Maharashtra Govt Jobs for 12th Pass:
नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या बारावी उत्तीर्ण असलेल्या (Maharashtra Govt Jobs for 12th Pass) मुला मुलींसाठी अनेक सरकारी नोकऱ्यांचा पर्याय खुला आहे. या नोकऱ्या करून तरुण-तरुणी स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात म्हणजेच भविष्यात पुढे प्रगती देखील करू शकतात. तुम्ही जर स्थिर आणि सिक्युअर नोकरीच्या शोधात असाल तर नोकरीचे हे पर्याय तुमच्यासाठी मदतीची ठरतील.
या सरकारी नोकऱ्यांमध्ये सरकारच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये क्लर्क, डेटा एन्ट्री यांसारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हीही जर बारावी उत्तीर्ण असाल आणि स्टेबल सिक्युअर नोकरीच्या शोधात असाल तर नोकरीचे हे पर्याय तुमच्यासाठी खूप मदतीचे ठरतील.
खाली दिलेल्या माहितीमध्ये Maharashtra Govt Jobs for 12th Pass बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे :
Maharashtra State Transport Corporation – Junior Clerk:
MSTC म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ येथे कनिष्ठ लिपिक पदासाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. या पदासाठी (Maharashtra Govt Jobs for 12th Pass) बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर डेटा ऑर्गनाईज करणे त्याचे रेकॉर्ड ठेवणे कारकूनी कामांमध्ये मदत करणे आणि महामंडळ योग्य पद्धतीने चालेल यासाठी कार्यशील असणे ही कौशल्य अंगी असणे फायद्याचे ठरेल. तुम्ही जर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात कनिष्ठ लिपिक या पदासाठी अर्ज करून नोकरीची संधी मिळवली तर तुम्हाला तर महिन्याला 18000 मासिक पगार मिळू शकतो.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
हे पण वाचा : Maharashtra Police Constable Salary 2025 : पगार, भत्ते आणि नवीनतम वेतन जाणून घ्या सविस्तर माहिती!
Maharashtra Police Department Lower Division Clerk(महाराष्ट्र पोलीस विभाग निम्म विभागातील लिपिक)
तुम्ही महाराष्ट्र पोलीस विभाग या पदासाठी परीक्षा देऊ शकता. तुम्हाला दर महिना 19000 कमवायचे असतील तर तुम्हाला या विभागातील लिपिक पदासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर तुम्हाला पुढे तुमच्या कौशल्यांच्या आधारावर 22000 इतका पगार देखील मिळू शकतो. निम्मविभागातील लिपिक पदासाठी निवड झाल्यास तुम्हाला वेगवेगळे रेकॉर्ड हाताळणे, ट्रॅक करणे, त्या संदर्भातील लेखन आणि एकूणच कागदपत्रे हाताळणे या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील.
Maharashtra State Road Transport Corporation Junior Clerk:(महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळात नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या भरती अंतर्गत अभियांत्रिकी पदवीधर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक, मेकॅनिक मोटार व्हेईकल, शीट मेटल ,वर्कर,वेल्डर, पेंटर, मेकॅनिक डिझेल, इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर आणि कार्पेंटर यांचा समावेश आहे या पदांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 11 ऑगस्ट 2025 आहे. इच्छुक उमेदवारांची वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
Maharashtra State Secretariat – Clerk: (महाराष्ट्र राज्य सचिवालय लिपिक)
महाराष्ट्र राज्य सचिवालय मध्ये लिपिक या पदासाठी भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत होते. तुम्हाला या पदासाठी जाहिराती आणि परीक्षा माहितीसाठी एमपीएससीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. ही नोकरी Maharashtra Govt Jobs for 12th Pass साठी एक महत्वाची संधी घेऊन येईल .
महाराष्ट्र राज्य सचिवालय देखील बारावी उत्तीर्ण असलेल्या महाराष्ट्रातील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. हे तरुण लिपिक पदासाठी रुजू होऊ शकतात. त्यासाठी वेगवेगळ्या रेकॉर्ड जबाबदारी सांभाळणे सगळ्या कामांची प्रक्रिया समजून घेणे आणि त्यावर देखरेख ठेवणे ही कामे लिपिक सांभाळेल. महाराष्ट्र राज्य सचिवालयातील लिपिक पदासाठी दर महिना 1990 पगार दिला जाईल. त्याचबरोबर त्याला विविध भत्त्याचा लाभ देखील घेता येईल.
Public Works Department Common Personnel (सार्वजनिक बांधकाम विभाग सामान्य कर्मचारी)
PWD म्हणजेच सार्वजनिक बांधकाम विभाग येथे सामान्य कर्मचारी म्हणून रिकामी पदे आहेत. यासाठी जवळपास 15000 पगार त्याचबरोबर काही भत्ते आणि इतरही लाभ मिळतील. सर्व सामान्य कर्मचारी म्हणजेच शिपाई पदावर रुजू झाल्यानंतर वेळेच्या वेळी फाईल योग्य ठिकाणी नेऊन देणे, त्यांची नीटनेटके देखभाल ठेवणे, त्याचबरोबर इतर सेवांच्या तरतुदीसाठी प्रयत्नशील असणे, या जबाबदाऱ्या सामान्य कर्मचाऱ्याला पूर्ण करायला लागतील.
Maharashtra State Electricity Board Data Entry Operator(महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ डेटा एन्ट्री ऑपरेटर):
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा डेटा इनपुट करण्यासाठी डेटाबेस ची देखभाल करण्यासाठी आणि इतर कारखाने कामांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात नोकरीची पदे रिक्त आहेत. डेटा एन्ट्री ऑपरेटर यात सर्व कामांची जबाबदारी पार पडेल. त्यासाठी त्याला विविध भत्ते व दर महिना 16000 इतका पगार देण्यात येईल.
Maharashtra Public Service Commission Multitasking Staff (महाराष्ट्र लोकसेवा आयोग):
MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग इथे मल्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी जागा रिक्त आहेत. बारावी पास झालेल्या तरुणांसाठी ही एक महत्त्वाची संधी ठरेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती काढली जाते. त्यासाठी उमेदवारांना परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हावे लागते. या आयोगामध्ये अनेक प्रकारची कामे असतात. फाईल व्यवस्थापन करणे त्यातील सर्व माहितीची डेटा एन्ट्री करणे इतर कार्यालयीन कामे सांभाळणे हे मल्टी टास्किंग स्टाफ सांभाळेल. या पदासाठी 18000 पगार असून त्याचबरोबर भत्ते सुद्धा मिळतील.
Maharashtra Sales Tax Department Assistant महाराष्ट्र विक्रीकर विभाग सहाय्यक:
महाराष्ट्र विक्रीकर विभाग यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना विविध रेकॉर्ड्स ठेवणे, सेल्स टॅक्स संदर्भातील अनेक जबाबदाऱ्या कामांसाठी महाराष्ट्र विक्रीकर विभागात सहाय्यक पदासाठी भरती सुरू आहे. या सहाय्यक पदी रोज होणाऱ्यांसाठी वार्षिक पगार हा साधारण 1.99 लाख असेल त्याचबरोबर इतर भत्तेही मिळतील.
Maharashtra Revenue Department Junior Assistant(महाराष्ट्र महसूल विभाग कनिष्ठ सहाय्यक):
महाराष्ट्र महसूल विभागात कनिष्ठ सहाय्यक पदासाठी दर महिन्याला 1990 पगार व इतर भत्ते देखील दिले जातात. Maharashtra Govt Jobs for 12th Pass या कनिष्ठ सहाय्यक अकाउंटशी संबंधित रेकॉर्ड लक्षपूर्वक ठेवणे, सर्व नोंदी जबाबदारीने नोंदवणे, प्रशासकीय कामे करण्याची जबाबदारी असेल.