Ayushman Card List: मिळणार 5 लाख पर्यंतचा मोफत इलाज! बघा लाभार्थ्यांची यादी!

Ayushman Card List:

भारत सरकारने आयुष्यमान भारत योजना (Ayushman Bharat Yojana) अंतर्गत आयुष्यमान कार्ड च्या नवीन लाभार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. ही योजना देशातील गरीब आणि दुर्बळ कुटुंबांसाठी पाच लाख पर्यंतचा मोफत स्वास्थ्य इलाज (Free Health Insurance) देते. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या नागरिकांना भारतामधील कोणत्याही हॉस्पिटलमध्ये मोफत इलाज दिला जाईल. आयुष्यमान भारत योजनेचा उद्देश देशातील जवळपास 50 करोड लोकांना स्वास्थ्य सेवा उपलब्ध करून देणे हा आहे.
या योजनेचा फायदा अशा लोकांना होतो जे महाग इलाज करू शकत नाही. या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला आयुष्यमान कार्ड ची लाभार्थी यादी मध्ये तुमचे नाव चेक करणे कार्ड डाउनलोड करणे आणि योजना संबंधी इतर महत्त्वपूर्ण माहिती याबद्दल सविस्तर सांगितले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ayushman Card List अधिक माहिती

योजनेचे नाव आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
उद्देश गरीब आणि दुर्बळ कुटुंबांना स्वास्थ विमा देणे
लाभ प्रत्येक परिवाराला दरवर्षाला पाच लाख रुपये पर्यंतचा मोफत इलाज
पात्रता वृद्ध नागरिक
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट pmjay.gov.in

PM Awas Yojana 2025: पीएम आवास योजनेचे ऑनलाईन ग्रामीण रजिस्ट्रेशन सुरू! लवकरच अर्ज करा व लाभ घ्या!

Ayushman Card List काय आहे?

आयुष्मान कार्ड प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत लाभार्थ्यांना एक ओळखपत्र दिले जाते. या कार्डच्या माध्यमातून लाभार्थी सरकारी दवाखान्यात 5 लाख पर्यंतचा मोफत इलाज करू शकतात. हे कार्ड लाभार्थ्यांचे ओळख आणि पात्रता सादर करण्यास मदत करते.

आयुष्यमान कार्डचे लाभ:

  • मोफत इलाज कार्ड असलेल्या नागरिकांना दवाखान्यात पाच लाख रुपयांचा मोफत इलाज करून मिळतो.
  • देशभरात मान्यता या कार्डची पूर्ण देशभरात मान्यता आहे.
  • हे कार्ड एक ओळखपत्र आहे ज्यामुळे कामात पारदर्शिता येते.

आयुष्मान कार्डचे फायदे:-

  1. ₹5 लाखांपर्यंत मोफत उपचार – वार्षिक.

  2. देशभरातील 25,000+ रुग्णालयांमध्ये वैध.

  3. हृदयविकार, कॅन्सर, किडनी ट्रान्सप्लांट यासारख्या मोठ्या आजारांवर मोफत उपचार.

  4. औषधे, टेस्ट, अ‍ॅडमिशन शुल्क यांसाठीही कव्हरेज.

  5. कुटुंबातील सर्व सदस्यांना कव्हरेज (कुंटुंब मर्यादा नाही).

आयुष्यमान कार्डा-अंतर्गत केले जाणारे उपचार:-

खाली दिलेल्या माहिती मध्ये आयुष्मान भारत के अंतर्गत येणाऱ्या आजारांची यादी दिलेली आहे.

क्र. सं. स्पेशलिटी खर्च मर्यादा
1 भाजणे ₹ 7,000 से ₹ ​​80,000
2 Cardiology ₹ 5,000 से ₹ ​​1,10,000
3 Cardiothoracic and Vascular Surgery ₹ 1,000 से ₹ ​​2,70,000
4 अतिदक्षता

(12 तासांपेक्षा कमी वेळ असलेली सेवा)

₹ 1,700 से ₹10,000
5 साधी औषधे ₹ 2,700 से ₹ ​​4,500
6 जनरल सर्जरी ₹ 1,500 से ₹ ​​51,600
7 interventional Neuroradiology ₹ 70,000 से ₹ ​​1,60,000
8 medical oncology ₹ 5,800 से ₹ ​​1,60,000
9 मानसिक विकार package ₹ 1,000 से ₹ ​​10,000
10 नवजात बालक देखभाल package ₹ 500 से ₹ ​​15,000
11 Neurosurgery ₹ 15,000 से ₹ ​​75,000
12 प्रसूति /स्त्री रोग ₹ 9,900 से ₹ ​​38,500
13 नेत्र विज्ञान ₹ 3,000 से ₹ ​​23,900
14 Oral and Maxillofacial Surgery – OMFS ₹ 500 से ₹ ​​15,000
15 हाडांचे आजार ₹ 2,000 से ₹ ​​1,77,000
16 Otorhinolaryngology ₹ 1,200 से ₹ ​​48,900
17 बाल उपचार व्यवस्थापन ₹ 1,800 से ₹ ​​45,000
18 बाल उपचार शस्त्रक्रिया ₹ 5,000 से ₹ ​​30,000
19 Plastic and Reconstructive Surgery ₹ 2,000 से ₹ ​​50,000
20

Polytrauma

₹ 1,000 से ₹ ​​75,000
21 Radiation Oncology ₹ 1,100 से ₹ ​​90,000
22

Surgical Oncology

₹ 20,000 से ₹ ​​98,000
23 urology ₹ 1,000 से ₹ ​​42,000
24 Paediatric cancer ₹ 5,000 से ₹ ​​30,000
25 Unspecified Surgical Package ₹ 330 से ₹ ​​5,000

Ayushman Card लाभार्थी यादीत नाव कसे चेक करायचे?

तुम्ही खाली दिलेल्या स्टेपने आयुष्यमान कार्ड लाभार्थी सूची मध्ये नाव चेक करू शकता:

1.अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून

  • सर्वात आधी आयुष्यमान भारत योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
  • तुमचा मोबाईल नंबर टाका आणि Verifiy वर क्लिक करा.
  • रजिस्टर केलेला मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो टाका आणि लॉगिन वर क्लिक करा.
  • स्कीमचे नाव राज्याचे नाव आयडी फॅमिली आयडी लोकेशन आणि आधार नंबर सारखे आवश्यक माहिती टाका.
  • आता तुम्ही Ayushman Card List मध्ये तुमचे नाव बघू शकता.

2.NHA Beneficiary Portal च्या माध्यमातून

  • अधिकृत पोर्टल वर जा: Ayushman Card List अधिकृत पोर्टलवर जा.
  • लॉगिन करा: तुमचा मोबाईल नंबर आणि आधार ओटीपी चा उपयोग करून लॉगिन करा.
  • माहिती टाका: तुमचा जिल्हा राज्य आणि इतर आवश्यक माहिती टाका.
  • Ayushman Card List पहा: आता तुम्ही तुमच्या परिवारातील सदस्यांची आयुष्मान कार्ड यादी आणि स्टेटस बघू शकता.

3. लोकेशनच्या माध्यमातून

  • अधिकृत वेबसाईटवर जा: NHA च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • लॉगिन करा: तुमचा आधार लिंक असलेला मोबाईल नंबर यावर ओटीपी प्राप्त होईल तो टाकून लॉगिन करा.
  • लोकेशन साठी माहिती द्या: तुमचे राज्य जिल्हा गाव व शहर याची माहिती द्या.
  • यादी बघा: सर्च आयकॉन वर क्लिक करून लाभार्थी सूची बघा.

Ayushman Card डाऊनलोड कसे करावे?

  • आयुष्यमान कार्ड डाउनलोड करण्यासाठी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • तुमचा मोबाईल नंबर आणि ओटीपी च्या माध्यमातून लॉगिन करा.
  • लाभार्थी सूची मध्ये तुमच्या नावापुढे डाऊनलोड आयकॉनवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्या आयुष्मान कार्ड डाऊनलोड करा आणि प्रिंट काढा.

Ayushman Card List पात्रता

  • पात्र लाभार्थी हा भारताचा कायमचा निवासी असावा.
  • लाभार्थ्याचे नाव सामाजिक आर्थिक जाती जनगणना 2011 मध्ये असावे.
  • वृद्ध व्यक्तींना या योजनेचा अधिक लाभ होईल.
  • काही राज्यांमध्ये राष्ट्रीय स्वास्थ विमा योजनेचे लाभार्थी पण शामिल आहे.

PM-JAY अंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्रता ही 2011 च्या सामाजिक आर्थिक जात गणनेच्या (SECC) आधारे ठरवली जाते.

ग्रामीण भागासाठी पात्रतेची लक्षणे:

  • कच्चे घर

  • भूमिहीन मजूर

  • अनुसूचित जाती / जमाती

  • अपंग व्यक्ती असलेले घर

  • दिव्यांग व्यक्ती

  • भिक्षा मागणारे

  • बेघर

शहरी भागासाठी:

  • रिक्षा/टॅक्सी चालक

  • सफाई कामगार

  • बांधकाम मजूर

  • घरकाम करणारे

  • फेरीवाले

💡 महत्त्वाचे: आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्ग (EWS), बीपीएल (BPL) यादीतील कुटुंबे देखील पात्र ठरतात.

आयुष्मान कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. मोबाईल नंबर
  3. पॅन कार्ड
  4. ईमेल आयडी
  5. रहिवासी दाखला
  6. जात प्रमाणपत्र

लाभार्थीचे नाव यादीत नसेल तर काय करावे?

सर तुमचे नाव आयुष्मान काढला भारती यादी मध्ये नसेल तर खालील प्रमाणे स्टेपला फॉलो करा:

  1. हेल्पलाइन ला संपर्क करा: आयुष्यमान भारत योजनेच्या हेल्पलाइन नंबर वर संपर्क करा.
  2. जवळच्या दवाखान्यात संपर्क करा: तुमच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन किंवा आयुष्यमान मित्राला संपर्क करा.
  3. ऑनलाइन तक्रार नोंदवा: तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता.

निष्कर्ष

आयुष्यमान भारत योजना एक महत्वकांक्षी योजना आहे जी देशातील गरीब आणि कमजोर कुटुंबांना स्वास्थ सुरक्षा देते. जर तुम्ही पात्र आहे आणि लवकरात लवकर तुमचे आयुष्यमान कार्ड बनू इच्छित असाल तर लवकरात लवकर कार्ड बनवा. डिजिटल माध्यमातून लाभार्थी यादी ची चौकशी आणि कार्ड डाउनलोड करण्याच्या सुविधेने या योजनेला सोपे बनवले आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1. आयुष्मान कार्ड मिळवण्यासाठी पैसे लागतात का?
➡️ नाही. कार्ड पूर्णतः मोफत आहे.

Q2. मी गरीब आहे पण माझं नाव यादीत नाही. मग काय करावं?
➡️ जवळच्या CSC केंद्रात जाऊन नोंदणी करा.

Q3. कार्ड कधी मिळेल?
➡️ यादीत नाव असल्यास लगेच डाउनलोड करता येते. नवीन नोंदणीसाठी काही दिवस लागू शकतात.

Q4. कोणकोणते रुग्णालये सामील आहेत?
➡️ pmjay.gov.in वर तपासा.

1 thought on “Ayushman Card List: मिळणार 5 लाख पर्यंतचा मोफत इलाज! बघा लाभार्थ्यांची यादी!”

  1. आयुष्मान कार्ड ही खरोखरच एक उपयुक्त योजना आहे, विशेषत: गरीब आणि कमजोर वर्गासाठी. हे कार्ड मोफत उपचाराची सोय उपलब्ध करून देते, ज्यामुळे अनेकांच्या आरोग्याची काळजी घेता येते. डिजिटल सुविधेमुळे योजनेचा वापर करणे अधिक सोपे झाले आहे. मला वाटते की अशा योजना देशातील आरोग्यसेवा सुधारण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला वाटते का की या योजनेचा अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी आणखी काय करता येईल? माझ्या मते, योजनेची माहिती अधिक लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. तुमचे काय मत आहे?

    Reply

Leave a Comment