Kamgar Kalyan Scholarship:
Kamgar Kalyan Scholarship 2025-26 साठी लवकरच अर्ज सुरू होतील. ही शिष्यवृत्ती महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगार त्यांचे पती-पत्नी आणि मुलांना मदत करणारी सर्वात कल्याणकारी योजनांपैकी एक मानली जाते. ही योजना प्राथमिक शिक्षणापासून ते पदवीपर्यंत अनेक शैक्षणिक ट्रेनिंग मध्ये आर्थिक सहाय्य प्रदान करते.
शैक्षणिक क्षेत्राव्यतिरिक्त ही योजना क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच परदेशातून पदवी उत्तर किंवा पीएचडी कर इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील मान्यता देते.
Kamgar Kalyan Scholarship : महत्त्वाच्या तारखा
कामगार कल्याण शिष्यवृत्तीची सुरुवात आणि शेवटची तारीख अजूनही जाहीर केलेली नाही. खाली दिलेल्या तक्त्यामध्ये नमूद केलेली नोंदणी करण्याची शेवटची तारीख तात्पुरती आहे आणि मागील वर्षाच्या वेळापत्रकावर आधारित आहे.
स्कॉलरशिपचे नाव | अर्ज करण्याची शेवटची तारीख |
सामान्य शिष्यवृत्ती (E01 to E07) | February, 2026 |
क्रीडा शिष्यवृत्ती | February, 2026 |
परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती | February, 2026 |
Kamgar Kalyan Scholarship : पात्रता निकष आणि लाभ
विद्यार्थ्यांसाठी कामगार कल्याण शिष्यवृत्तीचे वर्गीकरण प्रमुख तीन श्रेणींमध्ये केले जाऊ शकते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी सामान्य शिष्यवृत्ती क्रीडा शिष्यवृत्ती आणि परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती यांचा समावेश आहे. येथे तपशीलवार माहिती दिली आहे.
MAHABOCW कल्याणकारी योजना अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी सामान्य शिष्यवृत्ती खालील शैक्षणिक स्तरांना दिलेली आहे.
कामगार कल्याण सामान्य शिष्यवृत्तीची रक्कम
योजना क्रमांक.
|
शैक्षणिक पातळी
|
वार्षिक शिष्यवृत्ती पुरस्कार
|
E01 | वर्ग 1 ते 7 | ₹ 2,500 |
वर्ग 8 ते 10 | ₹ 5,000 | |
E02 | वर्ग 10 आणि 12 | ₹ 10,000 |
E03 | वर्ग 11 ते 12 | ₹ 10,000 |
E04 | 1st, 2nd, and 3rd year of degree | ₹ 20,000 |
E05 | मेडिकल degree | ₹ 1,00,000 |
Engineering degree | ₹ 60,000 | |
E06 | डिप्लोमा courses | ₹ 20,000 |
PG Diploma courses | ₹ 25,000 | |
E07 | MSC-IT course |
एमएससी-आयटी अभ्यासक्रमाच्या शुल्काची परतफेड
|
हे पण वाचा : IBPS RRB Clerk Notification 2025 : 7972 रिक्त पदांसाठी आजच ऑनलाईन अर्ज करा!
पात्रता:
- नोंदणीकृत बांधकाम कामगारांची मुले महाराष्ट्र राज्याची कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
- शिष्यवृत्ती चे फायदे नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांना आणि E04 आणि E05 योजनेसाठी बांधकाम कामगाराच्या पत्नीलाच लागू आहेत.
- E01 चे फायदे मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 75 टक्के उपस्थित ही दर्शवली पाहिजे.
- E02 चे फायदे मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी दहावी किंवा बारावीच्या वर्गात 50 टक्के किंवा त्याहूनही अधिक गुण मिळवले पाहिजेत.
कामगार कल्याण योजनेअंतर्गत क्रीडा शिष्यवृत्ती मुख्य प्रमाणे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेल्या प्रतिमान खेळाडूंना प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करते.
कामगार कल्याण क्रीडा शिष्यवृत्ती रक्कम
पद | राज्य स्तर | राष्ट्रीय स्तर | आंतरराष्ट्रीय स्तर |
First place | ₹ 5,000 | ₹ 7,000 | ₹ 15,000 |
Second place | ₹ 3,000 | ₹ 5,000 | – |
Third place | ₹ 2,000 | ₹ 3,000 | – |
पात्रता निकष
- अर्जदार भारतीय वंशाचा असावा.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा.
- अर्जदार आणि राज्य राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणतेही खेळात भाग घेतलेला असावा.
परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती
MAHABOCW कल्याण योजनेअंतर्गत परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेताना येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करण्यास मदत करते.
- या शिष्यवृत्तीची बक्षिस रक्कम ही 50000 आहे आणि ही रक्कम फक्त एकदाच मिळू शकते.
- अर्जदाराने मागील शैक्षणिक परीक्षेत 60 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेले पाहिजे.
- अर्जदार परदेशात पदवी उत्तर किंवा पीएचडी पदवी घेत असावा.
Kamgar Kalyan Scholarship आवश्यक कागदपत्रे
कामगार कल्याण शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे बघा:
- 75 टक्के उपस्थिती प्रमाणपत्र
- चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र
- स्वतःची घोषणा
- रेशन कार्ड
- लागू सदस्याच्या आधार कार्ड
- मागील शैक्षणिक वर्षाचे उतीर्ण गुणपत्रक
- शाळा महाविद्यालयीन ओळखपत्र
- चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाची पावती
- फी भरल्याची पावती
- एम एस सी आय टी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- क्रीडा शिष्यवृत्तीसाठी क्रीडा कामगिरी प्रमाणपत्रे
- परदेशी विद्यापीठाचे प्रवेश पत्र
How To Apply Kamgar Kalyan Scholarship?
- सर्वात आधी कामगार कल्याण शिष्यवृत्तीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- होम पेजवर आल्यावर education scheme application form या सेक्शन वर क्लिक करा.
- खाली दिलेल्या स्कीम्स व्यवस्थित वाचा व एक स्कीम निवडून डाऊनलोड बटन वर क्लिक करा.
- दिलेला फॉर्म व्यवस्थित वाचून भरा व लागणारे आवश्यक कागदपत्रे सबमिट करा.
क्रीडा आणि परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया
- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वेबसाईटला भेट द्या आणि योजनांसाठी अर्ज वर क्लिक करा.
- क्रीडा किंवा परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी खाली स्क्रोल करा.
- आत्ताच अर्ज करा वर क्लिक करा आवश्यक माहिती भरा आणि सबमिट करा.
कृपया लक्षात ठेवा: जर तुम्ही ऑफलाइन अर्ज करत असाल तर जवळच्या कामगार कल्याण मंडळ कार्यालयात अर्ज फॉर्म आणि सहाय्यक कागदपत्रे सबमिट करा आणि जर तुम्ही ऑनलाईन अर्ज करत असाल तर अधिकृत वेबसाईटवर लोगिन करा आणि डिजिटल पद्धतीने सबमिट करा.
FAQs वारंवार विचारले जाणारे प्रश्न(Kamgar Kalyan Scholarship)
1.कामगार कल्याण शिष्यवृत्तीसाठी कोण पात्र आहे?
महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ च्या कल्याणकारी योजना अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांची पहिली दोन मुले या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
2.कामगार कल्याण शिष्यवृत्ती चा फायदा फक्त बांधकाम कामगारांच्या मुलांनाच होतो का?
नाही, कामगार कल्याण शिष्यवृत्ती चा फायदा महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पत्नीना ही होतो.
3.कामगार कल्याण शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
कामगार कल्याण शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख अजून जाहीर केलेली नाही. विद्यार्थ्यांना अचूक माहितीसाठी महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ च्या अधिकृत वेबसाईटला तपासण्याचा सल्ला दिला जातो.
4.Kamgar Kalyan Scholarship शंभर टक्के मोफत आहे का?
नाही, कामगार कल्याण शिष्यवृत्ती 100% मोफत नाही. वेगवेगळ्या कल्याणकारी योजनानुसार शिष्यवृत्तीची रक्कम बदलते. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीच्या रकमेसाठी अधिकृत वेबसाईट तपासावी.