PM Kisan 20th installment Date 2025:
जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या खात्यामध्ये वेळेत पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 2000 रुपयाचा 20 वा हप्ता आला पाहिजे तर, काही आवश्यक काम लगेच करा.
देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 हप्ता (Pradhan mantri Kisan Samman Nidhi Yojana 20th installment) लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे. आतापर्यंत 19 वा हप्ता दिलेला आहे आणि 20 हप्ता (PM Kisan 20th installment Date) यासाठी शेतकरी वाट बघत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तर जाणून घेऊया, किसान योजनेचा पुढच्या हप्त्याचे (pm Kisan next installment) पैसे कधी पर्यंत येतील.
मिळालेल्या माहितीनुसार हा हप्ता 18 किंवा 19 जुलै 2025 ला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केला जाणार आहे. त्याचबरोबर अधिकृत घोषणेची सगळे वाट बघत आहेत.
PM Kisan 20th installment वर्षाला 6000 रुपयाची मदत:
पी एम किसान योजना(pm Kisan Yojana 2025) अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांची मदत केली जाते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये वाटून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवली जाते. एप्रिल पासून तर जुलै , ऑगस्ट पासून ते नोव्हेंबर, डिसेंबर पासून मार्च पर्यंत म्हणजेच 19 वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारी 2025 ला ट्रान्सफर केला होता. जवळपास 9.8 करोड शेतकऱ्यांना 22 हजार करोड रक्कम दिली होती.
ही योजना छोट्या आणि गरीब शेतकऱ्यांसाठी सरकारकडून एक आर्थिक मदत आहे. ज्यातून ते शेतीसाठी लागणारे खर्च त्याचबरोबर घर खर्च चालू शकतील. वेळेवर हप्ता मिळणे शेतकऱ्यांसाठी गरजेचे आहे, कारण त्यांना सर्व गरजा या वेळेवर पूर्ण करता आल्या पाहिजे.
2000 रुपये चा हप्ता मिळवण्यासाठी काय करावे(PM Kisan 20th installment)?
जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या खात्यामध्ये वेळेवर पी एम किसान सन्मान निधी योजना(pm Kisan Samman Nidhi Yojana) अंतर्गत दोन हजार रुपये चा विसावा हप्ता येण्यासाठी लवकरच हे काम करा.
सर्वात आधी e-kyc पूर्ण करा, कारण सरकारने सांगितले आहे की बिना इकेवायसी(pm Kisan ekyc) हप्ता मिळणार नाही. इ के वाय सी तुम्ही वेबसाईटवर ओटीपी च्या माध्यमातून किंवा जवळच्या सीएससी सेंटर वर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने करू शकता.
त्यानंतर आधार नंबर ला तुमच्या बँक खात्याशी लिंक करा आणि हे निश्चित करा की तुमच्या बँक डिटेल्स मध्ये काही चूक झाली नाही पाहिजे, जसे IFSC कोड, अकाउंट नंबर इत्यादी. बऱ्याचदा पैसे वेळेवर पाठवले जातात, परंतु चुकीच्या माहितीमुळे ते अटकतात.
PM Mudra Loan Yojana 10 लाखापर्यंत कर्ज मिळवा बिना कोणत्याही व्याजदरात !! सरकारी योजना अर्ज प्रक्रिया येथे बघा!
PM Kisan 20th installment तुमचे नाव लिस्ट मध्ये आहे की नाही कसे चेक करावे?
बऱ्याच वेळा शेतकऱ्याचे नाव बेनिफिशियरी लिस्ट (pm Kisan beneficiary list) मधून काढले जाते ज्यामुळे हप्ता मिळत नाही.
तुम्ही pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन beneficiary list मध्ये स्वतःचे नाव चेक करा. राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गाव सिलेक्ट करून रिपोर्ट पाहू शकता की तुमचे नाव लिस्ट मध्ये आहे की नाही.
PM Kisan 20th installment साठी farmer registry पण आवश्यक
आता फक्त पीएम किसान मध्ये रजिस्टर असणे आवश्यक नाही तर सरकारने farmer registry पण अनिवार्य केली आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या राज्याच्या पोर्टलवर जाऊन किंवा जवळील सीएससी सेंटरवर जाऊन फॉर्म भरू शकता किंवा farmer registry app चा वापर करू शकता.
PM Kisan 20th installment फक्त दोन दिवस बाकी लवकर करा अपडेट
पीएम मोदी 18 जुलैला बिहारच्या मोतीहारी जिल्हा मध्ये दौरा करणार आहेत आणि अशी संभावना आहे की तिथूनच ते 20 वा हप्ता वाटणार आहेत. म्हणजे शेतकऱ्यांजवळ फक्त एक दिवस राहिला आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही केवायसी केली नसेल तर लवकरच बँक डिटेल्स किंवा मोबाईल नंबर अपडेट केला नसेल तर लवकर करून घ्या. नाहीतर दोन हजार रुपयाची रक्कम तुमच्या खात्यात वेळेवर येणार नाही.
PM Kisan 20th installment Status चेक करायचे विसरू नका:
हप्ता जाहीर झाल्यानंतर तुम्ही pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन beneficiary status या सेक्शन मध्ये जाऊन तुमचे स्टेटस बघू शकता. यातून तुम्हाला माहिती होईल की तुमचा हप्ता आला आहे की नाही.
पी एम किसान योजनेच्या विसावा हप्ता (pm Kisan Yojana 20th installment 2025) करोडो शेतकऱ्यांना यातून फायदा झाला आहे. अशा शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे ज्यांना वेळेवर या योजनेची माहिती मिळते. जर तुम्ही सुद्धा या योजनेचे लाभार्थी आहेत तर आत्तापासूनच ऍक्टिव्ह वा आणि हे निश्चित करा की तुमचे नाव लिस्ट मध्ये आहे की नाही बँक डिटेल्स आणि केवायसी व्यवस्थित झाली आहे की नाही हे चेक करा. यामुळे तुम्हाला केवळ हप्ताच वेळ येणार नाही, तर पुढे हप्त्यांमध्ये रुकावट येणार नाही.
FAQS:
1.पीएम किसान योजना काय आहे?
पी एम किसान योजना भारत सरकारची एक योजना आहे जी शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्रदान करते. ही योजना 1 डिसेंबर 2018 ला सुरू केली होती. या योजनेचा उद्देश देशातील सर्व जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यता देऊन मदत करणे आहे.
2.अर्ज करण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते?
पी एम किसान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी या तीन कागदपत्रांची आवश्यकता असते, त्यात आधार कार्ड बँक पासबुक जमिनीचे रेकॉर्ड.
3.पी एम किसान योजनेसाठी रजिस्ट्रेशन कसे करावे?
या योजनेच्या pmkisan.gov.in अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले जाते.