Shettale Yojana 2025:
महाराष्ट्र सरकार नेहमीच राज्यातील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवीत असते. आता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली आहे. मागेल त्याला शेततळे योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांच्या पिकांना पाण्याचा स्रोत उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाच्या विभागाद्वारे सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शेततळे तयार करण्यासाठी अनुदान दिले जाते.
या पोस्टमध्ये मागेल त्याला Shettale Yojana 2025 योजनेबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे. जसे की मागेल त्याला शेततळे अनुदान योजनेबद्दल पूर्ण माहिती, या योजनेसाठी लागणारी पात्रता योजना नेमकी काय आहे, उद्दिष्टे, कागदपत्रे, ऑनलाईन नोंदणी, ऑफलाइन अर्ज इत्यादी सर्व माहिती पाहणार आहोत. तरी विनंती आहे की आमची पोस्ट शेवटपर्यंत पहा.
राज्यातील बऱ्याच नागरिकांचा पारंपरिक व्यवसाय शेती आहे. त्यांच्या कुटुंबाचे जीवन हे शेती पिकावर अवलंबून असते. परंतु काही वेळा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आणि राज्यातील काही भागातील शेती ही कोरडवाहू आहे. यामुळे शेतकऱ्यांना कोरडवाहू शेती करताना नेहमी पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागते.
या सर्व कारणांमुळे शेती उत्पादनावर खूप परिणाम होतो आणि शेतकऱ्यांचे नुकसान होते सततच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेततळे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकऱ्याला त्याच्या जमिनीसाठी नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने 9 फेब्रुवारी 2016 रोजी शेततळे योजना मंजूर करण्यात आली आणि महाराष्ट्र जलसंधारण महामंडळासाठी 10000 कोटींची तरतूद केली.
या योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे व त्यांना या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 30 x 30 x 3 मीटर या आकारमानाची व कमीत कमी 15 x 15 x 3 मीटर या आकारमानाचे शेततळे देण्यात येईल. या योजनेअंतर्गत शेततळ्यासाठी 50000 रुपये इतके अनुदान निश्चित करण्यात आले आहे.
मागेल त्याला शेततळे योजना
योजनेचे नाव | Shettale Yojana 2025 |
---|---|
कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
लाभार्थी | राज्याचे शेतकरी |
उद्देश्य | शेतकऱ्यांना शेततळ बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे |
लाभ | 50 हजार रुपये |
विभाग | महाराष्ट्र शासन |
अधिकृत वेबसाईट | https://mahaonline.gov.in/ |
हे पण वाचा !Vihir Anudan Yojana Maharashtra 2025 ! नवीन विहिरीसाठी पाच लाख रुपये अनुदान! लवकरच अर्ज करा!
Shettale Yojana 2025 उद्दिष्टे
- राज्यातील शेतकऱ्यांना शेततळे करण्यासाठी अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक मदत करणे.
- शेतीचे पाण्याविना होणारे नुकसान टाळणे व शेतीचे उत्पादनात वाढ करणे.
- राज्यातील नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित व प्रोत्साहित करणे.
- शेतकऱ्यांच्या सामाजिक तसेच आर्थिक विकास करून त्यांचे राहणीमान सुधारणे.
मागेल त्याला शेततळे अनुदान योजनेचे फायदे
- ज्या भागातील शेतकऱ्यांची कोरडवाहू शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती त्यांना या योजनेचा लाभ होऊन कोरडवाहू शेतीला पाणी मिळेल व उत्पादनात वाढ होऊ शेतकऱ्याच्या आर्थिक जीवनात मदत होईल.
- शेततळ्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा तुटवडा येणार नाही.
- शेती पिकाच्या नुकसानीमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या जातील.
- मागेल त्याला शेततळे योजनेमध्ये मिळणारे अनुदान थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.
मागेल त्याला शेततळे योजनेच्या अटी
- फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच Shettale Yojana 2025 या योजनेचा लाभ मिळेल.
- शेतकऱ्याकडे त्यांच्या नावावर कमीत कमी 0 .6 हेक्टर म्हणजेच दीड एकर जमीन असणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे बांधणे बंधनकारक राहील.
- क्षेत्र तयार करण्याचा आदेश मिळाल्यापासून शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे आवश्यक असते.
- शेतकऱ्याच्या सातबारा उताऱ्यावर शेततळ्याची नोंद घेणे बंधनकारक असेल.
- शेततळ्याच्या दुरुस्तीची आणि निगा राखण्याची जबाबदारी शेतकऱ्यावर राहील.
- पावसाळ्यामध्ये शेततळ्यात गाळ वाहून येणार नाही किंवा साचणार नाही याची दक्षता शेतकऱ्यांनी घ्यावी.
- शेतातून पिकांना पाणी देण्याची व्यवस्था लाभार्थी शेतकऱ्यांनी स्वखर्चाने करावी.
Shettale Yojana 2025 योजनेची पात्रता
- अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे.
- शेतकऱ्यांकडे त्यांच्या नावावर कमीत कमी 0.6 हेक्टर जमीन असावी.
- शेतकऱ्यांनी यापूर्वी इतर कोणत्या योजनेच्या माध्यमातून शेततळे किंवा विहिरी या घटकाचा लाभ घेतलेला नसावा.
- दारिद्र्यरेषेखालील शेतकरी किंवा ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे त्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये प्रथम स्थान देण्यात येईल.
- प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल.
Shettale Yojana 2025 आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- जातीचा दाखला
- जमिनीचा 7-12
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- प्रतिज्ञापत्र
- आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला
- 8-अ प्रमाणपत्र
शेततळे अनुदान अंतर्गत शेततळ्याची जागा कशी निवडावी?
- ज्या जमिनीतून पाणी पाजण्याचे प्रमाण कमी आहे अशी जमीन निवड करण्यास योग्य राहील. काळी जमीन ज्यामध्ये चिकन मातीचे प्रमाण जास्त आहे अशा जमिनी शेततळ्यास योग्य आहे.
- वालुकामय अशी असलेली जमीन शेततळ्यास निवडू नये.
- पाणी टंचाईग्रस्त गावातील लाभक्षेत्रात शेततळे घेण्यात यावी त्यासाठी जलसंपदा विभागाच्या अटी व शर्ती लागू राहतील.
- नाल्याच्या किंवा ओढ्याच्या प्रवाहात शेततळे घेऊ नये.
- शेततळ्याला लागणारी जागा ही शेतकऱ्यांनी स्वखुशीने देणे बंधनकारक आहे.
शेततळे योजना 2025 अर्ज करण्याची पद्धत
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करा.
- यशस्वीपणे नोंदणी झाल्यावर युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावे.
- त्यानंतर होम पेज उघडेल होम पेजवर मागेल त्याला शेततळे या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर अर्ज उघडेल विचारलेली सर्व माहिती अचूकपणे भरून आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावी.
- संपूर्ण माहिती भरून झाल्यावर सबमिट बटन वर क्लिक करावे.
- त्यानंतर ऑनलाईन अर्जाची पावती डाऊनलोड करून स्वतःकडे ठेवावी.
- या प्रकारे शेततळे योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.