Pan Card Apply Online: घरबसल्या नवीन पॅन कार्ड बनवण्यासाठी फॉर्म प्रक्रिया सुरू! लवकर अर्ज करा!

Pan Card Apply Online:

जे लोक टॅक्स जमा करतात पॅन कार्ड त्या व्यक्तींसाठी अत्यंत गरजेचे असते. पॅन कार्ड हे एक महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे. भारतीय आयकर विभागातर्फे ही कागदपत्रे दिले जातात. हे बनवण्यासाठी अर्ज प्रक्रिया आवश्यक असते.
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता अप्लाय करणे खूप सोपे झाले आहे. आता तुम्हाला सरकारी ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही पण पॅन कार्ड बनवू शकता. यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करावी लागेल.
जर तुम्हाला माहीत नसेल की पॅन कार्ड ऑनलाईन पद्धतीने कसे बनवायचे. तर ही पोस्ट तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगितली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Pan Card Apply Online

पॅन कार्ड चे पूर्ण नाव परमनंट अकाउंट नंबर आहे. या कार्डवर एक युनिक नंबर असतो जो प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळा असतो.
पॅन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज जमा करावा लागतो. ऑनलाइन अर्जाचा हा एक फायदा आहे की तुम्ही घरबसल्या पॅन कार्ड साठी अप्लाय करू शकता.
यासाठी तुम्ही इन्कम टॅक्स, ई-फायलिंग, NSDL किंवा UTIITSL वर जाऊन पॅन कार्ड बनवण्यासाठी अर्ज करू शकता. या तीन ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही काही मिनिटातच तुमचे पॅन कार्ड बनवण्यासाठी अर्ज करू शकता.

Pan Card Apply Online Form Fee:

पॅन कार्ड ला ऑनलाइन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला काही फी द्यावी लागते. पॅन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला 107 रुपये फी जमा करावी लागते. या पद्धतीने तुमचा पॅन कार्ड बनवून झाल्यावर तुमच्या घरी पोस्टाच्या माध्यमातून पाठवले जाते.
पण ई-पॅनकार्ड साठी तुम्हाला 75 रुपये फी जमा करावी लागते. या प्रकारे पॅन कार्ड जेव्हा तयार होते तर ते तुम्हाला ईमेलवर किंवा तुमच्या मोबाईल नंबर वर पॅन कार्ड ची पीडीएफ पाठवली जाते. यास तुम्ही डाऊनलोड करू शकता.

हे पण वाचा:Apaar ID Card Download 2025: अपार कार्ड साठी इथून Apply करून डाऊनलोड करा.

Pan Card Apply Online आवश्यक कागदपत्रे

जेव्हा तुम्ही पॅन कार्ड बनवण्यासाठी अप्लाय करता तेव्हा तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला काही कागदपत्रे सांगतो ते खालील प्रमाणे बघा:

  1. आधार कार्ड
  2. ओळखपत्र
  3. ड्रायव्हिंग लायसन्स
  4. फोटो
  5. पासपोर्ट
  6. राशन कार्ड
  7. रहिवासी प्रमाणपत्र
  8. विज बिल
  9. मोबाईल नंबर
  10. पासपोर्ट साईज फोटो
  11. ई-मेल आयडी
  12. स्वास्थ सेवा कार्ड

Pan Card Apply Online पात्रता

  • भारतात राहणारे लोक पॅन कार्ड बनवण्यासाठी अर्ज करू शकता.
  • याव्यतिरिक्त NRI द्वारे पॅन कार्ड बनवण्यासाठी पण अर्ज प्रक्रिया करू शकता.
  • पॅन कार्ड बनवण्यासाठी तुमच्याजवळ संपूर्ण महत्त्वाच्या आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
  • बिना कागदपत्रांचे तुम्ही अर्ज करू शकत नाही.

Pan Card Apply Online दोन पद्धतीने काढू शकता:

1.NSDL Portal
2.UTIITSL Portal

Pan Card Apply Online NSDL

जर तुम्ही एनएसडीएल द्वारे पॅन कार्ड बनवण्यासाठी अप्लाय करू इच्छित असाल खाली दिलेल्या स्टेपला अवश्य फॉलो करा:

  1. सर्वात आधी NSDL च्या अधिकृत पेजवर जा.
  2. होम पेजवर Online Pan Application वर क्लिक करा.
  3. त्यानंतर फॉर्म 49-A व्यवस्थित भरा.
  4. त्यानंतर तुमची सही आणि फोटोला अपलोड करा.
  5. आता तुम्हाला अर्जाची फी जमा करावी लागेल फी ऑनलाईन पद्धतीने भरा.
  6. सर्व प्रक्रिया झाल्यानंतर अर्जाचा फॉर्म सबमिट करा व एक प्रिंट घ्या.
  7. पावतीच्या माध्यमातून तुम्ही पॅन कार्ड चे स्टेटस बघू शकता.

Pan Card Apply Online UTIITSL

  1. सर्वप्रथम तुम्ही UTIITSL च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  2. वेबसाईटच्या होम पेजवर आल्यानंतर फॉर्म 49-A वर क्लिक करा.
  3. आता तुम्हाला पॅन कार्ड बनवण्यासाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
  4. त्यानंतर सही आणि फोटो स्कॅन करून अपलोड करा.
  5. आता तुम्हाला 107 रुपये किंवा 75 रुपये ची ऑनलाईन फी भरावी लागेल.
  6. आता सबमिट बटन वर क्लिक करा व तुम्हाला पॅन कार्ड संबंधित एक पावती मिळेल.
  7. पावतीच्या माध्यमातून तुम्ही पॅन कार्ड चे अर्जाचे स्टेटस सोप्या पद्धतीने चेक करू शकता.
  8. तुमचा पॅन कार्ड दोन आठवड्यानंतर पोस्टाच्या माध्यमातून तुमच्या घरी येईल.

 

FAQs:

1.माझ्या पत्त्यावर पॅन कार्ड कसे पोहोचवले जाईल?
पॅन कार्ड महाराष्ट्रातील पॅन धारकाच्या पत्त्यावर कुरिअर किंवा स्पीड पोस्ट ने पोहोचवले जाईल. जलद पोचवण्यासाठी अर्जासोबत महाराष्ट्रातील संपूर्ण पत्ता दर्शवणारा पत्ता पुरावा सादर करणे आवश्यक आहे.

2.पॅन कार्ड ची डिलिव्हरी घेत असताना मी किंवा पॅन अर्जदाराने महाराष्ट्राच्या पत्त्यावर उपस्थित राहणे आवश्यक आहे का?
पॅन कार्ड डिलिव्हरी करताना पॅन अर्जदाराने महाराष्ट्राच्या पत्त्यावर उपस्थित राहावे अशी शिफारस केली जाते कारण कुरियर डिलिव्हरी मॅन किंवा पोस्टमन सामान्यतः पॅन कार्ड डिलिव्हरी करताना अर्जदाराचा ओळखपत्राचा पुरावा मागतात जर तुम्ही पत्त्यावर उपस्थित नसाल तर तुम्ही तुमच्या नातेवाईकाला ओळखपत्राचा पुरावा दाखवून पॅन कार्ड डिलिव्हरी घेण्यास सांगू शकता.

3.महाराष्ट्रात उत्पन्नाचा स्रोत नसलेला विद्यार्थी पॅन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करू शकतो का?
हो नक्कीच उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसलेला विद्यार्थी महाराष्ट्रात पॅन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करू शकतो.

Leave a Comment