PM Kisan 19th Installment
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील करोडो शेतकऱ्यांना आर्थिक सहायता दिली जाते.या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षाला 6000 रुपयाची रक्कम दिली जाते.ही रक्कम तीन भागांमध्ये दिले जाते.प्रत्येक हप्त्यात 2000 रुपयाची रक्कम दिली जाते.आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत 18 हप्ते दिले आहेत आणि शेतकरी 19 व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहेत.
19 व्या हप्त्याची तारीख
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेअंतर्गत PM Kisan 19th Installment ची तारीख 24 फेब्रुवारी 2025 आहे. या तारखेला सरकारद्वारे घोषणा केली जाईल आणि सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2000 रुपयाची रक्कम ट्रान्सफर केली जाईल.
PM Kisan 19th Installment प्राप्त करण्यासाठी काही आवश्यक कामे
शेतकरी बांधवांना हे निश्चित करावे लागेल की त्यांनी e-Kyc ही प्रक्रिया पूर्ण केली आहे.सरकारने E-Kyc अनिवार्य केली आहे, कारण लाभार्थ्यांची ओळख होऊन त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकता येतील. E-Kyc ची प्रक्रिया तुम्हाला पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा तुमच्या जवळपासच्या कॉमन सर्विस सेंटर वर जाऊन करू शकता.
पीएम किसान e-Kyc प्रक्रिया कशी करावी?
- पी एम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
- होम पेजवर फार्मर्स कॉर्नर सेक्शन मध्ये जाऊन e-Kyc हा पर्याय निवडा.
- आता पीएम किसान योजनेमध्ये रजिस्टर केलेले शेतकरी स्वतःचा आधार नंबर टाकून सर्च बटन वर क्लिक करा.
- रजिस्टर मोबाईल नंबर वर प्राप्त झालेला ओटीपी टाका.
- सर्व माहिती व्यवस्थित टाकल्यावर E-kyc ही प्रक्रिया पूर्ण होईल.
बेनिफिशियरी स्टेटस कसे चेक करायचे?
- शेतकरी स्वतःचे नाव लाभार्थी सूची मध्ये आहे किंवा नाही हे चेक करू शकतात.यासाठी खाली दिलेल्या गोष्टींचे पालन करा:
- पीएम किसान अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
- होम पेजवर फार्मर्स कॉर्नर सेक्शन मध्ये जाऊन लाभार्थी सूची या पर्यायावर क्लिक करा.
- आता शेतकऱ्यांनी स्वतःचे राज्य जिल्हा उपजिल्हा तालुका आणि गाव निवडा.
- रिपोर्ट प्राप्त करा या बटनवर क्लिक करा.
- लाभार्थी सूची मध्ये जाऊन स्वतःचे नाव शोधा.
हे पण वाचा:PM Kisan Samman Nidhi Yojana 2025 चा 19 वा हप्ता मिळवण्यासाठी करा या दोन गोष्टींची पूर्तता.
पी एम किसान योजनेचे लाभ
- आर्थिक मदत: या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना दरवर्षाला सहा हजार रुपयांची मदत दिली जाते जे की तीन हप्त्यांमध्ये वितरण होते.
- शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळतो: योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होते त्यामुळे भ्रष्टाचार कमी होतो.
- शेतीमध्ये सुधारणा:
मिळालेल्या रकमेमुळे शेतकरी त्याचा उपयोग बी बियाणे, खते, कीटनाशके हे सर्व खरेदी करण्यामध्ये वापरू शकता त्यामुळे शेतीची उत्पादन क्षमता वाढेल. - नियमित व वेळेत मिळणाऱ्या या रकमेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होते व ते आपत्कालीन परिस्थिती चा सामना करण्यास सक्षम होतात.
पी एम किसान योजनेची पात्रता:
- भारतातील सर्व लहान व मोठे शेतकरी ज्यांच्याकडे पाच एकर जमीन आहे ते या योजनेसाठी पात्र आहेत.
- पी एम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्याचे नाव राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या भूमि अभिलेखांमध्ये असणे आवश्यक आहे.
पी एम किसान योजनेची अर्जाची प्रक्रिया
- पी एम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
- फार्मर्स कॉर्नर सेक्शन मध्ये जाऊन न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या पर्यावर क्लिक करा.
- आधार नंबर,मोबाईल नंबर ,राज्य इत्यादी आवश्यक माहिती भरा.
- सेंड OTP बटन वर क्लिक करा आणि प्राप्त ओटीपी टाका.
- अर्जाच्या फॉर्ममध्ये मागितलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा व माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमच्या माहितीची पडताळणी होईल आणि पात्र ठरल्यावर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.
FAQs-PM Kisan 19th Installment
1.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना काय आहे?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारची एक योजना आहे ज्याच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षाला 6000 रुपये तीन टप्प्यांमध्ये दिले जाते.
2.PM kisan योजनेमध्ये किती हप्ते असतात?
दरवर्षी शेतकऱ्यांना रक्कम तीन हप्त्यांमध्ये मिळते.
पहिला हप्ता एप्रिल ते जुलै च्या दरम्यान
दुसरा हप्ता ऑगस्ट ते नवंबर च्या दरम्यान
तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च च्या दरम्यान येतो.
3.PM Kisan 19th Installment कधी येईल?
19 व्या हप्त्याची तारखेची घोषणा लवकरच होईल.तोपर्यंत शेतकरी हप्ता बद्दलची माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता.
4.हप्त्याची स्थिती कशी चेक करावी?
pmkisan.gov.in वेबसाईटला भेट द्या.
Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा.
आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून स्थिती पहा.
5.PM Kisan 19th Installment साठी पात्र कोण आहे?
असे सर्व शेतकरी ज्यांच्याकडे जमीन आहे.
सरकारी कर्मचारी किंवा आयकर जाता हे या योजनेसाठी अपात्र आहे.
6.PM Kisan 19th Installment साठी केवायसी गरजेची आहे का?
हो ,या योजनेसाठी kyc करणे गरजेचे आहे.