Rail Kaushal Vikas Yojana:10वी च्या तरुणांसाठी फ्री ट्रेनिंग आणि नोकरीची एक मोठी संधी! आजच अर्ज करा!

Rail Kaushal Vikas Yojana:

भारतामध्ये बेरोजगारीच्या समस्येला सोडवण्यासाठी आणि तरुणांना रोजगार देण्यासाठी Rail Kaushal Vikas Yojana या योजनेची सुरुवात केली आहे. ही योजना भारतीय रेल्वे द्वारे राबवली जाते. त्याचबरोबर दहावीच्या पास झालेल्या तरुणांना मोफत कौशल प्रशिक्षण दिले जाते.
या योजनेचा मुख्य उद्देश तरुणांना वेगवेगळ्या टेक्निक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार आणि स्व रोजगारासाठी तयार करणे. ही योजना खास करून अशा तरुणांना एक चांगली संधी देते जे उच्च शिक्षण घेऊ शकले नाही परंतु त्यांना करिअर करायचे आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या योजने संबंधित सूचना 6 जानेवारी 2025 ला दिली होती व 10 जानेवारी 2025 दरम्यान अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती. इच्छुक उमेदवार 23 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकत होते. या पोस्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

रेल कौशल्य विकास योजना – युवकांच्या स्वप्नांना गती देणारी योजना

भारतीय रेल्वे ही केवळ देशाची जीवनवाहिनी नाही, तर ती लाखो लोकांना रोजगाराची संधी देखील देते. आजच्या युगात केवळ शिक्षण असून भागत नाही, तर व्यावसायिक कौशल्य देखील असणे अत्यावश्यक आहे. हे लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने “रेल कौशल्य विकास योजना” (Rail Kaushal Vikas Yojana) ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.

ही योजना म्हणजे केंद्र सरकारच्या ‘कौशल्य भारत’ अभियानाचा एक भाग असून, देशातील तरुणांना विविध तांत्रिक कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनवण्याचा उद्देश आहे.

Rail Kaushal Vikas Yojana ठळक मुद्दे

योजनेचे नाव Rail Kaushal Vikas Yojana
पात्रता 10वीं पास
वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष
ट्रेनिंगचा काळ तीन आठवडे
वेगवेगळ्या टेक्निक एसी मेकॅनिक वेल्डिंग इलेक्ट्रिकल कारपेंटरी इत्यादी
ट्रेनिंग फी पूर्ण पद्धतीने मोफत
जॉबची गॅरंटी नोकरीची गॅरंटी नाही परंतु कौशल प्रमाणपत्र भेटणार
आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, हायस्कूल मार्कशीट, फोटो
प्रशिक्षण महीना फरवरी 2025
अर्जाचे माध्यम ऑनलाइन
ऑनलाइन अर्जाची सुरुवात  10 JAN, 2025
शेवटची तारीख  23 JAN, 2025
प्रशिक्षण काळ 3 सप्ताह (18 दिन)
Apply Online 👉 येथे करा
अधिकृत website 👉 येथे पहा

Women Supervisor Recruitment 2025: 20531 पदांसाठी होणार भरती,जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया!

What is the Rail Kaushal Vikas Yojana?

Rail Kaushal Vikas Yojana ही एक सरकारी योजना आहे. जी तरुणांना वेगवेगळ्या प्रकारचे मोफत प्रशिक्षण देते. ही योजना प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश तरुणांना रोजगाराचे योग्य कौशल्य देणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे आहे. या योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण पद्धतीने मोफत आहे. उमेदवारांना जेवण आणि राहण्याची व्यवस्था स्वतः करावी लागेल.

Rail Kaushal Vikas Yojana लाभ

या योजनेअंतर्गत तरुणांना काही प्रकारचे फायदे दिले जातात:

  • मोफत प्रशिक्षण तरुणांना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागत नाही.
  • प्रमाणपत्र
    प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सरकारद्वारे प्रमाणपत्र दिले जाईल.
  • व्यावसायिक कौशल्य टेक्निक ट्रेड मध्ये व्यावसायिक कौशल्यात विकास केला जाईल.
  • रोजगाराच्या संधी प्रमाणपत्रामुळे नोकरी भेटण्याची संभावना वाढते.
  • स्वरोजगार प्रशिक्षणामुळे रोजगारा तयार केले जाते.

Rail Kaushal Vikas Yojana पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे

पात्रता:

  • उमेदवार हा दहावी पास असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराची वयोमर्यादा ही 18 ते 35 च्या दरम्यान पाहिजे.

आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. दहावीचे मार्कशीट
  3. आय प्रमाणपत्र
  4. पासपोर्ट साईज फोटो
  5. मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र

ट्रेनिंग मधील ट्रेड्स:

या योजनेमध्ये खाली दिलेल्या ट्रेडर्सचे प्रशिक्षण दिले जाते:

  • एसी मेकॅनिक
  • वेल्डिंग
  • इलेक्ट्रिकल
  • कारपेंटरी
  • मशिनीष्ट
  • इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक
  • कॉम्प्युटर ऑपरेशन

How to Apply for Rail Kaushal Vikas Yojana?

या योजनेमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण पद्धतीने ऑनलाईन आहे. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स ला फॉलो करा:

  • अर्जदारांनी या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
  • होम पेजवर आल्यानंतर Apply here किंवा अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा.
  • नवीन अकाउंट बनवण्यासाठी Sign Up यावर क्लिक करा.
  • रजिस्ट्रेशन फॉर्म ला काळजीपूर्वक भरा आणि सबमिट करा.
  • रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लॉगिन डिटेल्स भेटतील.

अर्जाचा फॉर्म भरा

  • रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर पोर्टलवर लॉगिन करा.
  • अर्जाचा फॉर्म काळजीपूर्वक वाचून भरा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • शेवटी अर्जाचा फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट आऊट घ्या.

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रिया उमेदवारांच्या दहावीच्या अंकांवर आधारित आहे. त्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाते आणि निवड झालेल्या उमेदवारांना ट्रेनिंग सेंटरवर बोलावले जाते. ट्रेनिंग मध्ये कमीत कमी 75 टक्के उपस्थिती अनिवार्य आहे.

योजनेचे वैशिष्ट्ये:-

रेल कौशल्य विकास योजनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:

  1. पूर्णतः मोफत प्रशिक्षण: या योजनेत सहभाग घेणाऱ्या उमेदवारांना कोणताही शुल्क आकारला जात नाही.

  2. शासनमान्य प्रमाणपत्र: प्रशिक्षणानंतर नॅशनल रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्फत शासनमान्य प्रमाणपत्र दिले जाते.

  3. कौशल्याधारित प्रशिक्षण: प्रशिक्षण प्रॅक्टिकल आधारित असून, उद्योग क्षेत्राशी सुसंगत आहे.

  4. राष्ट्रीय स्तरावर केंद्र: देशभरातील 75 पेक्षा जास्त रेल्वे प्रशिक्षण केंद्रांमध्ये हे प्रशिक्षण दिले जाते.

  5. अल्पकालीन कोर्स: 3 आठवड्यांचा, म्हणजे सुमारे 18 दिवसांचा हा कोर्स असून त्यात 100 तासांचे प्रशिक्षण असते.

Rail Kaushal Vikas Yojana इतर आवश्यक माहिती

  • उपस्थिती 75 टक्के असणे गरजेचे आहे.
  • लेखी परीक्षेमध्ये 55% आणि इतर परीक्षांमध्ये 60% अंक आणणे आवश्यक आहे.
  • या योजनेमध्ये आरक्षण गरजेचे नसते.
  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या प्रशिक्षणाच्या आधारावर रेल्वे खात्यामध्ये नोकरी मिळण्याचा दावा करता येत नाही.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू करण्याची तारीख 08 मार्च 2025
अर्जाची शेवटची तारीख 21 मार्च 2025
मेरिट लिस्ट ची तारीख 22 मार्च 2025
अर्ज करण्यासाठी Apply Here

यशोगाथा:-

या योजनेतून प्रशिक्षण घेतलेले अनेक तरुण आज स्वतःचा व्यवसाय करत आहेत किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये नोकरी करत आहेत. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशातील एका तरुणाने इलेक्ट्रिशियन कोर्स करून स्वतःचा सर्व्हिस सेंटर सुरू केला आहे, तर महाराष्ट्रातील एका युवतीने वेल्डिंग प्रशिक्षण घेऊन इंडस्ट्रियल कंपनीत नोकरी मिळवली आहे.

Disclaimer:

Rail Kaushal Vikas Yojana एक वास्तविक सरकारी योजना आहे. जी भारतीय रेल्वे द्वारे राबवली जाते. या योजनेच्या नोकरीची गॅरंटी नसते, परंतु प्रशिक्षण प्राप्त केल्यानंतर तरुणांना रोजगारा चे कौशल्य प्राप्त होते. अर्ज करण्याआधी सर्व नियमाने अटी काळजीपूर्वक वाचा.

Rail Kaushal Vikas Yojana ही योजना भारतातील तरुणांना सशक्त बनवण्यासाठी आणि त्यांच्या करिअरला एक नवी दिशा देण्यासाठी चांगले संधी घेऊन येत आहे. या योजनेमध्ये भाग घेऊन तरुण त्यांच्या कौशल्याचा विकास करू शकता व रोजगाराच्या नवीन संधी प्राप्त करू शकता. आम्ही आशा करतो की आमची पोस्ट तुमच्यासाठी उपयोगी ठरली असेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी अंतिम तारखेच्या आधी अर्ज करा.

Leave a Comment