Panchayat Samiti Yojana Maharashtra 2025 : पंचायत समिती योजनेबद्दलची जाणून घ्या पूर्ण माहिती!

Panchayat Samiti Yojana Maharashtra 2025 :

महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातील नागरिकांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. त्यातच अशा योजनांची अंमलबजावणी करणे खूप महत्त्वाचे असते. याचे मुख्य जबाबदारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पार पाडते.
ही योजना पंचायत समितीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राबवली जाते. या योजनेमध्ये कोणकोणत्या योजना आहेत, या योजनेचा लाभ कसा घ्यावा, पात्रता इत्यादींची संपूर्ण माहिती आजच्या लेखामधून पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या योजनेमध्ये महिला व बालकल्याण विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, समाज कल्याण विभाग इत्यादी विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या योजनेचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करण्याच्या मुख्य उद्देशाने सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते मात्र राज्यातील अनेक लोकांना राज्य सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती मिळत नाही त्यामुळे ते या योजनेच्या लाभांपासून वंचित राहतात. यासाठी राज्यातील नागरिकांना त्यांच्या तालुका व जिल्हा स्तरावर विविध विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती मिळावी यासाठी राज्य सरकारने ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे.

Panchayat Samiti Yojana Maharashtra 2025 Overview :

योजनेचे नाव Panchayat Samiti Yojana Maharashtra 2025
राज्य महाराष्ट्र
विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक
लाभार्थी महाराष्ट्रातील नागरिक
लाभ वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळतो
उद्देश नागरिकांना आर्थिक आणि सामाजिक विकास करणे
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाइन
अधिकृत वेबसाइट Click Here

हे पण वाचा : PM Viksit Bharat Rozgar Yojana : नोकरी खाजगी, पैसा सरकारी! प्रधानमंत्री विकसित भारत योजनेची पोर्टल लॉन्च, किती पैसे मिळतील?

Panchayat Samiti Yojana Maharashtra 2025 उद्दिष्टे:

  • या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे.
  • पंचायत समिती या योजनेच्या माध्यमातून नागरिकांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करणे.
  • राज्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करणे.
  • शेती क्षेत्राला प्रोत्साहन देणे आणि अन्य नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे.
  • राज्यातील महिलांच्या सशक्तिकरणाला आणि आत्मनिर्भर मिळवण्यासाठी प्रयत्न करणे.
  • राज्य सरकारने सामान्य नागरिकांसाठी सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळवून देणे.

Panchayat Samiti Yojana Maharashtra 2025 योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध योजना:

पंचायत समिती पशुसंवर्धन विकास योजना

  • शेतकऱ्यांना शेतीसाठी बैल जोडी खरेदी करण्यासाठी रकमेच्या एकूण 75 टक्के अनुदान देणे.
  • जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य पुरवठा च्या माध्यमातून किमान दहा रबर मॅट खरेदीसाठी ₹15,000 रुपयांचे अनुदान देणे.
  • राज्यातील महिलांना एक म्हैस किंवा गाय खरेदी करण्यासाठी रकमेच्या 50 टक्के अनुदान देण्यात येते तसेच राज्यातील शेतकरी किंवा पशुपालकांना मुक्त संचार गोठा करण्यासाठी जिल्हा परिषद च्या माध्यमातून पंधरा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते.
  • जिल्हा परिषद च्या माध्यमातून मिल्किंग मशीन खरेदीसाठी 15000 रुपयांचे अनुदान मिळते.
  • कुक्कुटपालनासाठी 75 टक्के अनुदान देण्यात येते.

पंचायत समिती महिला बालकल्याण विभाग योजना

  • ग्रामीण आणि दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या पाचवीच्या विद्यार्थ्यांना खरेदीसाठी 4500 रुपये अनुदान मिळते.
  • ग्रामीण भागातील 18 वर्षे पूर्ण महिलांना चार चाकी वाहन प्रशिक्षण आणि परवाना मिळवण्यासाठी 3000 रुपयांची आर्थिक मदत मिळते.
  • सावित्रीबाई फुले योजनेच्या माध्यमातून 7वी ते 12वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींना संगणक प्रशिक्षणासाठी चार हजार रुपये अनुदान मिळणार.
  • दिव्यांग व्यक्ती साठी झेरॉक्स मशीन खरेदीसाठी अनुदान.
  • पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्लभ कुटुंबातील मुलींना बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेण्यासाठी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार.
  • ग्रामीण भागातील महिलांना व्यवसायिक आणि जीवनाची वस्तू खरेदीसाठी 12500 अनुदान किंवा घरगुती पीठ गिरणी खरेदीसाठी रकमेच्या 90% अनुदान देण्यात येते.

पंचायत समिती कृषी विभाग योजना 2025

  • शेतकऱ्यांना पाच एचपी डिझेल पंप खरेदीसाठी अनुदान देणे.
  • शेतकऱ्यांना ताडपत्री खरेदीसाठी अनुदान देणे.
  • शेतकऱ्यांना सिंचनासाठी लागणारे 2.5 इंची पीव्हीसी पाईप खरेदीसाठी आर्थिक मदत करणे.
  • शेतकऱ्यांना 3 इंच पीव्हीसी पाईप खरेदीसाठी आर्थिक मदत करणे.
  • शेतकऱ्यांना स्प्रिंकलर सेट खरेदीसाठी आर्थिक मदत.
  • शेतकऱ्यांना 3 एचपी मोटर खरेदीसाठी व 5 एचपी मोटर खरेदीसाठी आर्थिक मदत मिळणार.
  • नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी जैविक खते आणि जैविक कीटकनाशकासाठी आर्थिक मदत.
  • खत खरेदीसाठी मिळणार आर्थिक अनुदान.

आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती

या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्याच्या उत्तम सुविधा पुरविण्यात येतात. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना औषधे उपचारासाठी अनुदान विविध आजारांवरील जागृती मोठ्या आजारावर अनुदान देऊन उपचार पद्धती उपलब्ध करून देणे.

तरुणांसाठी रोजगार निर्मितीसाठीच्या योजना

पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात त्यामध्ये छोट्या उद्योगांसाठी तरुणांना प्रोत्साहन देण्यात येते आणि कौशल्य विकास कार्यक्रम राबवली जातात. हे सर्व योजना राज्य सरकारच्या विविध विभागांमार्फत चालवल्या जातात. त्यांची अंमलबजावणी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून करण्यात येते.

Panchayat Samiti Yojana Maharashtra 2025 आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • पासबुक
  • ईमेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट फोटो
  • सातबारा
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • अपंग असल्यास प्रमाणपत्र

Panchayat Samiti Yojana Maharashtra 2025 अर्ज प्रक्रिया ऑफलाइन:

  • पंचायत समितीच्या Panchayat Samiti Yojana Maharashtra 2025 माध्यमातून चालवला जाणाऱ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला पंचायत समितीमध्ये जाऊन अर्ज घ्यावा लागेल.
  • त्यानंतर किंवा जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवरून तुम्हाला अर्ज डाऊनलोड करता येतो.
  • अर्जमध्ये विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरणे गरजेचे आहे.
  • त्याच्याबरोबर मागितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
  • अर्ज संपूर्णपणे भरून झाल्यावर व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा आणि कार्यालयात जाऊन जमा करा.
  • अशा पद्धतीने तुम्ही पंचायत समिती योजनेचा अर्ज करू शकता.

Leave a Comment