PM Vishwakarma Yojana 2025:
केंद्र सरकारने सुरू केलेली PM Vishwakarma Yojana 2025 ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. ज्याचा उद्देश पारंपारिक कामांमध्ये पारंगत असलेले व्यक्ती शिल्पकार यांसाठी आर्थिक मदत करणे आहे. त्यांच्या कामाला बढावा देण्यासाठी केंद्र सरकारने या योजनेद्वारे उपक्रम राबवला आहे. ही योजना या कामगारांच्या जीवनामध्ये चांगला बदल घडवून आणण्याकरता राबविण्यात येत आहे. जे पिढ्यानपिढ्या आपल्या व्यवसायातून जीवन खर्च चालवत आहेत. त्यांच्यासाठी ही योजना खूप लाभदायक ठरेल.
PM Vishwakarma Yojana 2025 महत्वाची मुद्दे :
योजनेचे नाव | PM Vishwakarma Yojana 2025 |
कोणती योजना आहे | सरकारी योजना |
कशाप्रकारे अर्ज करू शकतो | ऑनलाइन |
उद्देश्य | आर्थिक सहायता |
अजून माहितीसाठी | माहिती संपूर्ण वाचा |
या योजनेमध्ये भेटणाऱ्या लाभांना आपण वेगवेगळ्या प्रकारे बघू शकतो , तर बघा.
हे सुद्धा वाचा !PM Internship Scheme: लवकर जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख! आजच अर्ज करा!
या योजनेचे प्रमुख उद्देश आणि लाभ :-PM Vishwakarma Yojana 2025
- प्रमाणपत्र देऊन मान्यता देणे:-
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत जे कारागीर व शिल्पकार म्हणजेच पारंपारिक व्यवसायावर उपजीविका करणारे लोक यांना प्रमाणपत्र आणि आयडी कार्ड दिले जातील जेणेकरून त्यांना या योजनेची मान्यता भेटेल.
2. त्यांच्या कौशल्यांमध्ये विकास:
या कारागिरांमध्ये महिला व पुरुष या दोघांचाही समावेश आहे. या योजनेमध्ये या कारागिरांना पाच-सहा दिवसाचे प्रशिक्षण दिले जाईल. त्या प्रशिक्षणासाठी त्यांना प्रत्येक दिवसाची फी पण दिली जाईल.
3. वस्तूंची वाटप:
कारागिरांना स्वतःच्या कामांमध्ये अजून सुधारण्यासाठी शासनाने 15 हजार रुपयांचे अनुदान मान्य केले आहे त्यातून ते लागणारी साधने सामग्री खरेदी करू शकतील. उदा. शिलाई मशीन
महिला जुन्या काळातील शिलाई मशीन वापरत होत्या. त्या मशीन एवढ्या सुधारित नव्हत्या. यामध्ये महिलांना खूप वेळ लागायचा पण आजकालच्या मशीनवर त्या महिलांचा वेळही वाचेल आणि काम पण पटकन होईल.
4. कर्ज भेटण्यास मदत:
पहिल्या हप्त्यामध्ये 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज भेटू शकते दुसऱ्या हप्त्यामध्ये रक्कम वाढवून 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज भेटू शकते.
5. व्याजदर:
लाभार्थ्यांना फक्त 5 टक्के व्याजदराने पैसे दिले जातील आणि बाकीचा 8 टक्के व्याजदर सरकार द्वारे दिला जाईल.
हे सुद्धा वाचा !Ayushman Card List: मिळणार 5 लाख पर्यंतचा मोफत इलाज! बघा लाभार्थ्यांची यादी!
PM Vishwakarma Yojana 2025 या योजनेमध्ये कोणकोणते पारंपारिक व्यवसाय आहेत:-
1. सुतार
2. लोहार
3. मूर्तिकार
4. चांभार
5. कुंभार
6. धोबी
7. शिवणकाम करणारे
8. परीट
अजून पारंपारिक काम करणाऱ्यांची सूची पोर्टल वर अपडेट करू.
ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रोसेस:PM Vishwakarma Yojana 2025
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेसाठी सरकारने सर्वसाधारण डिजिटल बनवले आहे. हे तुम्ही जवळच्या लोकसेवा केंद्रामध्ये (CSC) जाऊन फॉर्म भरू शकता.
- सर्वात आधी जवळच्या सीएससी केंद्रावर जा.
- तिथून पीएम विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत पोर्टलवर लॉगिन करा.
- सीएससी रजिस्टर बटन वर क्लिक करून अर्जाची प्रक्रिया सुरू करा.
- अर्जदाराचा आधार नंबर टाकून लॉगिन करा.
- मागितलेली सर्व माहिती व्यवस्थित काळजीपूर्वक भरा.
अर्जाची स्थिती कशी चेक करावी?
जर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ इच्छित असाल तर खाली दिलेल्या गोष्टींचे पालन करा.
- पीएम विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- त्यात लॉगिन बटन वर क्लिक करा.
- तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा.
- त्यानंतर अर्जाची स्थिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
PM Vishwakarma Yojana 2025: कोण लाभार्थी ठरेल ?
फॉर्म भरल्यानंतर लाभार्थी या योजनेच्या पात्रतेत बसेल, त्या लाभार्थ्याला योजनेचा लाभ घेता येईल.
PM Vishwakarma Yojana 2025 या योजनेचा लाभ:-
- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 प्रमुख उद्देश कारागीर आणि शिल्पकारांना त्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी होता.
- ज्यांची आर्थिक स्थिती ढासाळलेली आहे त्यांच्यासाठी मोफत प्रशिक्षण .
- अवजारे खरेदी करण्यासाठी त्यांना 15000 रुपयांची सहायता.
व्यवसाय वाढवण्यासाठी विना गॅरंटी 2 लाखाचे कर्ज देणार.
डिजिटल देवाण-घेवाण करणार.
Apply Link | Click Here |
Check Status | Click here |
Official Website | Click Here |
PM Vishwakarma Yojana 2025 लागणारी आवश्यक कागदपत्रे
1. आधार कार्ड
2. पॅन कार्ड
3. उत्पन्न प्रमाणपत्र
4. जात प्रमाणपत्र
5. ओळखपत्र
6. पत्त्याचा पुरावा
7. पासपोर्ट साईज फोटो
8. बँक पासबुक
9. मोबाईल नंबर .
PM Vishwakarma Yojana 2025 या योजनेसाठी लागणारी पात्रता :
- अर्जदार भारताचा नागरिक असावा.
- अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत 18 क्षेत्रांपैकी एकामधला असावा.
- अर्जदाराची वय 18 पेक्षा जास्त आणि 50 पेक्षा कमी असावे.
- योजने समाविष्ट केलेल्या 140 जातींपैकी एक असणे आवश्यक.
PM Vishwakarma Yojana 2025 या योजनेचा उद्देश
PM Vishwakarma Yojana 2025 ही योजना पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी खूप लाभदायक ठरू शकते .या योजनेचा एकमेव उद्देश आहे की या लाभार्थ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे व त्यांना स्वावलंबी बनवण्यास मदत करणे आहे. या योजनेमुळे आपल्या देशाचे पारंपारिक व्यवसायांना एक वेगळी चालना भेटेल .ही योजना फक्त या कामगारांच्या व्यक्तिमत्त्वाचीच नाही तर त्यांना देश पातळीवर जाण्यास मदत करेल .
जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचा व्यक्ती जर या योजनेत पात्र बसत असाल तर तुम्ही नक्की या योजनेचा लाभ घ्या पोस्ट आवडल्यास तुमच्या मित्रांना नक्की शेयर करा.
निष्कर्ष:
या योजनेच्या माध्यमातून अशा कारागीर व शिल्पकारांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. सरकारचे हे पाऊल वकल फॉर लोकलच्या दृष्टिकोनातून कारागिरांना प्रोत्साहित करते जेणेकरून त्यांचे पारंपारिक उद्योग जपून राहतील.
FAQs:
- पीएम विश्वकर्मा योजना काय आहे?
पीएम विश्वकर्मा योजना केंद्र सरकार द्वारे सुरू केलेली एक नवीन योजना आहे. जिचा उद्देश पारंपारिक कारागीर, शिल्पकार, सोनार, लोहार, धोबी व इतर प्रकारचे श्रमिक यांच्या आर्थिक सहाय्यता आणि कौशल प्रशिक्षण वाढवणे. - पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत किती लोन मिळते?
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत सर्व पात्र कारागिरांना आणि शिल्पकारांना पहिल्या हप्तात एक लाख रुपये आणि दुसऱ्या हप्त्यांमध्ये दोन लाख रुपयाचे लोन मिळते. - विश्वकर्मा योजनेमध्ये लोन वर किती इंटरेस्ट रेट असतो?
विश्वकर्मा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या ऋणावर 5% व्याजदर वर्षाला असते. - पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज कसा करावा?
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत अर्ज csc च्या माध्यमातून ऑनलाईन केला जातो. - या योजनेचा लाभ फक्त शहरी क्षेत्रातील लोकांना मिळेल का?
नाही, पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ दोन्ही ग्रामीण आणि शहरातील कारागीर आणि शिल्पकारांना मिळेल.