शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 50 हजार रुपये होणार जमा! Kisan Karj Mafi Yojana
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 50 हजार रुपये जमा होणार आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले आहे. त्यातला एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले योजना आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारण्याचा आहे. या योजनेमुळे शेतकऱ्याला कर्जाची परतफेड करण्यात मदत होईल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याचे प्रमाण थांबेल. कृषी या क्षेत्रामध्ये अनेक शेतकऱ्यांना कर्ज घेणे आवश्यक असते. परंतु अनेक वेळा घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेत करता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्याला अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. अशा प्रकारच्या समस्यांवर मात करण्यासाठी महात्मा फुले कर्जमाफी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या कर्जाची मोठी रक्कम माफ केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सावरण्यास मदत होते.
योजनेचा निधी कधी भेटणार: Kisan Karj Mafi Yojana
या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली आहे. योजना चालू झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये अनुदान जमा होणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्यात अनुदान जमा झाले आहे की नाही हे तपासण्यासाठी त्यांच्या संबंधित बँक मध्ये जाऊन संपर्क साधावा. त्याबरोबर शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या ई सेवा केंद्रात जाऊन आपले नाव तपासून पहावे.
हे पण वाचा! या महिलांसाठी होणार आता लाडकी बहीण योजना बंद
कोणत्या शेतकऱ्यांचे होणार कर्ज माफ:-
Kisan Karj Mafi Yojana या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाख रुपयांपेक्षा कमी आहे. अशा शेतकऱ्यांची नावे ही या यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्याला कर्जाची परतफेड करता आली नाही तर त्यासाठी सरकारने आता एक नवा नियम आणला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी एकाच आर्थिक वर्षात दोनदा कर्ज घेतले आहे त्यांना पण या योजनेचा लाभ मिळणार आहे.
यांना लाभ मिळणार नाही
- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी.
- महाराष्ट्र राज्यातील आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/माजी लोकसभा/राज्यसभा सदस्य, आजी/माजी विधानसभा/विधान परिषद सदस्य.
- राज्य सार्वजनिक उपक्रम (उदा.महावितरण, एस टी महामंडळ इ. ) व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25000 पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)
- निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रुपये 25000 पेक्षा जास्त आहे (माजी सैनिक वगळून).
- शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती.
- केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी/ कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25000 पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)
- कृषि उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25000 पेक्षा जास्त असणारे) व पदाधिकारी (अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ)
शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवारण:-
शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाची परतफेड करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे .त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाची परतफेड करण्यात मदत होईल. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. शेत पिकाला योग्य बाजारभाव न भेटल्यामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले पिकाचे नुकसान या प्रकारच्या अडचणींमुळे शेतकऱ्याला वेळेत कर्जाची परतफेड करता येत नाही. या योजनेमुळे शेतकऱ्याला आर्थिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणात मदत होईल.
हे पण वाचा! या महिलांसाठी होणार आता लाडकी बहीण योजना बंद
कर्ज फेडण्याची प्रक्रिया:
या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी 31 मार्च पर्यंत ची मुदत दिली आहे. जर शेतकऱ्यांनी दिलेल्या मूदतीपूर्वी कर्जाची परतफेड केली तरच त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
Kisan Karj Mafi Yojana 2025 किसान कर्ज माफी योजना
योजनेचे नाव | महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी |
---|---|
सुरुवात कोणी केली | एकनाथ शिंदे श्रेणी राज्य सरकार वर्ष 2025 |
प्रक्रिया | ऑनलाईन |
उद्देश | शेती कर्जमाफी |
फायदा | दोन लाख रुपये पर्यंतची कर्जमाफी |
official वेबसाईट | mjpsky.maharashtra.gov.in |
Kisan Karj Mafi Yojana 2025 पात्रता: eligibility for Kisan Karj Mafi Yojana
1. कायमस्वरूपी रहिवासी शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतील.
2. आयकर भरणारे आणि सरकारी नोकरी किंवा पेन्शन घेणारे या योजनेसाठी अपात्र ठरतील.
3. अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेले शेतकरी अपात्र ठरतील.
4. अर्जदार शेतकऱ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
या योजनेची उद्दिष्टे:-
Kisan Karj Mafi Yojana ही योजना सुरू करण्याचे उद्दिष्ट हे आहे की राज्यातील सर्व लहान मोठ्या शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे. त्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही त्यांना शेतीसाठी बाहेरून कर्ज घ्यावे लागते. त्यानंतर ते कर्ज माफ होत नाही. या योजनेअंतर्गत सरकार अशा सर्व शेतकऱ्यांचे दोन लाख पर्यंत कर्ज माफ करते.
Kisan Karj Mafi Yojana आवश्यक कागदपत्रे:-
1. आधार कार्ड
2. पत्त्याचा पुरावा
3. रेशन कार्ड
4. मोबाईल नंबर
5. बँक पासबुक
6. फोटो
7. सातबारा उतारा
FAQ:-
Kisan Karj Mafi Yojana मध्ये नाव कसे तपासाल?
- सर्वात आधी अधिकृत website वर जा.
- मुख्यपृष्ट वर “शेतकरी कर्ज माफी” वर क्लिक करा.
- नवीन एक page उघडेल त्यात तुमचा जिल्हा निवडा.
- शेतकरी कर्ज माफी योजना ची यादी दिसेल त्यात तुम्ही नाव शोधा.
शेतकरी कर्ज माफी योजने मध्ये किती रुपयांपर्यंत कर्ज माफ होईल?
या योजनेमध्ये शेतकऱ्यांना २ लाखा पर्यंत कर्ज सवलत मिळेल.