Apaar ID Card Download 2025: अपार कार्ड साठी इथून Apply करून डाऊनलोड करा.
Apaar ID Card Download 2025:
आजच्या डिजिटल जगामध्ये सरकारी योजनांना सोपे बनवण्यासाठी ऑफलाइन मदत दिली जात आहे. जर तुम्ही विद्यार्थी, तरुण किंवा कॉलेजमध्ये शिकत असाल आणि घरबसल्या अपार कार्ड डाऊनलोड करू इच्छिता. Apaar ID( ऑटोमेटेड परमनंट अकॅडमी अकाउंट रजिस्ट्री) भारत सरकार द्वारे सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेचा उद्देश सर्व विद्यार्थ्यांचे एक ओळखपत्र बनवायचे. ओळखपत्र बनवणे खूप सोपे आहे. अपार आयडी भारतातील विद्यार्थ्यांसाठी अकॅडमी रेकॉर्ड मॅनेजमेंट करण्यासाठी डिझाईन केलेली एक डिजिटल व्यवस्था आहे.
रजिस्ट्रेशन पासून तर डाऊनलोड करण्यापर्यंत ची सर्व प्रक्रिया साध्या आणि सोप्या भाषेत सांगितले आहे. तर ही पोस्ट तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. इथे तुम्हाला Apaar ID Card Download 2025 बद्दल पूर्ण माहिती दिली जाईल.
Apaar ID Card Download 2025 आवश्यक कागदपत्रे:
ऑनलाइन पद्धत सुरू करण्याच्या आधी तुम्ही निश्चित करा की तुमच्याजवळ सर्व कागदपत्रे आहेत जसे:-
1. आधार कार्ड
2. आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर
3. या कागदपत्रांच्या मदतीने तुम्ही ओटीपी व्हेरिफिकेशन करू शकता.
हे देखील वाचा ! 50000 ची स्कॉलरशिप मिळवा! जाणून घ्या आवश्यक माहिती!
डीजीलॉकर App चा वापर का गरजेचा आहे: Apaar ID Card Download 2025
अपार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला डिजिलॉकर ॲपचा वापर करावा लागेल. हे एक सरकारी मोबाईल ॲप्लिकेशन आहे. जे डिजिटल कागदपत्रांना सुरक्षित पद्धतीने स्टोर आणि शेअर करण्याची सुविधा देते.
Apaar ID Card Download 2025 डाऊनलोड करण्याची प्रक्रिया:
1.डीजीलॉकर ॲप डाऊनलोड करून अकाउंट रजिस्ट्रेशन करा:
- सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये गुगल प्ले स्टोअर ओपन करा.
- सर्च बॉक्समध्ये जाऊन डीजीलॉकर ॲप टाईप करा आणि त्याला डाऊनलोड करा.
- ॲप इंस्टॉल झाल्यानंतर ओपन करा.
- ॲप मध्ये सुरुवातीला पूर्ण सेटिंग करा आणि तुमची भाषा निवडा.
- “Lets Go” आणि “Get Started” या पर्यायांवर क्लिक करा.
- “खाता बनवा” हा पर्याय निवडा व त्यात नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी अशी महत्त्वाची माहिती टाका.
- त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल तो तिथे टाका.
2. लॉगिन करून अपार आयडी डाऊनलोड करा:
- डीजीलॉकर ॲप मध्ये लॉगिन करा.
- ॲपच्या डॅशबोर्ड वर जा.
- सर्च बॉक्समध्ये अपार टाईप करा.
- अपार /एबीसी आयडी कार्ड चा पर्याय दिसेल त्याला निवडा.
- आधार नंबर आणि इतर मागितलेली माहिती भरा.
- कागदपत्रे निवडा वर क्लिक करा.
- तुमचा अपार आयडी कार्ड तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
- त्या कार्डला पीडीएफ रूपामध्ये डाऊनलोड करा.
Apaar ID Card Download 2025: अपार कार्डाचे लाभ
डिजिटल एक्सेसिबिलिटी: आता तुम्हाला कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही.
वेळेची बचत होते: ही पूर्ण प्रक्रिया केवळ पाच मिनिटात पूर्ण होते.
सुरक्षा: तुमचे कार्ड डिजिलॉकर ॲप मध्ये सुरक्षित राहील.
सरकारी योजनांचा लाभ: Apaar ID कार्डच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेचा लाभ मिळेल. तसेच स्कॉलरशिप, मॅट्रिक, एंटर परीक्षा फॉर्म, इ.
Apaar ID कार्ड भविष्यामध्ये उच्च शिक्षण स्पर्धा परीक्षा किंवा नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रांच्या रूपात कामाला येईल.
डिजिटल प्रमाणपत्र: Apaar ID हे एक डिजिटल प्रमाणपत्र आहे. याला ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करू शकतो.
Apaar ID कार्ड शिक्षण प्रणाली मध्ये पारदर्शिता येते आणि विद्यार्थी हे रेकॉर्ड डिजिलॉकर च्या माध्यमातून सोप्या पद्धतीने ट्रेक करू शकतात.
Apaar ID Card Download 2025 महत्त्वाच्या लिंक:
Apaar Card Download: येथे क्लिक करा
Apaar Card Apply:- येथे क्लिक करा
हे देखील वाचा ! 50000 ची स्कॉलरशिप मिळवा! जाणून घ्या आवश्यक माहिती!
Apaar ID Card Download 2025 उद्देश
या पोस्टमध्ये आम्ही या प्रक्रियेबद्दल बारकाईने समजून सांगितले आहे.ही प्रक्रिया सरळ सोपी आणि सुरक्षित आहे .तुम्ही केवळ तुमच्या फोन आणि इंटरनेटच्या मदतीने घरबसल्या अपार आयडी कार्ड प्राप्त करू शकता.अपार आयडी लाच वन नेशन वन स्टूडेंट म्हणतात. शिक्षण मंत्रालय आणि भारत सरकारने पूर्ण भारत देशामध्ये विद्यार्थ्यांसाठी आयडी बनवण्यासाठी राष्ट्रीय शिक्षा निती 2020 च्या नुसार अपार आयडी कार्ड लॉन्च केले आहे.
आई वडिलांची सहमती घेऊनच स्कूल आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अपार कार्ड दिले जाईल.आम्ही आशा करतो की ही पोस्ट तुम्हाला उपयोगी साबित झाली असेल झाली असेल.तर तुमच्या मित्रांना किंवा परिवारां सोबत पोस्ट नक्की शेअर करा कारण ते पण या प्रक्रियेचा लाभ घेऊ शकतील.
FAQs वारंवार विचारले जाणारे प्रश्न:
1. ऑनलाइन अपार आयडी कार्ड कसे डाउनलोड करायचे?
तुम्ही DigiLocker च्या माध्यमातून डाऊनलोड करू शकता.ॲपवर लॉगिन करा.हा Apaar पर्याय सर्च करा आणि तुमची माहिती द्या.
2. अपार आयडी कुठे मिळते?
तुमच्या Apaar ID Card डीजी लॉकर ॲपच्या Issued Document सेक्शन मध्ये मिळेल.