PM Kisan Samman Nidhi Yojana 2025:
पंतप्रधान किसान योजनेचा 19 वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी या दोन गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
आपल्या सरकारने शेतकरी व सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी अनेक नवनवीन योजना चालू केले आहेत. त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्माननिधी योजना(PM Kisan Samman Nidhi Yojana 2025). या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. देशातील शेतकऱ्यांचे वाढते आत्महत्येचे प्रमाण यावर आळा घालण्यासाठी सरकार शेतकऱ्यांसाठी हितकर असलेल्या योजना राबवत आहे. जेणेकरून शेतकऱ्याला मदत होईल.
PM Kisan Samman Nidhi Yojana 2025 या योजनेतून दरवर्षी शेतकऱ्याला 6 हजार रुपयांची आर्थिक मदत होते. सर्वात आधी आपण जाणून घेऊ पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टींची पूर्तता करणे गरजेचे आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या काही तपशील जमा कराव्या लागतात. त्या तपशील च्या आधारावर शेतकऱ्याला पी एम किसान योजनेचा लाभ मिळतो. यामध्ये शेतकऱ्याची ई-केवायसी करणे गरजेचे आहे तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेला असेल तर तुम्हाला नोंदणी क्रमांक लक्षात ठेवावा लागेल. या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत जर शेतकरी नोंदणी क्रमांक विसरला तर त्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.!शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी लागणार आवश्यक
वर्षातील चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात होतात दोन हजार रुपये जमा:
PM Kisan Samman Nidhi Yojana 2025 या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेद्वारे अल्पभूधारक शेतकऱ्यांना ही रक्कम दर चार महिन्यांनी मिळते चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होतात ही रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात डीबीटी मार्फत पोहोचते. या PM Kisan Samman Nidhi Yojana 2025 योजनेअंतर्गत आतापर्यंत 3.46 लाख कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता लवकरच 19 वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार.
PM Kisan Samman Nidhi Yojana 2025 या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी अनिवार्य.
ई केवायसी म्हणजे जी आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबर द्वारे किंवा सीएससी केंद्रावरून बायोमेट्रिक पद्धतीने पूर्ण केली जाऊ शकते. या योजनेचे इ केवायसी अनिवार्य आहे अन्यथा या योजनेचा लाभ घेता येत नाही. जर तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नसेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी अनिवार्य प्रक्रिया आहे.
E-KYC पूर्ण कशी करावी?
जे शेतकरी पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत. ते त्यांची ई-केवायसी तपासू शकतात त्यासाठी त्यांना सरकारी वेबसाईट pmkisan.gov.in वर जावे लागेल. त्या वेबसाईटवर ई-केवायसी नाव दिसेल त्यावर क्लिक करा नंतर तेथे otp based kyc दिसेल तिथे शेतकऱ्याने आपला आधार नंबर टाकावा. जर आधार नंबर वर केवायसी केलेली असेल तर तुम्हाला तुमचा रेकॉर्ड दिसेल व ही केवायसी अपूर्ण असल्यास तुम्ही ते अपडेट करू शकता.
याआधी पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता 5 ऑक्टोबरला आला होता. यामध्ये 9.4 करोड यापेक्षा अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला होता.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.!शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी लागणार आवश्यक
या शेतकऱ्यांच्या खात्यात नाही येणार हप्त्याचे पैसे:
किसान सन्मान निधी योजनेचा फायदा घेणारे काही शेतकरी फर्जी डॉक्युमेंट चा सहारा घेत आहेत. त्यामुळे सरकारने इकेवायसी अनिवार्य केली आहे. म्हणजेच जे शेतकरी चुकीचे डॉक्युमेंट दाखवून या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांनी एकेवायसी केली नाही तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
त्याचबरोबर सरकारने शेतकरी योजनेची रक्कम घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भू सत्यापन अनिवार्य केले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी भु सत्यापन पण केले नाही त्यांचे पैसे अडकू शकतात.
पी एम किसान योजनेसाठी कोण कोण अपात्र आहेत?
- या योजनेअंतर्गत हायर इकॉनॉमिक स्टेटस वाले बेनिफिशरी या कॅटेगरीचा लाभ घेऊ शकणार नाही.
- पूर्व राज्यमंत्री आणि लोकसभा राज्यसभा, राज्य विधानसभा, राज्य विधान परिषद चे सदस्य किंवा नगर निगमांचे पूर्व आणि
- वर्तमान मेयर जिल्हा पंचायत यांचे पूर्व किंवा सध्याचे अध्यक्ष या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.
- केंद्र राज्य सरकारच्या मंत्र्यांमध्ये कार्यालयांमध्ये किंवा विभागांमध्ये काम करणारे व्यक्ती किंवा सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.
- सेवानिवृत्त किंवा दहा हजार रुपये पेन्शन असलेले कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.
- डॉक्टर, इंजिनियर, वकील, अकाउंटंट असे प्रोफेशनल व्यक्ती या योजनेपासून अपात्र राहतील.
FAQ काही महत्त्वाचे प्रश्न?
PM Kisan Samman Nidhi Yojana 2025 काय आहे?
आपल्या देशातील शेतकऱ्यांसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना चालू केली. या योजनेची सुरुवात 24 फेब्रुवारी 2019 मध्ये झाली थोडक्यात शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून ही योजना चालू झाली.
PM Kisan Samman Nidhi Yojana 2025 यासाठी लागणारी कागदपत्रे?
तुम्ही जर या योजनेचा लाभ घेत नसाल, तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लागणारी कागदपत्रे बघा बँक अकाउंट, पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड मोबाईल नंबर इत्यादी.
पीएम किसान स्टेटस कसे पहावे पीएम किसान लाभार्थी स्टेटस पाहण्यासाठी सर्वात आधी सरकारी वेबसाईटवर जाऊन (pmkisan.gov.in) यावर क्लिक करावे नंतर फार्मर्स कॉर्नर वर जाऊन know your status वर क्लिक करा स्टेटस च्या पेज नंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅपच्या टाका व get data वर क्लिक करून तुमचे स्टेटस चेक करा.
पंतप्रधान किसान योजनेसाठी कोण नाही पात्र?
लोकसभा राज्यसभा विधान सभेचे आमदार सदस्य, महानगर पालिका अध्यक्ष माजी सदस्य
PM किसान 2000 रुपये online कसे तपासायचे?
या वेबसाईट क्लिक करा https://pmkisan.gov.in नोंदणी क्रमांक व कॅप्चा कोड टाका आणि जर तुम्हाला नोंदणी क्रमांक माहित नसेल तर तुम्ही आधार क्रमांक व मोबाईल नंबर वापरा.