महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक सहायता देण्यासाठी Ladki Bahin Yojana 2025 चालू करण्याचा निर्णय घेतला. सरकारने या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी त्यांची ladkibahinmaharastra.gov.in ही ऑफिशियल वेबसाईट सुरू केली.तरी या वेबसाईटमुळे महिला घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरू शकतात आणि अर्जाची स्थिती पण चेक करू शकतात. जर तुम्ही पण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात. तर तुम्ही पण या योजनेचा लाभ घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर लॉगिन करता आले पाहिजे. तरच आपण या योजनेचा फायदा घेऊ शकता.महाराष्ट्र सरकार द्वारे राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी लाडकी बहीण योजनेची सुरुवात करण्यात आली.या योजनेमध्ये महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला दिले जाते.
महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने महिलांच्या कल्याणासाठी व सशक्तीकरणासाठी या योजनेचा निर्णय घेतला. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. जेणेकरून महिलांना त्यांच्या आर्थिक खर्चात मदत मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची वयोमर्यादा 21 ते 65 दरम्यान पाहिजे. या योजनेचा लाभ तीच महिला घेऊ शकते जिच्या कुटुंबाचे उत्पन्न वर्षाला 2.5 लाखापेक्षा कमी आहे.
हे पण वाचा! विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी
Ladki Bahin Yojana 2025 योजनेचा उद्देश
Ladki Bahin Yojana 2025 या योजनेचा सुरू करण्याचा सरकारचा एकमेव उद्देश असा की महिलांना घरबसल्या पंधराशे रुपये मिळतील व त्यांना घर खर्चात मदत होईल. इच्छुक महिला सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. या वेबसाईट द्वारे महाराष्ट्र राज्यातील महिला लाडकी बहीण योजनेसंबंधीचे अधिक माहिती जाणून घेऊ शकता.
Ladki Bahin Yojana 2025 बद्दल थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | Ladki Bahin Yojana 2025 |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | 2025 |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
योजनेचा उद्देश | महिलांना सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मदत करणे. |
अर्ज भरण्याची प्रक्रिया | ऑनलाईन |
वेबसाईट | majhiladkibahin.com |
Ladki Bahin Yojana 2025 योजनेचे लाभ
या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच भेटेल.
या योजनेच्या माध्यमातून सर्व पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातील.
याबरोबरच या लाभार्थी महिलांना एक वर्षांमध्ये तीन सिलेंडर मोफत दिले जातील.
राज्य सरकार द्वारे ही रक्कम महिलांच्या डीबीटी खात्यात जमा होईल.
Ladki Bahin Yojana 2025 मुळे काही महिला मुली आपले उच्च शिक्षण पूर्ण करू शकतील. सर्व विद्यार्थ्यींनी ज्या ओबीसी आणि AWS या प्रवर्गात येतात त्यांना पण या योजनेचा लाभ मिळणार आहे.
हे पण वाचा! विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी
Ladki Bahin Yojana 2025 योजनेची पात्रता | Eligibility of ladki bahin yojana 2025
लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची कायमची रहिवासी पाहिजे.
तुमचे वय हे 18 ते 65 च्या दरम्यान पाहिजे.
ज्या महिलांचे आर्थिक परिस्थिती दूर्बळ आहे त्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल.
लाभार्थी महिलेचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे.
ती महिला ही सरकारी नोकरी करत नसावी.
लाभार्थी महिलेच्या कुटुंबामध्ये कोणीही आमदार व खासदार पदी नसावे.
लाभार्थी महिलेच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन नसावे.
Ladki Bahin Yojana 2025 आवश्यक कागदपत्रे
1. आधार कार्ड
2. जात प्रमाणपत्र
3. मोबाईल नंबर
4. रेशन कार्ड
5. रहिवासी दाखला
6. मतदान कार्ड
7. बँक पासबुक
8. अर्जाची हमीपत्र
9. फोटो
10. शाळा सोडल्याचा दाखला
Ladki Bahin Yojana 2025 अर्ज कसा भरावा
1. सर्वात आधी फोन मध्ये गुगल प्ले स्टोअर ओपन करा.
2. त्यात जाऊनणारे नारीशक्ती दूत ॲप सर्च करून इन्स्टॉल वर क्लिक करा.
3. इन्स्टॉल झाल्यावर त्यात तुमचा मोबाईल नंबर टाका आणि ओटीपी टाकून सबमिट करा
4. नवीन फॉर्मवर क्लिक करा व सर्व माहिती सावकाशपणे व्यवस्थित भरा.
5. त्यानंतर जे जे कागदपत्रे मागितले आहे ती व्यवस्थित अपलोड करा.
6. डॉक्युमेंट अपलोड झाल्यावर एकदा फॉर्म चेक करा व सबमिट बटनावर क्लिक करा
7. नंतर फॉर्म Approved होण्याची वाट बघा.
हे पण वाचा! विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी
FAQ:
1. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काय आहे ?
ही योजना महिलांसाठी राज्य सरकारने सुरू केली असून महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा होतात, त्यामुळे महिलांचे आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते.
2. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात कधी झाली?
28 जून पासून ही योजना चालू झाली.
3. कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळेल?
या योजनेचा लाभ फक्त गरीब आणि आर्थिक परिस्थिती दुर्बल असलेल्या महिलांनाच मिळेल व त्यांचे वय 18 ते 65 च्या दरम्यान असेल.