवढे केल्यानंतर तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

PM Awas Yojana Gramin साठी अधिकृत वेबसाईट पण आहे. त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही अर्ज प्रक्रिया करू शकता.

PM Awas Yojana Gramin पोर्टलच्या माध्यमातून अर्ज कसा भरावा?

  • सर्वात आधी अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
  • त्यानंतर तुमच्यापुढे प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेचे होमपेज उघडेल.
  • त्यात मेनू बारमध्ये Awaasoft या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यात तुम्हाला Report हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला Social Audit Reports (H) यात जाऊन Beneficiary Details for verification यावर क्लिक करा.
  • तुमच्यापुढे एक नवीन पेज ओपन होईल.
  • त्या पेज मध्ये तुमचे राज्य जिल्हा गावाचे नाव इत्यादी टाकून प्रधानमंत्री आवास योजना यावर क्लिक करा.
  • त्यानंतर कॅपच्या कोड टाकून सबमिट बटन वर क्लिक करा.

PM Awas Yojana Gramin ग्रामीण सूची काय आहे?

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देशातील गरीब आणि बेघर लोकांसाठी घर बनवण्यासाठी आर्थिक राशी दिली जाते. या रकमेच्या मदतीने गरिबी रेषेच्या खाली जीवन जगणाऱ्या नागरिकांना स्वतःचे सक्षम घर बनवण्यासाठी मदत केली जाते.
या योजनेद्वारे भारतातील बेघर आणि गरीब नागरिकांना घर देण्यासाठी सरकार हे कार्य करत आहे. पीएम आवास योजनेचे दोन प्रकार आहेत. पहिला ग्रामीण आणि दुसरा Urban जे शहरी क्षेत्रासाठी असते.

Leave a Comment