Gramsevak Bharti 2025 : महाराष्ट्र ग्रामसेवक भरती – भरती प्रक्रिया, अभ्यासक्रम, 1000+ जागा, 12वी पास विद्यार्थ्यांनी अर्ज करा!

Gramsevak Bharti 2025:

महाराष्ट्र ग्रामसेवक भरती लवकर सुरू होईल. आपल्या राज्यांमधील वेगवेगळ्या ग्रामपंचायत मध्ये 1000 पेक्षा जास्त रिक्त पदे भरण्याची तयारी सुरू असून ही जाहिरात डिसेंबर २०२५ नंतर जाहीर होण्याची शक्यता आहे.
या भरतीमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे बारावी पास उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आणि कमी पात्रता धारक तरुणांसाठी महत्त्वाची संधी ठरणार आहे. संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाइन होणार असल्याने प्रत्येक उमेदवाराला घरबसल्या अर्ज करता येईल.
ग्रामसेवक पदासाठी मिळणारा पगार 81100 रुपये पर्यंत असल्यामुळे ही नोकरी आर्थिकदृष्ट्या स्थिर करिअर देणारी मानली जाते. या सरकारी नोकरी सोबत मिळणारी सुरक्षितता, भत्ते आणि पद उन्नती संधीमुळे या पदाकडे अनेक उमेदवारांचे आकर्षण वाढले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या भरतीबद्दल पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये दिली आहे, इच्छुक उमेदवारांनी हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा.

Gramsevak Bharti 2025 आढावा:

भरतीची संस्था ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन
भरतीचे नाव Gramsevak Bharti 2025
पदाचे नाव ग्रामसेवक ग्रामपंचायत अधिकारी
रिक्त जागा 1000+
कालावधी 3 वर्षे
कंत्राटी वेतन 16,000 रु.
वेतन 25500 ते 81100
 ठिकाण  महाराष्ट्र
शैक्षणिक पात्रता 12वी पास
वयोमर्यादा
  • सामान्य वर्ग 18 ते 38 वर्ष
  • राखीव वर्ग 18 ते 43 वर्ष
अर्जाची फी माहिती उपलब्ध नाही
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन

 

महत्त्वाची माहिती: महाराष्ट्रातील ग्रामसेवक भरती मध्ये प्रथम उमेदवाराला कंत्राटी स्वरूपात निवडले जाते त्यानंतर तीन वर्ष सेवा दिल्यानंतर मग उमेदवाराला नियमित ग्रामसेवक पदावर नियुक्त करण्यात येते.

Talathi Bharti 2025 , Online Apply For 1700 Vacancy

 

Gramsevak Bharti 2025 पात्रता

  • या भरतीसाठी अर्जदार हा किमान 60 गुणांसह बारावी पास असावा.
  • किंवा अर्जदाराने इंजीनियरिंग डिप्लोमा केलेला असावा तीन वर्षाचा.
  • समाजसेवेचा आणि ग्रामीण अनुभव असल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते.
  • त्याचबरोबर उमेदवारांना संगणक कोर्स केलेले असणे आवश्यक आहे.

Gramsevak Bharti 2025 आवश्यक कागदपत्रे:

  • रहिवासी प्रमाणपत्र
  • अनाथ प्रमाणपत्र
  • खेळाडू प्रमाणपत्र
  • माजी सैनिक असल्यास प्रमाणपत्र
  • दिव्यांग प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमीलेयर
  • जात प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जन्म दाखला
  • आधार कार्ड
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • स्वयंघोषणापत्र

Gramsevak Bharti 2025 निवड प्रक्रिया:

  • मराठी भाषेसाठी एकूण प्रश्न संख्या 15 असते व गुण 30 असते. या भाषेमध्ये व्याकरण, समानार्थी/ विरुद्धार्थी शब्द, शब्द योग, वाक्यरचना इत्यादी. विचारले जाते.
  • इंग्रजीमध्ये सुद्धा प्रश्न संख्या एकूण 15 असते व त्यामध्ये grammar , Vocabulary, sentence formation, comprehension विचारले जाते.
  • सामान्य ज्ञान मध्ये चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, संविधान, पंचायत राज, ग्रामविकास योजना याबद्दल माहिती विचारली जाते.
  • बुद्धिमत्तेमध्ये गणितीय तर्क, आकृती आधारित प्रश्न, रीजनिंग, सिरीज, कोडी विचारले जाते.

Gramsevak Bharti 2025 कागदपत्रे पडताळणी:

  • लेखी परीक्षा झाल्यानंतर त्यावर अर्जदाराचे मेरिट ठरवले जाते.
  • पात्र उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाईल.
  • यामध्ये अर्जदारांचे शैक्षणिक कागदपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे तपासले जातील.
  • जर उमेदवाराच्या कागदपत्रांमध्ये चुका आढळल्यास तर फॉर्म बाद पण होऊ शकतो.

Gramsevak Bharti 2025 Important Links

 

 अधिकृत वेबसाइट इथे क्लिक करा
जाहिरात PDF जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज Apply Online
व्हाट्सअप ग्रुप अपडेटसाठी क्लिक करा

 

Gramsevak Bharti 2025 ऑनलाइन अर्ज प्रक्रिया:

  • सर्वात आधी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होण्याची प्रतीक्षा करा. या भरतीसाठी जाहिरात डिसेंबर 2025 नंतर येण्याची शक्यता आहे.
  • जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर भरतीच्या अधिकृत वेबसाईटवर जा आणि gram Sevak recruitment 2025 किंवा अप्लाय ऑनलाईन या पर्यायावर क्लिक करा.
  • अर्ज करणारा उमेदवार नवीन असल्यास प्रथम रजिस्ट्रेशन करा यासाठी तुमची नाव मोबाईल नंबर ईमेल आणि इत्यादी महत्त्वाची माहिती भरा.
  • रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर लॉगिन करा आणि अर्ज फॉर्म ओपन करा. वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती पत्ता आणि इतर आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
  • आवश्यक असलेली कागदपत्रे जसे बारावी मार्कशीट फोटोसही जात प्रमाणपत्र रहिवासी दाखला इत्यादी दिलेल्या फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
  • अर्जामध्ये भरलेले सर्व माहिती नीट तपासून घ्या आणि सबमिट या बटन वर क्लिक करा.
  • शेवटची स्टेप म्हणून अर्ज फी ऑनलाईन मोडद्वारे भरावी लागेल. पेमेंट यशस्वीरित्या झाल्यावर तुमचा अर्ज पूर्ण समजला जाईल.
  • अर्ज फी भरल्यानंतर मिळणारी पावती डाऊनलोड करून ठेवा.

Gramsevak Bharti 2025 FAQ:

1. Gramsevak Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
ग्रामसेवक या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाते.

2. Gramsevak Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहे?
1000 पदे या भरतीसाठी रिक्त आहेत.

3. Gramsevak पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
या भरतीसाठी अजून अर्ज सुरू झाले नाही, त्यामुळे शेवटची तारीख उपलब्ध नाही.

4. Gramsevak Bharti निवड प्रक्रिया कशी होते?
या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही ऑनलाइन परीक्षा, कागदपत्रे पडताळणी आणि मेरिट लिस्ट या आधारे होणार आहे.

5. ग्रामसेवक पदासाठी वेतन पगार किती आहे?

या पदासाठी वेतन हे 25,500 ते 81100 महिना पर्यंत आहे.

Leave a Comment