LIC AAO AE Recruitment 2025:
एलआयसी ने 2025 मध्ये एएओ (जनरलीस्ट आणि स्पेशलिस्ट) पदांसाठी 800 पेक्षा अधिक रिक्त पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. योग्य आणि इच्छुक उमेदवार आता अर्ज करू शकतील.
भारतीय जीवन विमा निगम एलआयसी ने 800 पेक्षा अधिक पदांसाठी भरती काढली आहे. यामध्ये जनरलीस्ट स्पेशलिस्ट आणि सहाय्यक अभियंता यांचे पद सामील आहे. इच्छुकानी योग्य उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. या भरती अभियानचा उद्देश एकूण 841 पदांना भरणे आहे. यामध्ये LIC AAO जनरलीस साठी 350 पद, स्पेशलीस्ट साठी 410 पद आणि सहाय्यक अभियंतासाठी एकूण 81 पद आहेत.
LIC AAO AE Recruitment 2025 पात्रता:
जनरलीस्ट पदासाठी पात्रता:
जनरलीस्ट या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय विश्वविद्यालय किंवा संस्था मधून कोणत्याही विषयांमध्ये डिग्री असणे आवश्यक आहे. हे पद त्या उमेदवारांसाठी खुले आहेत ज्यांच्याकडे सामान्य शैक्षणिक योग्यता आहे आणि ते प्रशासकीय कार्यांमध्ये योगदान देऊ शकतात.
विशेषज्ञ पदांसाठी आवश्यक शैक्षणिक योग्यता:
विशेषज्ञ पदांसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक योग्यता आहेत. AAO चार्टर्ड अकाउंटंट पदासाठी डिग्री आणि भारतीय चार्टर्ड अकाउंटंट संस्थानाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. AAO कंपनी सचिव पदासाठी डिग्री आणि ICSI योग्य सदस्य होणे आवश्यक आहे.
AAO ऍक्च्युरियल पदासाठी डिग्री आणि भारतीय युके ऍक्च्युअरीज संस्थान ची कमीत कमी सहा परीक्षा पास असणे गरजेचे आहे. विमा विशेषज्ञ पदासाठी डिग्री भारतीय विमा संस्थान ची फेलोशिप आणि कमीत कमी पाच वर्षाचा विमा क्षेत्रात मध्ये अनुभव असणे गरजेचे आहे. AAO विधी पदासाठी विधीमध्ये डिग्री आणि सामान्य उमेदवारांसाठी कमीत कमी 50 टक्के गुण व अनुसूचित जाती जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी कमीत कमी 45% गुण असणे आवश्यक आहे.
हे पण वाचा : Indian Navy Recruitment 2025 : नौसेना मध्ये 10वी पास झालेल्यांसाठी 1266 पदांची भरती! लवकर अर्ज करा
LIC AAO AE Recruitment 2025 वयोमर्यादा:
एएओ जनरलिस्ट, सीएस, ऍक्च्युरियल आणि इन्शुरन्स स्पेशालिस्ट या पदांसाठी अर्जदाराचे वय कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त तीस वर्ष असणे गरजेचे आहे. फक्त तेच उमेदवार पात्र आहे ज्यांचा जन्म 2 ऑगस्ट 1995 च्या आधी आणि एक ऑगस्ट 2004 च्या नंतर झालेला नसावा.
एएओ लीगल आणि चार्टर्ड अकाउंट साठी उमेदवाराचे वय कमीत कमी 21 वर्षानी जास्तीत जास्त 32 वर्ष असणे आवश्यक आहे. फक्त तेच उमेदवार पात्र आहे ज्यांचा जन्म 2 ऑगस्ट 1993 च्या आधी आणि एक ऑगस्ट 2004 च्या नंतर झालेला नसावा. आरक्षित वर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाईल.
LIC AAO AE Recruitment 2025 अर्ज फी:
या सर्व पदांसाठी अर्जाची फी उमेदवाराच्या श्रेणीनुसार ठरवली जाईल. इतर श्रेणीतील उमेदवारांसाठी फी सातशे रुपये आहे व अनुसूचित जाती व जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ही 85 रुपये आहे.
या दिवशी होईल परीक्षा:
एलआयसी भरतीसाठी परीक्षा 3 ऑक्टोबर 2025 ला आयोजित केली आहे. आणि मुख्य परीक्षा शक्यतो 8 नोव्हेंबर 2025 ला होईल. उमेदवार प्रारंभिक परीक्षेपासून जवळपास सात दिवस आधी म्हणजेच 26 सप्टेंबर 2025 ला एलआयसी ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता.
How to apply for LIC AAO AE Recruitment 2025?
- सर्वात आधी उमेदवाराला या भरतीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर उमेदवाराला होम पेजवर संबंधित लिंक वर क्लिक करावे लागेल.
- होम पेजवर लिंक वर क्लिक केल्यानंतर अर्जदाराला स्वतःचे रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अर्जदारापुढे अर्ज चा फॉर्म येईल.
- अर्जाचा फॉर्म व्यवस्थित रित्या भरून व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून सबमिट करावा लागेल.
- त्यानंतर उमेदवाराने सबमिट केलेल्या फॉर्मची प्रिंट घेऊन ती व्यवस्थित ठेवली पाहिजे.
या एलआयसी AAO आणि AE भरती अभियानासाठी अर्ज फी एससी एसटी पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी 85 आहे आणि इतर उमेदवारांसाठी अर्ज फी सातशे रुपये आहे.
LIC AAO AE Recruitment 2025 निवड प्रक्रिया:
एलआयसी सहाय्यक प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या निवड प्रक्रियेमध्ये तीन टप्पे आहेत: एक प्रारंभिक परीक्षा त्यानंतर मुख्य परीक्षा, मुलाखत आणि भरतीच्या आधीची पूर्व चिकित्सा. प्रारंभिक परीक्षा मध्ये प्राप्त झालेल्या अंकांना अंतिम मेरिट लिस्ट तयार करण्यासाठी मानले जात नाही. शेवटची मेरिट लिस्ट मुख्य परीक्षा आणि मुलाखतीमध्ये प्राप्त अंकांच्या आधारे तयार केली जाते. अधिक माहितीसाठी उमेदवार एलआयसी इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर व्हिजिट करू शकता.
FAQS: LIC AAO AE Recruitment 2025
1.LIC AAO AE Recruitment 2025 मध्ये अपेक्षित तारीख काय आहे?
एलआयसी अधिसूचना 16 ऑगस्ट 2025 ला जाहीर केली जाईल.
2.LIC AAO AE Recruitment 2025 अंतिम तारीख काय आहे?
एलआयसी ची ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख 8 सप्टेंबर 2025 आहे.
3.LIC AAO AE Recruitment 2025 निवड प्रक्रिया कशी होते?
एलआयसी भरती प्रक्रिया मध्ये पूर्व मुख्य आणि मुलाखत असे तीन प्रकार आहेत.