PM Kaushal Vikas Yojana:
नमस्कार मित्रांनो, आपल्या देशामध्ये तरुणांसाठी जी सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे बेरोजगारीची समस्या. याच बेरोजगारीला दूर करण्यासाठी सरकार द्वारे वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना राबवल्या जातात. त्याच पद्धतीने पीएम कौशल विकास योजना पण याच प्रकारची आहे. जी केंद्र सरकार द्वारे राबवली जाते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारे देशातील तरुणांमधील बेरोजगारीची समस्या दूर करणे हाच या योजनेमागचा उद्देश आहे. 2015 मध्ये पीएम कौशल विकास योजनेची सुरुवात झाली. त्याचबरोबर ही योजना सफलतापूर्वक राबवली जात आहे आणि या योजनेचा लाभ प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळत आहे. त्याचबरोबर बेरोजगारची समस्या पण बऱ्याच प्रमाणात समाप्त होत आहे.
जर तुम्ही शिक्षित बेरोजगार आहेत. तुम्हाला बेरोजगारीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे तर त्यासाठी पीएम कौशल विकास योजनेवर एकदा लक्ष द्या. जर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर आमच्या पोस्टमध्ये या योजनेस संबंधित सर्व माहिती दिली आहे. तरी ती सविस्तर वाचा.
PM Kaushal Vikas Yojana महत्त्वाची माहिती:
पीएम कौशल विकास योजनेअंतर्गत भारत सरकारद्वारे पात्र विद्यार्थ्यांना हा लाभ दिला जातो आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्याही पद्धतीची रक्कम खर्च करावी लागत नाही. म्हणजेच ही योजना विद्यार्थ्यांना मोफत लाभ देते. या योजनेअंतर्गत विविध प्रकारची ट्रेड उपलब्ध असते त्यानुसार विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार निवडू शकतात आणि त्या संबंधित प्रशिक्षण प्राप्त करू शकतात.
जेव्हा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते आणि ते जर प्रशिक्षण सफलतापूर्वक पूर्ण करतील तेव्हा त्यांना या योजनेद्वारे एक प्रमाणपत्र पण दिले जाते. प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन करावे लागते. रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जवळच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल.
PM Kaushal Vikas Yojana योजनेचा लाभ:
पी एम कौशल विकास योजनेमध्ये काही लाभ मिळतात खालील प्रमाणे:
- या योजनेअंतर्गत तरुणांची बेरोजगारी कमी होऊ शकते.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील.
- देशातील सर्व शिक्षित बेरोजगार तरुणांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.
- ही योजना एक मोफत सुविधा आहे ज्यामध्ये विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारची फी भरावी लागत नाही.
- लाभार्थी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेडचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल.
PM Kaushal Vikas Yojana पात्रता:
- या योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन करण्यासाठी विद्यार्थ्यांजवळ भारतीय नागरिकता असणे आवश्यक आहे.
- रजिस्ट्रेशन करणारा विद्यार्थी हा बेरोजगार आणि शिक्षित असणे आवश्यक आहे.
- जे विद्यार्थी या योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन करतील त्यांना त्यांच्या क्षेत्रीय भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना कम्प्युटरचे बेसिक नॉलेज असणे गरजेचे आहे.
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याजवळ मराठी, हिंदी आणि इंग्लिश या भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
PM Kaushal Vikas Yojana आवश्यक कागदपत्रे:
सर्व तरुण किंवा विद्यार्थ्यांना पीएम कौशल विकास योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी खाली दिल्या गेलेल्या कागदपत्रांची आवश्यकता पडेल:
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- रहिवासी दाखला
- दहावीचा निकाल
- उच्च शिक्षणाचा सर्टिफिकेट
- निवास प्रमाणपत्र
- आय प्रमाणपत्र
How to Apply for PM Kaushal Vikas Yojana?
- पीएम कौशल विकास योजनेचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी अर्जदाराने सर्वात आधी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
- आता होम पेजवर उपलब्ध असलेल्या क्विक लिंक वर क्लिक करा आणि त्यात स्किल इंडिया ऑप्शन वर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला register as a candidate या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल त्यात मागितलेली सर्व आवश्यक माहिती टाका.
- त्यानंतर लॉगिन ऑप्शन वर क्लिक करा आणि युजरनेम व पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- या पद्धतीने तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल आणि त्यानंतर भविष्यामध्ये उपयोगी पडेल त्यासाठी पावती घ्या.
- या पद्धतीने तुम्ही पीएम कौशल विकास योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करू शकता.
FAQs of PM Kaushal Vikas Yojana:
- पीएम कौशल विकास योजनेमध्ये सर्वांना प्रशिक्षण मोफत मिळते का?
हो, या योजनेमध्ये सर्व पात्र तरुणांना मोफत प्रशिक्षण मिळते. - पीएम कौशल विकास योजनेमध्ये रजिस्ट्रेशन ऑनलाइन असते का?
हो, तुम्ही या योजनेमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. - पीएम कौशल विकास योजनेमध्ये प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतर नोकरी मिळते का?
प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतर तरुणांना त्यांच्याजवळ असलेले स्किल्सनुसार रोजगार प्राप्त करण्यास अडचण येणार नाही. - पी एम कौशल विकास योजनेमध्ये कोणत्याही वयाचा व्यक्ती अर्ज करू शकतो?
नाही, योजनेसाठी वयोमर्यादा निर्धारित केली आहे, त्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन पात्रतेची माहिती बघू शकता. - पीएम कौशल विकास योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहे?
आधार कार्ड, रहिवासी दाखला, बँक पासबुक, शिक्षणाचे प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे.