pradhan Mantri Matru Vandana Yojna : प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ! लवकर अर्ज करा !

pradhan Mantri Matru Vandana Yojna:

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना केंद्र सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेचा उद्देश गरोदर महिलांना पोषण आणि व्यवस्थित देखभाल करणे आहे. त्याचबरोबर लहान बाळाचे आरोग्य व्यवस्थित ठेवणे. या योजनेबद्दल या पोस्टमध्ये सविस्तर माहिती दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

गरोदर महिलांची व्यवस्थित काळजी घेतली जावी आणि त्यांच्या पोषण मध्ये काही कमतरता येऊ नाही त्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना चालू आहेत. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना पण त्यातली एक योजना आहे. आई आणि बालकाची काळजी घेण्यासाठी त्यांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये आणि जर मुलगी झाली तर 6000 रुपये पाठवले जातात. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवून त्यांचे पोषण व काळजी साठी मदत केली जाते. आतापर्यंत 4.26 करोड पेक्षाही अधिक महिलांनी या योजनेसाठी रजिस्ट्रेशन केले आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत 3.90 करोड महिलांच्या खात्यामध्ये 18000 करोड रुपये पाठवले गेले आहेत. जर तुमच्या ओळखीची एखादी महिला आई होणार असेल तर ती पण या योजनेचा लाभ घेऊ शकते. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2017 मध्ये चालू झाली आहे आणि आठ वर्षांमध्ये 3.9 करोड गरोदर महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी अर्ज कसा करावा? ही योजना काय आहे? या योजनेअंतर्गत खात्यात किती पैसे येतील? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

pradhan Mantri Matru Vandana Yojna काय आहे?

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही केंद्र सरकार द्वारे राबवण्यात येणारी एक मातृत्व लाभ योजना आहे. एक जानेवारी 2017 ला केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाद्वारे या योजनेला लॉन्च केले. ही योजना गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केली आहे, त्यामुळे त्यांना व्यवस्थित पोषण आणि आरोग्याची काळजी घेता येईल.

pradhan Mantri Matru Vandana Yojna उद्देश काय आहे?

या योजनेचा उद्देश गरोदर आणि स्तनदा महिलांना आर्थिक मदत देऊन आई आणि बालकाच्या आरोग्यामध्ये सुधारणा करणे आहे. याव्यतिरिक्त महिलांना व्यवस्थित आहार आणि आरोग्याचा काळजी बद्दल जागरूक करून कुपोषणाचा दर कमी करणे आहे. मोलमजुरी करून घर चालवण्यासाठी मदत करणाऱ्या महिलांना प्रसूतीच्या दरम्यान आराम मिळावा आणि त्यांना पैशाची कमतरता पडू नये त्यासाठी ही योजना राबवली जात आहे.

pradhan Mantri Matru Vandana Yojna चा फायदा काय आहे?

प्रधानमंत्री मातृ योजना अंतर्गत पहिल्यांदा गर्भवती होणाऱ्या महिलांना 5000 रुपये दिले जाते. ही रक्कम दोन हप्त्यांमध्ये येते. जर दुसऱ्या वेळेस गरोदर महिल्याने मुलीला जन्म दिला तर तिला सहा हजार रुपये दिले जातात. म्हणजेच ही रक्कम फक्त मुलगी जन्माला आल्यावर मिळते.

हप्ता अट रक्कम
पहिला हप्ता प्रेग्नेंसी चे रजिस्ट्रेशन आणि पाळीच्या शेवटच्या तारखे नंतर सहा महिन्याच्या आत 3000
दुसरा हप्ता बाळाच्या जन्माचे रजिस्ट्रेशन बाळाच्या लसीकरणाच्या वेळेस 2000

हे पण वाचा :Sukanya Samriddhi Yojana: 5 लाख मिळणार आजच करा अर्ज! लागणारी कागदपत्रे, पात्रता, नियम जाणून घ्या!

pradhan Mantri Matru Vandana Yojna पात्रता काय आहे?

  • गरोदर महिलेचे वय कमीत कमी 19 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
  • तसे तर ही योजना फक्त जिवंत बाळासाठी आहे. परंतु दुसऱ्या वेळेस जर मुलीचा जन्म झाला तरी सुद्धा या योजनेचा लाभ मिळेल.
  • जर दुसऱ्या वेळेस गर्भवती महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला आणि त्यामधील एक मुलगी असेल तर त्या pradhan Mantri Matru Vandana Yojna 2.0 चा लाभ मिळेल.
  • गरोदर महिलेच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी पाहिजे.
  • गरोदर महिलेजवळ मनरेगा कार्ड पाहिजे.
  • महिलेजवळ e-shram कार्ड किंवा बीपीएल कार्ड पाहिजे.
  • ही महिला सरकारी नोकरी करत नसावी.
  • ज्या महिलांना इतर सरकारी योजनेचा लाभ मिळतो त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

pradhan Mantri Matru Vandana Yojna ऑनलाइन अर्ज प्रक्रिया कशी करावी?

Step 1:

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
  • Sign Up करण्यासाठी मोबाईल नंबर टाकून Verify बटन वर क्लिक करा.
  • OTP आणि Captcha Code टाकून Validate वर क्लिक कराStep 2:
  • मोबाईल नंबर टाकून लॉगिन केल्यानंतर Dashboard ओपन होईल.
  • Data Entry पर्यायामध्ये Beneficiary Registration वर क्लिक करा फॉर्म ओपन होईल.
  • पहिल्या बाळासाठी अप्लाय करताय किंवा दुसऱ्या बाळासाठी, हे तिथे सांगा.
  • त्यानंतर नाव, पत्ता, आधार नंबर, जन्मतारीख, वय इत्यादी माहिती व्यवस्थित भरा.
  • मनरेगा कार्ड नंबरची माहिती द्यावी लागेल त्यानंतर बाळाविषयी ची सर्व माहिती व्यवस्थित भरा.
  • तुमच्या जवळील अंगणवाडीची माहिती व्यवस्थित भरा व submit बटन वर क्लिक करा.
  • पूर्ण माहिती व्यवस्थित भरून एकदा फॉर्म व्यवस्थित चेक करून Submit वर क्लिक करा.

 

pradhan Mantri Matru Vandana Yojna ऑफलाइन अर्ज प्रक्रिया कशी करावी?

  • अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी अर्ज प्रक्रिया करू शकता.
  • रजिस्ट्रेशन साठी Form 1-A भरून लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांबरोबर जमा करावा.
  • रजिस्ट्रेशनच्या दरम्यान महिलांना त्यांचा आधार नंबर आणि बँक अकाउंट ची सर्व माहिती द्यावी लागेल.

pradhan Mantri Matru Vandana Yojna आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • गर्भावस्था प्रमाणपत्र
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर
  • पतीचे आधार कार्ड

दुसऱ्या बाळासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ कसा मिळेल?

  • PMMVY 2.0 अंतर्गत दुसऱ्या वेळेस या योजनेचा लाभ मुलगी झाल्यावर मिळेल.
  • दुसऱ्या बाळाच्या वेळेस मुलीचा जन्म झाला तर सहा हजार रुपये मिळतात.
  • योजनेअंतर्गत गर्भधारणा झाल्यावर सहा महिन्याच्या आत तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल.
  • अंगणवाडी केंद्र किंवा मान्यताप्राप्त हेल्थ सेंटर मध्ये याला व्हेरिफाय केले जाते.
  • मुलीच्या जन्मानंतर त्वरित या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल.

pradhan Mantri Matru Vandana Yojna अर्जाचा स्टेटस कसा चेक करावा?

  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी अर्जाचा स्टेटस चेक करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटवर जावे.
  • तिथे तुम्हाला Track Application Status वर क्लिक करावे लागेल.
  • तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर किंवा बेनिफिशरी नंबर टाका. Captcha Code टाकून Validate वर क्लिक करा.
  • त्यानंतर अर्जाची पूर्ण माहिती तुमच्यासमोर येईल.

FAQS:

  1. pradhan Mantri Matru Vandana Yojna हेल्पलाइन नंबर काय आहे?
    प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी हेल्पलाइन नंबर 011-23382393 आहे.
  2. गर्भपात किंवा मृत बाळाला जन्म दिल्यानंतर या योजनेसाठी अर्ज करू शकता का?
    होय, जर गर्भपात किंवा मृत मुलाला जन्म दिला असेल तर दुसऱ्यांदा गर्भवती झाल्यानंतर त्यास पहिल्यांदा काउंट केले जाईल.

Leave a Comment