महाराष्ट्र राज्य सरकारने आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या नागरिकांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव बांधकाम कामगार योजना आहे. या योजनेमागचा उद्देश नागरिकांचे आर्थिक परिस्थिती सुधारणे हा आहे व त्यांचे जीवनमान उंचावणे. या योजनेमार्फत बांधकाम कामगारांना राज्य सरकार तर्फे 2000 ते 5000 पर्यंत सहाय्यता केली जाईल.
Bandhkam Kamgar Yojana 2025 अधिक माहिती:-
योजनेचे नाव | Bandhkam Kamgar Yojana 2025 |
योजनेची सुरुवात कोणी केली | महाराष्ट्र सरकार |
लाभार्थी | राज्यातील बांधकाम कामगार |
विभाग | महाराष्ट्र |
उद्देश्य | आर्थिक मदत करणे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
वेबसाईट | mahabocw portal |
Bandhkam Kamgar Yojana 2025 नेमकी ही योजना काय आहे?
ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार गरीब व आर्थिक परिस्थितीने दुर्बळ असलेल्या बांधकाम कामगारांना 2000 ते 5000 रुपयांपर्यंत रक्कम देते. या योजनेचा लाभ जवळपास 12 लाख मजुरांना मिळत आहे. महाराष्ट्र सरकारने या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सरळ सोपी व्हावी म्हणून महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार मंडळ नावाच्या पोर्टलची स्थापना केली आहे. त्यावर अर्जदार आपला अर्ज भरू शकतो.
हे पण वाचा- आत्ता शेतकऱ्यांना मिळणार आत्ता वर्षाला 12000 रुपयांचा लाभ!
Bandhkam Kamgar Yojana 2025 मुख्य उद्देश:-
तुम्हा सर्वांना माहीतच असेल, की आर्थिक व सामाजिक रित्या दुर्बळ नागरिकांना त्यांच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने Bandhkam Kamgar Yojana 2025 या योजनेची स्थापना केली. या योजनेचा मुख्य उद्देश बांधकाम कामगारांची परिस्थिती सुधारणे आहे. त्यांचे समाजातील जीवनमान उंचावणे. या योजनेच्या माध्यमातून त्यांचा विकास होण्यास मदत होईल.
Bandhkam Kamgar Yojana 2025 पात्रता:-
-अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा निवासी असावा.
-अर्जदाराचे वय हे 18 ते 60 च्या दरम्यान असावे.
-अर्जदारा जवळ स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
-कामगाराने जवळपास तीन महिने काम केलेले असावे व त्याचे प्रमाणपत्र पण त्याच्याजवळ असावे.
-या योजनेचा लाभ घेण्यासाठी जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
Bandhkam Kamgar Yojana 2025 लाभ:-
या योजनेला कामगार सहाय्यता योजना,महाराष्ट्र कोरोना सहाय्यता योजना,महाराष्ट्र निर्माण श्रमिक योजना व कामगार कल्याण योजना इत्यादी नावाने ओळखले जाते. Bandhkam Kamgar Yojana 2025 चा लाभ फक्त महाराष्ट्रातील नागरिकांनाच मिळेल.
या योजनेअंतर्गत कामगारांना 2000 ते 5000 रुपयांपर्यंत ची मदत केली जाईल.
सरकार द्वारे ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात बेनिफिट ट्रान्सफर मोड ने पाठवली जाईल.
सर्व लाभार्थ्यांकडे बँक खाते असणे आवश्यक आहे व ते आधार नंबरची लिंक पाहिजे.
इच्छुक अर्जदार या योजनेचा लाभ घेण्यासाठी विभागाच्या mahabocw पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकता.
Bandhkam Kamgar Yojana 2025 आवश्यक कागदपत्रे:-
1. आधार कार्ड
2. रहिवासी दाखला
3. रेशन कार्ड
4. बँक पासबुक
5. 90 दिवसांचे काम केल्याचे प्रमाणपत्र
6. मोबाईल नंबर
7. फोटो
8. जॉब कार्ड
हे पण वाचा- आत्ता शेतकऱ्यांना मिळणार आत्ता वर्षाला 12000 रुपयांचा लाभ!
Bandhkam Kamgar Yojana 2025 ऑनलाइन अर्ज कसा करावा:-
अर्जदाराने सर्वात आधी mahabocw या पोर्टलवर जावे व यानंतर होमपेज उघडेल.
होम पेजवर गेल्यानंतर तुम्हाला Workers सेक्शन दिसेल त्यात worker registration वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर नवीन पेज उघडेल. त्यात check your eligibility and proceed to register फॉर्म दिसेल.
त्यात तुम्हाला तुमची पात्रता चेक करायची आहे मागितलेली सर्व माहिती टाका. त्यानंतर तुम्हाला सांगावे लागेल की तुम्ही महाराष्ट्रात 90 दिवसापासून काम करत आहात व तुमच्या कडे सगळे आवश्यक कागदपत्रे आहे. सर्व माहिती व्यवस्थित भरून check your eligibility वर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला proceed to form बटन वर क्लिक करायचे आहे.
तुमच्यापुढे एक अर्ज येईल त्यात तुम्हाला सांगितलेली माहिती टाकायची आहे. सर्व माहिती टाकल्यानंतर submit बटन वर क्लिक करा.
FAQ:-
1. बांधकाम कामगार योजना कोणी व कोणासाठी चालू केली?
ही योजना महाराष्ट्र सरकारने चालू केली असून ज्या कामगारांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे. त्यांच्यासाठी ही योजना लाभदायी ठरेल हाच यामागचा उद्देश आहे.
2. या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?
या योजनेचा लाभ हेच नागरिक घेऊ शकतात जे बांधकाम कामगार योजनेत कार्यरत आहेत.
3.या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा?
इच्छुक अर्जदाराने या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा.
4.बांधकाम कामगार योजनेमध्ये लाभार्थ्यांना कोणत्या वस्तू मिळतात?
कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी 30,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. योजनेअंतर्गत कामगारांना दोन वेळचे मोफत जेवण दिले जाते. प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ दिला जातो.विजेरी तसेच बांधकाम साहित्य सेफ्टी बूट पण मिळतात.