MahaDBT Tractor Anudan Yojana 2025:
नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेची MahaDBT Tractor Anudan Yojana 2025 बद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेअंतर्गत राज्य सरकारने कृषी विषयक यंत्रे आणि अवजारे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसहाय्य केले आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृषी यंत्राचा ला पोहोचवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठीच महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांची शेती विषयक कामे अधिक सुखकर आणि सोयीची करण्यासाठी ही योजना राबवली आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 8 एचपी ते 70 एचपी ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% म्हणजे जास्तीत जास्त 1.25 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येते. राज्यांमधील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना शेती या कार्यासाठी आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे ते वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने शेती कार्य करत असतात. पारंपरिक पद्धतीने शेती करायला पुष्कळ वेळ व खूप मेहनत करावी लागते यामध्ये शेतकऱ्यांना अनेक प्रकारची इजा देखील होते त्यामुळे आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना शेती या कार्यामध्ये मदत हवी व शेती कार्य जलद गतीने व्हावी या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
MahaDBT Tractor Anudan Yojana 2025 या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला जमिनीची सुधारणा, मशागतीसाठी अवजारे, आंतरमशागत यंत्रे, शेती अवजारे अनुदान, ट्रॅक्टर अवजारे अनुदान, पेरणी व लागवड यंत्रे, पीक संरक्षण अवजारे, काढणी व मळणी यंत्रे इत्यादी. अनेक शेतीची कामे जलद करून देणारी यंत्र विकत घेण्यासाठी अनुदान देऊन अर्थ सहाय्य करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या योजनेमुळे गरीब शेतकऱ्यांना शेतीची कामे कमी वेळेत आणि वेळेवर होण्यासाठी लाभ होणार आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने कृषी यांत्रिकीकरणाला प्राधान्य दिले आहे. राज्य सरकार अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना 50 टक्के तर इतर शेतकऱ्यांना 40 टक्के कृषी यांत्रिकीकरणाला अनुदान देणार आहे.
राज्य सरकार कृषी यांत्रिकीकरण योजनेतून शेतकऱ्यांना कृषी यंत्राच्या अवजारांच्या खरेदीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य घेऊन घेता येईल:
- ट्रॅक्टर
- पावर टेलर
- यंत्रे अवजारे
- फलोत्पादन यंत्र अवजार
- स्वयंचलित यंत्र
- काढणी यंत्र
- मनुष्यचलित यंत्र अवजारे
- ट्रॅक्टरची अवजारे
- वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
- ट्रॅक्टर/पॉवर टेलरचरित अवजारे
हे पण वाचा : Maharashtra Police Constable Salary 2025 : पगार, भत्ते आणि नवीनतम वेतन जाणून घ्या सविस्तर माहिती
योजनेचे नाव | MahaDBT Tractor Anudan Yojana 2025 |
उद्देश | शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत देणे. |
लाभ | 1.25 लाखापर्यंत अनुदान |
लाभार्थी | सर्व प्रवर्गातील शेतकरी |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन/ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | Click Here |
MahaDBT Tractor Anudan Yojana 2025 पात्रता
- लाभार्थी शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
- शेतकऱ्याकडे 7/12 उतारा व 8 अ असणे आवश्यक आहे.
- शेतकरी हा अनुसूचित जाती व जमाती मधील असल्यास जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
- ट्रॅक्टर किंवा यंत्र अवजारे यांपैकी फक्त एकाच गोष्टीसाठी अनुदान असेल.
- कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास ट्रॅक्टरचलित अवजारासाठी लाभ मिळण्यास प्राप्त असेल, परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत असणे गरजेचे आहे.
- जर शेतकऱ्यांनी एका अवजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याला त्याच अवजारासाठी पुन्हा पुढील दहा वर्ष अर्ज करता येणार नाही, परंतु दुसऱ्या अवजारासाठी अर्ज करता येईल.
- जर तुम्ही यावर्षी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतला तर पुढचे दहा वर्षे तुम्हाला ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.
राज्य सरकार कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक कृषी यंत्र अवजारांच्या आणि वेगवेगळ्या खालील जमीन मशागतीच्या अवजारांसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे:
- पॉवरडटलर
- 20 बीएचपी पेक्षा कमी नांगर
- वखर मोड बोड नांगर
जमिनीसाठी पूर्व मशागत अवजारे:
- तव्याचा नांगर
- वखर नांगर
- पावर वखर बांड फामडर
- कृष्ट ब्रेकर पोस्ट होल्डर लेव्हलर ब्लेड
- कल्टीवेटर
- रोटा कल्टीवेटर
- दवड स्लेशर
- रिजर रोटो पडलर
- केज व्हील
- बटाटा प्लांटर पूर्वमशागत
MahaDBT Tractor Anudan Yojana 2025 वैशिष्ट्य:
- महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रवर्गातील शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.
- या योजनेअंतर्गत केंद्र शासनाचा 60% सहभाग आणि राज्य शासनाचा 40% सहभाग आहे.
- योजनेअंतर्गत दिली जाणारी अनुदानाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या मार्फत जमा करण्यात येईल.
- महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रवर्गातील शेतकरी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
- या योजनेअंतर्गत आठ एचपी ते 20 एचपी च्या ट्रॅक्टर साठी 40% म्हणजेच 75 हजार रुपयांची अनुदान देण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत 20 एचपी ते चाळीस एचपीच्या ट्रॅक्टर साठी एक लाख रुपयांची अनुदान देण्यात येईल.
- राज्यातील शेतकरी शेतात आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून जलदरीतीने व सोप्या पद्धतीने शेती कार्य करू शकतील.
- शेतकरी शेती करण्यासाठी प्रोत्साहित होतील तसेच राज्यातील इतर नागरिक शेती करण्यासाठी आकर्षक होतील.
- या योजनेसाठी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
MahaDBT Tractor Anudan Yojana 2025 आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- सातबारा दाखला
- आठ अ दाखला
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
- जातीचा दाखला (आवश्यक असल्यास )
- प्रतिज्ञापत्र
MahaDBT Tractor Anudan Yojana 2025 अशा पद्धतीने करा ऑफलाईन अर्ज
- अर्थात शेतकऱ्याला आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जावे लागेल.
- कृषी विभागात जाऊन ट्रॅक्टर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेले सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी व सदर अर्ज कार्यालयात जमा करावा.
- अशाप्रकारे तुमची ट्रॅक्टर योजनेअंतर्गत ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.