Ladki Bahin Yojana : Benefits And Step By Step Guide For eKYC

Ladki Bahin Yojana:

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारचा एक उपक्रम आहे जो 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये प्रदान करते. त्यामुळे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य आरोग्य आणि कौटुंबिक निर्णय घेण्यास प्रोत्साहन मिळते. आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकांना लक्षात घेऊन ही योजना आधार लिंक असलेल्या खात्यांद्वारे सुरक्षित निधी वाटप करते आणि पारदर्शक कार्यक्षम लाभ वितरणासाठी ईकेवायसी आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली Ladki Bahin Yojana ही महिलांना आर्थिक मदत देऊन सक्षम करण्यासाठी डिझाईन केलेली एक कल्याणकारी योजना आहे. ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकातील पात्र महिलांना मदत करण्याचा प्रयत्न करते ज्यामुळे अधिक आर्थिक सुरक्षा आणि सामाजिक उन्नती निश्चित होते. महिलांच्या स्वावलंबनाला प्रोत्साहन देऊन हा कार्यक्रम घरगुती निर्णय प्रक्रियेत आणि एकूण कल्याणात महिलांचा सहभाग सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. लाभ मिळवण्यासाठी अर्जदारांनी अनिवार्य ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे, जी पारदर्शकता आणि सत्यता सुनिश्चित करते.

Ladki Bahin Yojana काय आहे?

महाराष्ट्र सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ही एक कल्याणकारी योजना आहे, जिचा उद्देश राज्यातील महिलांना सक्षम बनवणे आहे. या कार्यक्रमाद्वारे 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. या उपक्रमामुळे त्यांच्या आरोग्य पोषण आणि कुटुंबातील निर्णय घेण्याच्या भूमिकेला प्रोत्साहन देताना त्यांना आर्थिक स्थिरता प्राप्त करण्यास मदत होईल. हे पैसे थेट डीबीटी द्वारे आधार नंबर ला जोडलेल्या बँक खात्यातील लाभार्थ्यांना थेट हस्तांतरित केले जातात.

Ladki Bahin Yojana फायदे काय आहेत?

लाडकी बहीण योजनेचे फायदे असे आहेत:

  • दर महिन्याला 1500 रुपये मिळण्याची हमी.
  • रक्कम थेट लाभार्थ्याच्या आदर्श जोडलेल्या बँक खात्यात जमा केली जाते.

हे पण वाचा : Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana : प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना

 

Ladki Bahin Yojana पात्रता निकष काय आहे?

एखादी महिला अर्ज करू शकते जर ती:

  • महाराष्ट्राची रहिवासी असेल.
  • 21 ते 65 वर्ष वयोगटातील असेल.
  • अडीच लाखापेक्षा किंवा त्यापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील असेल.
  • आधारशी जोडलेली बँक खाते असेल.

किंवा यापैकी एका श्रेणीत येते:

  • विवाहित महिला
  • विधवा पहिला
  • घटस्फोटीत महिला
  • निराधार परित्यक्ता महिला
  • प्रती कुटुंबात एक अविवाहित महिला
  • आउटसोर्स केलेले कर्मचारी, कंत्राटी कामगार आणि मर्यादित उत्पन्न असलेले स्वयंसेवी कामगार देखील पात्र आहेत.

कोण पात्र नाहीत?

अशा महिला पात्र नाहीत:

  • ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल.
  • ज्या महिलांचे कुटुंबामधील सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल.
  • ज्या कुटुंबातील व्यक्ती सरकार नोकरीला असेल तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही.
  • अशी महिला जी या योजनेच्या आधी सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर.
  • कुटुंबातील व्यक्ती आमदार किंवा खासदार असेल.
  • घरातील कोणताही सदस्य सरकारी पदावर असेल तर.
  • कुटुंबामध्ये चार चाकी वाहन असेल तर.

Ladki Bahin Yojana आवश्यक कागदपत्रे:

या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे :

  1. आधार कार्ड
  2. पासपोर्ट साईज फोटो
  3. रेशन कार्ड /मतदान कार्ड /जन्म दाखला /शाळा सोडल्याचा दाखला
  4. महिला जर राज्याच्या बाहेरील असेल तर नवऱ्याचे रेशन कार्ड, नवऱ्याचे मतदान कार्ड
  5. उत्पन्नाचा दाखला
  6. लग्नाचे प्रमाणपत्र
  7. आधार लिंक असलेले बँक पासबुक
  8. संमती पत्र

महिला महाराष्ट्र महिला व बालविकास मंत्रालय काय म्हणाले?

महाराष्ट्र महिला व बाल विकास मंत्रालय म्हणाले की कॅबिनेटने दिलेल्या निर्णयानुसार या योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी जून महिन्यामध्ये केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. आदेशानुसार जून महिन्यापासून दोन महिन्याच्या आत केवायसी करणे अनिवार्य केले आहे. चालू वर्षामध्ये लाभार्थ्यांनाही प्रक्रिया 18 सप्टेंबर 2025 ला पूर्ण करावी लागेल.

eKYC का करावी?

  • योजनेचा लाभ घेण्यासाठी एकेवायसी करणे गरजेचे आहे.
  • महाराष्ट्र सरकारने हा आदेश दिला आहे की सर्व लाभार्थ्यांना नोटिफिकेशन जाहीर केल्यानंतर दोन महिन्याच्या आत म्हणजेच 18 नोव्हेंबर 2025 च्या आधी केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे.
  • प्रत्येक वर्षी जून महिन्याच्या आत केवायसी अपडेट करणे गरजेचे आहे.
  • ई केवायसी चा उद्देश पारदर्शकता ठेवणे, नकली लाभार्थ्यांना रद्द करणे आणि पात्र महिलांना रक्कम पोहोचवणे आहे.

ई केवायसी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर एक ऑनलाइन प्रक्रिया आहे, ज्यातून तुम्ही तुमची ओळख आणि आवश्यक कागदपत्रे डिजिटल सत्यापित करू शकता. सरकारने हे यासाठी अनिवार्य केले आहे की योजनांचा लाभ फक्त पात्र लाभार्थ्यांनाच मिळावा. याआधी अनेक नकली लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

Ladki Bahin Yojana eKYC कशी करावी?

  • लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • होम पेजवर गेल्यावर eKYC बॅनर वर क्लिक करा.
  • आधार नंबर आणि कॅपच्या कोड टाका.
  • आधार ऑथेंटीकेशनची सहमती देऊन send OTP यावर क्लिक करा.
  • आधार नंबर शी जोडलेला मोबाईल नंबर वर ओटीपी प्राप्त होईल तो टाका.
  • बरोबर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर एकेवायसी पूर्ण होईल आणि तुम्हाला लाभ मिळेल.

Ladki Bahin Yojana अधिक महत्त्वाची माहिती:

  • ई केवायसी फक्त अधिकृत सरकारी पोर्टलवरच करा. कोणत्याही थर्ड पार्टी किंवा नकली वेबसाईटवर करू नका.
  • ई केवायसी प्रक्रिया पूर्ण पद्धतीने मोफत आहे कोणालाही पैसे देऊ नका.
  • नकली वेबसाईट आणि धोक्यापासून वाचवण्यासाठी सरकार कायम चेतावणी देत आहे.
  • वेळेवर केवायसी न केल्याने दर महिन्याला येणारे पैसे बंद केले जातील.

लाडक्या बहिणी योजनेमध्ये महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी व पात्र लाभार्थ्यांपर्यंत सरकारी मदत पोहोचली पाहिजे हे या योजनेचे लक्ष आहे.

Leave a Comment