Maharashtra Anganwadi Bharti 2025 new update
महाराष्ट्रातील अंगणवाड्यांमध्ये अंगणवाडी भरती २०२५ महाराष्ट्र या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात नवीन भरती होणार आहे. राज्यांमधील अनेक अंगणवाड्यांमध्ये मदतनीस व सेविकेची पदे रिक्त असल्याने ही भरती महिलांसाठी एक मोठी संधी ठरणार आहे.
भरती किती पदांची होईल?
राज्य सरकारने जवळपास 15000 मदतनीस पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे अनेक बेरोजगार महिलांना रोजगार मिळण्याची संधी आहे
Maharashtra Anganwadi Bharti 2025 new update भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
महिलाही बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर विधवा अनाथ एससी/एसटी,ओबीसी,,मागास प्रवर्ग ,दोन वर्षाचा शिक्षणाचा अनुभव असणाऱ्या महिलांना अतिरिक्त गुण दिले जातील.
निवड कशी केली जाते?
पदांची निवड उमेदवाराच्या गुणांवर केली जाते. उमेदवाराची निवड शैक्षणिक पात्रता अनुभव आणि आरक्षणाच्या आधारे केली जाते.
हे देखील वाचा! शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 2 लाखांपर्यंत सरसकट कर्ज माफ होणार! मिळणार मोठा दिलासा
पदे रिक्त का झाली?
अनेक अंगणवाडी मदतनीस यांनी बारावी उत्तीर्ण केल्याने त्यांना सेविकेचे पद भेटले. त्यामुळे मदतनीस यांची पदे रिक्त झाली.
Maharashtra Anganwadi Bharti 2025 new update भरती महत्त्वाची का आहे?
अंगणवाड्या लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात नवीन भरतीमुळे अंगणवाड्यांमध्ये कर्मचारी उपलब्ध होतील आणि लहान मुलांना चांगली सेवा मिळू शकते.
Maharashtra Anganwadi Bharti 2025 new update महाराष्ट्र राज्यात कधी होईल?
भरती संबंधी अधिक माहिती लवकरच जाहीर होऊ शकते. इच्छुक महिलांनी संबंधित विभागात संपर्क साधावा. राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा चांगला प्रतिसाद दिसत असल्याने सरकारने आता महिलांसाठी 15000 भरतीची घोषणा केली आहे. महायुतीचे सरकार महिलांसाठी नवनवीन योजना राबवत आहेत. लाडकी बहीण योजना चर्चेत असताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महाराष्ट्रातील महिलांना नोकरीची सुवर्णसंधी दिली आहे .31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरण्याची अंतिम तारीख असणार आहे.
Maharashtra Anganwadi Bharti 2025 new update: अंगणवाडी सेविकांना मिळणार नव्या वर्षात मानधन
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना डिसेंबर महिन्याची मानधन आणि प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी राज्य सरकारने 163 कोटी रुपये मंजूर केले आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या अनुदानाची रक्कम वाटणार आहे. राज्यात एकूण 108007 अंगणवाडी सेविका आणि 84 हजार 746 मदतनीस आहेत. या महिलांना वेळेवर त्यांना पगार मिळत नव्हता त्यामुळे राज्यातील अंगणवाडी संघटनांनी वेळोवेळी आंदोलन केले.
2017 मध्ये वित्त विभागाचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वाढीव मानधनाबद्दल चर्चा केली. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांसाठी केंद्र सरकारने एकात्मिक बाल विकास योजना राबवली आहे. डिसेंबर महिन्याच्या मानधनासाठी 163 कोटी 43 लाख इतका निधी वितरित करण्यात येत आहे. हा निधी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल. अंगणवाडी सेविकेला 15000 मानधन दिले आहे. त्यात भत्ता 2000 देण्याची घोषणा केली आहे. मात्र ती कागदावर आहे. अजून तरी सेविकेला मानधन 13000 मिळते. आणि मदतनीस ला 7500 रूपये मिळतात. तसेच अंगणवाडी भारती २०२५ महाराष्ट्र GR-नुसार नवीन भरती होण्याची शक्यता आहे असेही शासनाकडून सांगण्यात आले आहे.
हे देखील वाचा! शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 2 लाखांपर्यंत सरसकट कर्ज माफ होणार! मिळणार मोठा दिलासा
Maharashtra Anganwadi Bharti 2025 new update: अंगणवाडी सेविकांना लवकरच पेन्शन सुरू करणार, अदीती तटकरे
अंगणवाडी सेविकांना राज्यभरात 1 लाख 20 हजार स्मार्टफोनचे वाटप केले आहे. साडेतीन हजार अंगणवाडी सेविकांना पदासाठी बारावी मधून सूट देण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांना लवकरात लवकर पेन्शन सुरू करण्यात येईल. अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे. या अंगणवाड्यांमध्ये वीज नाही त्या सौर ऊर्जेवर करण्याचे धोरण तटकरे यांनी सांगितले आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवत आहे. महिला दिनाला चौथे धोरण जाहीर करण्यात आले आहे. महिला सशक्तीकरण,समानता, बचत गट सक्षम करणे, महिलांच्या शिक्षणाला प्राधान्य देणे, त्यांची सुरक्षितता यावर शासन विशेष भर देत आहे.
Maharashtra Anganwadi Bharti 2025 new update:दोन हजार रुपये भाऊबीज अंगणवाडी सेविका व मदतनीस साठी
अंगणवाडी सेविका मदतनीस यांना शासनातर्फे दोन हजार रुपयांची भाऊबीज राज्य सरकारने जाहीर केली आहे .लवकरच अंगणवाडी सेविका व मदतीस यांच्या बँक खात्यावर दोन हजार रुपये जमा होणार आहे.
FAQ:-
महाराष्ट्रात अंगणवाडी शिक्षिकेची वयोमर्यादा किती आहे(Maharashtra Anganwadi Bharti 2025 new update)?
अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या निवडीसाठी किमान विहित पात्रता 10 वी आहे आणि वयोमर्यादा 18-35 वर्षे आहे. AWWs आणि AWHs त्यांना सरकारने ठरवल्यानुसार मासिक मानधन दिले जाते, जे सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकसमान आहे.
अंगणवाडी भारती २०२५ महाराष्ट्र योजना कधी सुरु झाली?
ही कोणतीही योजना नसून शासनाकडून एक काढलेली भरती आहे.
अंगणवाडी मदतनीस चा पगार किती?
अंगणवाडी सेविका यांना दरमहा 1,5000 रुपये वेतन मिळते. तर मदतनीस यांना दरमहा 8500 रुपये वेतन मिळते.
अंगणवाडीचे काय फायदे आहेत?
अंगणवाडी मध्ये तीन प्रकारच्या व्यक्तीसाठी आहार मिळतो ते म्हणजे गरोदर महिला सहा ते तीन वर्ष बालक आणि तीन ते पाच वर्ष बालक त्याच बरोबर काही ठिकाणी अंडी,केळी,दुध वाटप केली जाते.
अंगणवाडी सेविकांची भरती कशी होते?
ही भरती सामान्यत: महिला आणि बाल विकास विभागांद्वारे राज्यभर आयोजित केली जाते. या विभागांच्या अधिकृत वेबसाइटवर रिक्त पदांसाठी जाहीरात केली जाते.