Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana आत्ता राज्यातील गरीब कुटुंबांना मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचार

नमस्कार मित्रांनो तर या पोस्ट मध्ये Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana या योजनेंतर्गत माहिती बघणार आहे.Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana ही एक सरकारी आरोग्य विमा योजना आहे. या योजनेची सुरुवात 2 जुलै 2012 रोजी 8 जिल्ह्यांमध्ये करण्यात आली होती आणि नंतर ही योजना 21 नोव्हेंबर 2013 पासून महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यांमध्ये विस्तारण्यात आली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana (MJPJAY) उद्दिष्टे:

या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे या योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचारांसाठी हॉस्पिटलायझेशन गरजेचे असलेले आपत्ती जनक आजारांसाठी लाभार्थ्याला उत्तम  सेवा प्रदान करणे.Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana  या योजनेचे फायदे ही योजना लाभार्थ्याला प्रत्येक वर्षाला प्रती कुटुंब 150000 पर्यंत लाभार्थ्याला हॉस्पिटल खर्च भागवण्यासाठी मदत करते. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी प्रती कुटुंब ही रक्कम वाढवून 2.5 लाख पर्यंत करण्यात आली आहे. ही एक वैद्यकीय विमा योजना आहे.MJPJAY लाभार्थ्याला 121 प्रकिया सह  996 वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया प्रक्रियांचा लाभ मिळतो.
996 प्रक्रियांपैकी 131 सरकारी आरक्षित प्रक्रिया आहेत.

हे पण वाचा! महाराष्ट्राला 20 लाख घरे मंजूर महाराष्ट्र आता थांबणार नाही पहा सविस्तर बातमी.

खालीलपैकी आजारांवर Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana  योजनेंतर्गत मोफत उपचार केले जातात.

1. हृदयरोग
2. रक्तवाहिन्या व हृदय विषयी शस्त्रक्रिया
3. त्वचेसंबंधी आजार
4. इ एन टी शस्त्रक्रिया
5. सामान्य शस्त्रक्रिया
6. रक्त विज्ञान
7. मूत्रविज्ञान
8. मानसिक विकार
9. संधिवात शास्त्र
10.गॅस्ट्रो अँटरोलजी
11.रेडिएशन अकनॉलॉजी
12.प्रोस्थेसिसआणि ऑर्थोसिस
13.प्लास्टिक सर्जरी
14.बालरोग कर्करोग
15.बालरोग शस्त्रक्रिया
16.नेत्ररोग
17. कर्करोग
18.स्त्रीरोग
19.न्युरो सर्जरी
20. न्यूरोलॉजी
21. संसर्गजन्य रोग

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana या योजनेची पात्रता.

श्रेणी A
त्या लाभार्थ्याकडे पिवळे रेशन कार्ड,अंत्योदय योजना शिधापत्रिका असली पाहिजे त्याचे वार्षिक उत्पन्न 1 लाख पर्यंत पाहिजे.

श्रेणी B
या श्रेणीमध्ये कृषीदृष्टी अडचणीत असलेल्या जिल्ह्यांतील पांढरे रेशन कार्ड असलेली कुटुंबांचा समावेश होतो या श्रेणीमध्ये एकूण 14 जिल्ह्यांचा समावेश होतो. औरंगाबाद,जालना,बीड,परभणी,हिंगोली,लातूर,नांदेड,उस्मानाबाद,अमरावती,अकोला,बुलढाणा,वाशिम,यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांचा समावेश होतो.

श्रेणी C
या श्रेणीमध्ये शासकीय अनाथश्रमामधील मुले आश्रम शाळेतील विद्यार्थी महिला कैदी आणि शासकीय वृद्धाश्रमातील वृद्ध नागरिकांचा समावेश होतो.

टीप:-Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana आणि आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) 1 एप्रिल 2020 रोजी  सुरु झाली होती.या योजनेसाठी (united india insurance company limited) ही संस्था लाभार्थ्यांना विमा पुरवते त्यासाठी health assurance society 797 रुपये प्रत्येक वर्षी विमा कंपनी ला डेट असते.

हे पण वाचा! महाराष्ट्राला 20 लाख घरे मंजूर महाराष्ट्र आता थांबणार नाही पहा सविस्तर बातमी.

 

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana या योजनेची अर्ज प्रक्रिया:-

या योजनेमध्ये अर्जाची प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने होते .
लाभार्थी आपल्या जवळच्या नेटवर्क हॉस्पिटल द्वारे आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरांना देखील उपस्थित राहू शकतो आणि आजरावर आधारित एक लेटर मिळवू शकतो.

हॉस्पिटलमध्ये आरोग्य मित्र सर्वात आधी तुमचे रेशन कार्ड आणि फोटो आयडी तपासतात आणि रुग्णाची नोंदणी करतात प्रवेश पावती आणि केलेल्या चाचण्या या योजनेच्या गरजेनुसार हॉस्पिटलच्या डेटाबेस मध्ये नोंदवल्या जातात.

MJPJAY या योजनेमधील 999 प्रक्रिया आणि PMJAY मधील 1209 प्रक्रिया मधील लाभार्थ्यांची जी प्रक्रिया येत असेल तर त्यासाठी लागणारी कागदपत्रे जोडून हॉस्पिटल द्वारे ई- प्राधिकरण केले जाते.

या सर्व अटी पूर्ण झाल्यानंतर विमा कंपनीचे वैद्यकीय विशेषज्ञ या लाभार्थ्यांना मंजुरी देतात.

हॉस्पिटल लाभार्थ्यांना कॅशलेस वैद्यकीय आणि सर्जिकल उपचार प्रदान करते .

वैद्यकीय किंवा शस्त्रक्रिया केल्यानंतर हॉस्पिटल रिपोर्ट अपलोड करते .हॉस्पिटलच्या नियुक्त अधिकाऱ्यांची स्वाक्षरी केलेले डिस्चार्ज रिपोर्ट तसेच रुग्णाचा वाहतूक खर्च आणि इतर खर्च हा या योजनेद्वारे मागे दिला जातो .
ज्यावेळेस रुग्णाचा डिस्चार्ज होतो त्यापासून दहा दिवसांपर्यंत या योजनेअंतर्गत मोफत पाठपुरावा सल्ला व औषधे प्रदान करतात.

सविस्तर माहितीसाठी अधिकृत website ला भेट द्या.

MJPJAY लागणारी आवश्यक कागदपत्रे:-

1. आधार कार्ड
2. पॅन कार्ड
3. मतदान ओळखपत्र
4. ड्रायव्हिंग लायसन्स
5. शाळा कॉलेज आयडी
6. पासपोर्ट
7. स्वातंत्र्य सैनिक आयडी
8. हेल्थ कार्ड
9. अपंग प्रमाणपत्र
10. बँक पासबुक
11. केंद्र व राज्य सरकारचे जेष्ठ नागरिक कार्ड

हे पण वाचा! महाराष्ट्राला 20 लाख घरे मंजूर महाराष्ट्र आता थांबणार नाही पहा सविस्तर बातमी.

FAQ:-

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana म्हणजे काय?

MJPJAY म्हणजे महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना आहे.

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana कधी चालू झाली?

महा राष्ट्रातील 28 जिल्ह्यांमध्ये 1 एप्रिल 2020 रोजी चालू झाली.

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?

या योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना मोफत उपचार मिळवून देणे.

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana या योजनेमध्ये लाभार्थ्याकडून अतिरिक्त पैसे घेतले जातात का?

नाही. या योजनेत बसणाऱ्या कोणत्याही लाभार्थ्याकडून पैसे कुठलेही हॉस्पिटल घेत नाही.

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana योजनेसाठी काही शंका आणि तक्रार नोंदी साठी काय करावे?

कुठल्याही प्रकारची शंका असल्यास तुम्ही आरोग्यामित्रांबरोबर चर्चा करू शकता.ते तुम्हाला रुग्णालयाच्या प्रवेश द्वारावर मिळतील जर तुमचे समाधान न झाल्यास टोल-फ्री क्रमांक 155388 किंवा 18002332200 वर संपर्क करा.

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana योजनेंतर्गत किती रुपये मिळतात?

ही योजना प्रत्येक कुटुंबासाठी  150000 रुपयांपर्यंत मदत करते पण मूत्रपिंड प्रत्यारोपण साठी .

 

Leave a Comment