Gharkul Yojana in Maharashtra 2025 महाराष्ट्राला 20 लाख घरे मंजूर महाराष्ट्र आता थांबणार नाही पहा सविस्तर बातमी

Gharkul Yojana in Maharashtra 2025:

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांनी मागील भाषणात सांगितले की,यावर्षी केंद्र सरकारने 65000 घर मंजूर केली होती ते टारगेट वाढवण्यात आलेलं आहे अतिरिक्त 13 लाख घरे आपल्याला देण्यात आलेले आहे.
यावर्षी केंद्र सरकारच्या वतीने महाराष्ट्रातल्या बेघर व त्याच्या घरात राहणाऱ्या लोकांकरता एका वर्षात 20 लाख घर देण्याची घोषणा केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चव्हाण (shivraj singh chauhan) यांनी केली आहे. महाराष्ट्रातला मोदी सरकारने दिलेली ही सर्वात मोठी भेट आहे. इतिहासात कुठल्याही राज्याला एका वर्षात वीस लाख घरे  देण्यात आलेली नाहीत ती आपल्याला मिळाली आहेत. या आवास प्लस मध्ये 26 लाख लोकांची नोंदणी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

20 लाख घर मिळाल्यामुळे या यादीतील आता फार कमीत कमी लोक बेघर राहतील की जे पुढच्या वर्षी पूर्ण होतील. तसेच अशी देखील घोषणा करण्यात आली आहे की पूर्वी जे निकष होते ते देखील कमी केले असून ज्यांची ज्यांची नावे सुटली होती आणि जे खरे बेघर आहेत मग ते शेतकरी असो किंवा महिला असो अशा सगळ्या लोकांना नव्या सर्वेक्षणामध्ये घेण्यात येणार आहे आणि ती जी यादी बनेल त्या यादीतल्या सर्व लोकांना येत्या 5 वर्षांमध्ये घर देण्याचा निर्णय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. त्यामुळेच Gharkul Yojana in Maharashtra 2025 योजनेची जोरदार तयारी सुरु आहे.

भारत सरकारच्या घरकुल योजना 2025 प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ग्रामीण भागातील गरीब आणि दुर्बल घटकातील कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेत 1.20 लाख ते एक पॉईंट तीस लाख रुपये पर्यंत अनुदान मिळू शकते. त्यात रोजगार हमीची 28 हजार व शौचालयाचे 12000 असे एकूण एक लाख 60 हजार पर्यंत अनुदान मिळते. 22 फेब्रुवारी रोजी झालेल्या घरकुल योजना कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री यांनी यात वाढ करत मोठी घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये तुम्हाला घरकुल योजनेबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल.

हे देखील वाचा:-सरकार देणार मुलींना 60000 हजार रुपये जाणून घ्या काय आहे ही योजना

महाराष्ट्र शासनाने येत्या वर्षात Gharkul Yojana in Maharashtra 2025 सुरू केली आहे. या योजनेचा एकमेव उद्देश म्हणजे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील व मागासवर्गीय व बौद्ध समाजातील नागरिकांना घरबांधणीसाठी आर्थिक मदत केली जाते.

Gharkul Yojana in Maharashtra 2025 या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी अर्जदार हा दीर्घकालीन रहिवासी असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती जमाती व मागासवर्गीय किंवा बौद्ध समाजातील नागरिक असावा. तरच त्या नागरिकाला या योजनेचा लाभ घेता येईल .अर्जदाराकडे पात्रतेसाठी आधार कार्ड ,रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, ओळखपत्र ,पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाते .अर्जदाराने महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर जाऊन माहिती भरून आणि लागणारी कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा व अर्जाची छाननी झाल्यानंतर पात्र अर्जदारांची यादी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये फलकावर लावली जाते.

प्रति लाभार्थी दिली जाणारी अनुदान:-

ग्रामीण भागात:- 120000
डोंगरी भागात:- 130000

लाभार्थी निवड प्रक्रिया:-

  • आर्थिक सामाजिक व जात सर्वेक्षण 2011 मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादी ची माहिती ती आवास सॉफ्ट वर उपलब्ध आहे या याद्या ग्रामसभेसमोर ठेवून त्यातून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.
  • प्राधान्यक्रम यादी बेघर एक खोली लाभार्थी दोन खोली लाभार्थी यानुसार निश्चित केलेली आहे.
  • 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब.
  • महिला कुटुंबप्रमुख व 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब.
  • 25 वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती नसलेले कुटुंब.
  • अपंग व्यक्ती कुटुंब ज्यात शारीरिक दृष्ट्या सक्षम प्रवृत्ती नाही.
  • भूमिहीन कुटुंब ज्यांचे उत्पन्न स्त्रोत मोलमजुरी आहे.

Gharkul Yojana in Maharashtra 2025 या योजनेमध्ये सपाट जमीन असलेल्या भागासाठी 120000 तर डोंगराळ भाग असलेल्या घरांसाठी 130000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाच्या बांधणीसाठी 12000 पर्यंत आणि मनरेगा मध्ये 90 दिवसाच्या रोजगाराची हमी दिली जाते. या योजनेमुळे गरीब जनतेला दिलासा मिळणार आहे. स्वतःचे परिपक्वव घर मिळण्याचे स्वप्न या योजनेमुळे गरिबांचे स्वप्न पूर्ण होणार आहेत.

हे देखील वाचा:-सरकार देणार मुलींना 60000 हजार रुपये जाणून घ्या काय आहे ही योजना

Gharkul Yojana in Maharashtra 2025 या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:-

  • सातबारा उतारा/ मालमत्ता नोंद पत्र/
  • ग्रामपंचायत प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • निवडणूक ओळखपत्र
  • विद्युत बिल
  • मनरेगा जॉब कार्ड
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  •  उत्पन्नाचा दाखला

अर्ज कुठे करावा:-

ग्रामपंचायत व पंचायत समिती

Gharkul Yojana in Maharashtra 2025 पात्रता:

या योजनेचा लाभ स्थायिक नागरिक घेऊ शकतात. हा अर्ज भरण्यासाठी लाभार्थ्याची वय हे 18 वर्षापेक्षा अधिक पाहिजे अर्ज भरणारा व्यक्ती हा गरीब व मागासवर्गीय असावा व त्याने यामागे कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तरच त्या अर्जदारास या योजनेचा लाभ घेता येईल.

Gharkul Yojana in Maharashtra 2025 योजना केंद्र आणि राज्य सरकारकडून आहे.
ही योजना गरीब नागरिकांसाठी खूप लाभदायक ठरू शकते. या योजनेमुळे कोणीही बेघर राहणार नाही.

योजनेचा विभाग ही योजना केंद्र आणि राज्य सरकारकडून आहे
लाभार्थी उमेदवार अनुसूचित जाती व जमातीतील व मागासवर्गीय आणि बौद्ध समाजातील नागरीक .
लाभार्थी उमेदवाराचे
ठिकाण
महाराष्ट्रातील रहिवासी
घरकुल अनुदान 130000
एकूण घरकुल 1300000
Gharkul Yojana in Maharashtra website उपलब्ध नाही

 

अधिक माहितीसाठी अधिकृत website ला भेट द्या.

Leave a Comment