Gram Sevak Selection Process:
ग्रामसेवक पदासाठी उमेदवारांची निवड कशा पद्धतीने होते? कोणकोणती पात्रता निकष आहेत? ग्रामसेवक होण्यासाठी काय काय करावे लागते? याबद्दलची सविस्तर माहिती या लेखात मी दिली आहे. जर तुम्ही ग्रामसेवक होण्यासाठी तयारी करत आहात, तर तुमच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची असणार आहे. सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत ही माहिती काळजीपूर्वक वाचा. या आर्टिकल मध्ये महत्त्वाची माहिती दिली आहे, त्यामुळे स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या तुमच्या मित्रांना देखील या आर्टिकल नक्की शेअर करा.
जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधामध्ये आहेत आणि खास करून ग्रामसेवक अशा पदांसाठी अर्ज करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची संधी आहे. सरकारने 2025 मध्ये दीड लाख पेक्षाही अधिक पदांची भरती करण्याची घोषणा केली आहे ज्यामध्ये दहावी आणि बारावी पास उमेदवारांसाठी अर्ज करण्याची एक नवीन संधी दिली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये मेरिट आधारित निवड आणि लेखी परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल
ग्रामसेवक पदासाठी ज्यावेळी राज्य सरकारद्वारे भरती निघेल तेव्हा सुरुवातीला अर्जदार उमेदवारांना gram Sevak Bharti 2025 साठी अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.
तुम्ही किंवा ग्रामसेवक पदासाठी तयारी केली किंवा अभ्यास केला सर्व काही माहिती मिळवली पण भरती निघाल्यावर अर्ज केला नाही तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला ग्रामसेवक पदासाठी भरती निघाली आहे का, याची माहिती असणे आवश्यक आहे. जेव्हा ग्रामसेवक भरती निकाल तेव्हा आपण आपल्या महा अपडेट्स या साईट वरती जॉब अपडेट देणार आहोत त्यासाठी तुम्ही अप टू डेट राहावे.
Gram Sevak qualification:
ग्रामसेवक भरतीसाठी राज्य शासनाद्वारे काही पात्रता निकष जाहीर केले आहेत, त्यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा या सर्व बाबी समाविष्ट आहेत. उमेदवार निवडला जाणार की नाही हे त्याच्या निकषांवर अवलंबून असते.
Gram Sevak education details ग्रामसेवक शैक्षणिक पात्रता निकष(Gram Sevak Selection Process):
- अर्जदार उमेदवाराने बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले असावे तसेच बारावी मध्ये उमेदवाराला 60 टक्के पेक्षा जास्त गुण असावेत.
- उमेदवार हा जर पदवीधर असेल तर वरील निकष त्यावर लागू होणार नाही.
- जर उमेदवारांनी कृषी क्षेत्रातील पदवी मिळवली असेल तर उमेदवाराला या भरती प्रक्रियेमध्ये प्राधान्य दिले जाऊ शकते.
- कोणत्या क्षेत्रातील पदवीधारक ग्रामसेवक भरतीसाठी अर्ज करू शकतात.
- जर उमेदवार पदवीधर असेल तर उमेदवाराला टक्केवारीची अट लागू असणार नाही पदवीधर उमेदवार gram Sevak Bharti 2025 साठी थेट फॉर्म भरू शकतात.
Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्र पोलीस दलात 33000 पदे रिक्त पदांची मेगा भरती !
Gram Sevak Selection Process age limit:
- ग्रामसेवक पदासाठी महाराष्ट्र शासनाने काही अटी लावून दिले आहेत त्यामध्ये वयाची अट ही प्रमुख आहे.
- जे उमेदवार ग्रामसेवक पदासाठी अर्ज करू इच्छिता त्यांचे वय कमीत कमी 18 वर्षे असणे आवश्यक आहे.
- अर्जदार उमेदवाराची वय हे जास्तीत जास्त 38 वर्ष असावे केवळ 18 ते 38 वर्ष वयोगटातील उमेदवार ग्रामसेवक भरतीसाठी अर्ज करू शकतात.
- ग्रामसेवक भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना वरती दिलेल्या अटी लागू आहेत परंतु जर तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गातील असाल तर तुम्हाला वयोमर्यादा निकषांमध्ये सूट देण्यात येते.
- ज्यावेळी शासनाद्वारे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होईल त्यावेळी जाहिरातीमध्ये वयोमर्यादा निकषांमध्ये मागासवर्गीय उमेदवारांना देण्यात येणारी सूट नमूद केलेली असते.
Gram Sevak Exam Details
Gram Sevak Selection Process
ग्रामसेवक भरतीसाठी एकूण 200 मार्काची लेखी परीक्षा असते, एकूण पाच विषय असतात प्रश्नांची संख्या ही शंभर असते आणि प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क दिलेले असतात त्यामुळे पेपर 200 मार्काचा असतो.
ग्रामसेवक भरतीसाठी परीक्षा ही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नुसार नाही. जरी एखादा प्रश्न चुकला तर त्यासाठी अधिकचे मार्क कट केले जात नाहीत. त्यामुळे तुम्हाला पूर्ण पेपर सोडवता येतो, यातूनच तुमच्या पासिंगची शक्यता वाढण्यास मदत होते.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामसेवक भरतीसाठी चा पेपर हा एम सी क्यू स्वरूपात असतो त्यामुळे तुम्हाला जास्त लेखी स्वरूपात प्रश्न सोडवावे लागत नाहीत प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतात त्यापैकी कोणताही एक पर्याय निवडायचा असतो.
विषय | प्रश्नांची संख्या | एकूण मार्क |
मराठी | 15 | 30 मार्क |
इंग्रजी | 15 | 30 मार्क |
अंकगणित व बुद्धिमत्ता | 15 | 30 मार्क |
सामान्य ज्ञान | 15 | 30 मार्क |
कृषी आणि तांत्रिक | 40 | 80 मार्क |
Gram Sevak Selection Process:
ग्रामसेवक भरती अंतर्गत अर्जदार उमेदवारांची निवड प्रक्रिया ही खालील प्रमाणे असणार आहे, यामध्ये काही टप्पे देण्यात आले आहेत त्यानुसार जे उमेदवार या टप्प्यांमध्ये उत्तीर्ण होतील फक्त त्यांना ग्रामसेवक पदावर नियुक्ती मिळणार आहे.
- Gram Sevak Selection Process साठी सुरुवातीला अर्जदार उमेदवारांची पात्रता तपासली जाते यासंबंधी पात्रता निकष वर सर्व माहिती दिली आहे.
- पात्रता तपासून झाल्यावर उमेदवारांना ग्रामसेवक भरतीसाठी घेतली जाणारी लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे.
- परीक्षेत पास झाल्यानंतर पुढे उमेदवाराची कागदपत्रे पडताळणी केली जाते यामध्ये जर verification वेळेस काही invalid information आढळली तर अशा उमेदवारांना तात्काळ बाद केले जाते.
- जर उमेदवार या कागदपत्रे पडताळणी मध्ये पास होतील तर त्यांची मेरिट लिस्ट काढली जाते.
- मेरिट लिस्ट मध्ये ज्यांची नाव येईल केवळ अशा उमेदवारांना ग्रामसेवक पदासाठी Gram Sevak Selection Process मध्ये निवडले जाईल.
Gram Sevak Selection Process FAQS:
- ग्रामसेवक भरतीसाठी पात्र कोण आहे?
ग्रामसेवक भरतीसाठी अर्जदार उमेदवारांनी किमान बारावी किंवा पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले असावे. ग्रामसेवक भरती पात्रता निकष सविस्तरपणे आर्टिकल मध्ये नमूद केले आहेत. - How to apply for gramsevak post?
ग्रामसेवक पदासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे, त्यांना ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरता येतो. त्यासाठी तुम्हाला जाहिरातीमध्ये दिल्यामुळे त्यानुसार अर्ज करायचा आहे. - What is the age limit for gramsevak post?
ग्रामसेवक पदासाठी वयाची अटी 18 ते 38 वर्ष आहे म्हणजे या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे किमान 18 ते जास्तीत जास्त 38 वर्ष पाहिजे.
ग्रामसेवक पदासाठी भरती बद्दलची माहिती अधिकृत वेबसाइट वर नक्की बघा .