Ramai Awas Yojana Maharashtra : रमाई आवास योजनेसाठी मिळवा 2.50 लाख रुपये

Ramai Awas Yojana Maharashtra:

नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबांना मोफत घरे देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली रमाई घरकुल योजना ही एक महत्त्वाची योजना आहे. राज्यामधील ज्या नागरिकांजवळ राहायला स्वतःचे घर नाही किंवा ते कच्च्या पडक्या घरात राहतात अशा कुटुंबांसाठी या योजनेअंतर्गत मोफत घराचे वाटप करण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व नवबौद्ध या प्रवर्गातील नागरिकांना राहायला स्वतःचे घर उपलब्ध करून देणे व महाराष्ट्र राज्याला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणे हा या योजनेमागील उद्देश आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आपल्या देशामध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची संख्या जास्त असल्यामुळे राहायला स्वतःचे घर नसलेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ते इकडे तिकडे भटकत असतात. रस्त्याच्या कडेला झोपडी बांधून राहतात तसेच आर्थिक दृष्ट्या कमजोर असल्यामुळे स्वतःचे घर बांधण्यासाठी सक्षम नसतात व त्यांना स्वतःच राहत घर नसल्यामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो. या सर्व गोष्टींचा विचार करून राज्यातील गरीब वर्गाला आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने रमाई घरकुल योजना सुरू केली.

Ramai Awas Yojana Maharashtra आढावा:

 

योजनेचे नाव Ramai Awas Yojana Maharashtra
विभाग ग्रामविकास व गृहनिर्माण विभाग
राज्य महाराष्ट्र
लाभार्थी महाराष्ट्रातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नऊ बौद्ध वर्ग त्याचबरोबर गरीब कुटुंब
योजनेचा उद्देश गरिबांना घरे उपलब्ध करून देणे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन/ ऑफलाइन

 

हे पण वाचा : Pradhanmantri Pik Vima Yojana : सरकार 1 रुपयांत पीक विमा योजना बंद करण्याचा विचार का करतंय?

 

Ramai Awas Yojana Maharashtra उद्दिष्टे:

  • महाराष्ट्र राज्यातील ज्या नागरिकांना राहायला स्वतःचे घर नाही ते रस्त्याच्या कडेला कच्ची पडकी झोपडी बांधून राहतात अशा कुटुंबांना रमाई घरकुल योजनेअंतर्गत खरे उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे.
  • गरीब व दुर्बळ वर्गाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे.
  • गरीब कुटुंबांना या योजनेअंतर्गत स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी सशक्त तसेच आत्मनिर्भर बनवणे.
  • योजनेचा उद्देश गरिबांना घरी बांधण्यासाठी आणि सुधारण्यासाठी आर्थिक सहाय्य आणि समर्थन देऊन झोपडपट्टी मुक्त भारत निर्माण करणे आहे.

Ramai Awas Yojana Maharashtra वैशिष्ट्ये:

  • रमाई घरकुल योजना ज्याला RAY(Ramai Awas Yojana) म्हणूनही ओळखले जाते.
  • या योजनेअंतर्गत च्या व्यक्तींची घरे कच्ची आहेत अशा कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाते.
  • रमाई आवास योजना ही विधवा महिलांसाठी घरकुल योजना या नावाने देखील ओळखण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची क्रमाने निवड करण्यात येते.
  • शौचालय बांधण्यासाठी शौचालय अनुदान योजनेअंतर्गत 12 हजार रुपयांची मदत केली जाते.
  • या योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळवण्याकरता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती बौद्ध जातीच्या प्रवर्गांमधील जे अपंग लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील नाहीत व त्यांची अपंगत्व 40 पेक्षा अधिक आहे व त्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत आहे असे अपंग लाभार्थी योजनेच्या इतर अटी पूर्ण करीत असल्यास त्यांना रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ मिळवता येऊ शकतो.
  • महाराष्ट्र राज्यातील काही बेघर नागरिकांकडे स्वतःच्या मालकीची जागा नसल्यामुळे त्यांना रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ घेणे अशक्य होते त्यासाठी केंद्र शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेच्या माध्यमातून जागा खरेदी करण्यासाठी पन्नास हजार रुपये निधी उपलब्ध केला आहे जेणेकरून लाभार्थ्यास जागा घेऊन त्या जागेवर घरकुल योजनेतील स्वतःचे घर बांधता येईल.

Ramai Awas Yojana Maharashtra लाभार्थी:

  • महाराष्ट्र राज्यात राहणारी आर्थिक दृष्ट्या दुर्बल व्यक्ती ज्यांच्याजवळ राहायला स्वतःचे घर नाही अशी व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.
  • जी व्यक्ती गरीब असून स्वतःचे घर बांधायला समर्थ नाही अशा व्यक्तींना पण या योजनेअंतर्गत मदत करण्यात येते.
  • रमाई घरकुल योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती व बौद्ध प्रवर्गातील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • झोपड्यांमध्ये राहणारे कुटुंबसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

 

सर्व साधारण क्षेत्रासाठी घर बांधण्यासाठी 1.3 लाख रुपये अनुदान
शहरी भागासाठी घर बांधकामासाठी 2.5 लाख रुपयांची आर्थिक मदत
डोंगराळ भागासाठी 1.42 लाख रुपये अनुदान
शौचालय बांधण्यासाठी 12,000/- रुपयांची तरतूद
लाभार्थ्यास 90 दिवसांचा रोजगार दरमहा 18,000/- रुपये

 

Ramai Awas Yojana Maharashtra आवश्यक कागदपत्रे:

 

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदान कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र
  • BPL प्रमाणपत्र
  • अर्जदार विधवा असेल तर पतीची मृत्यू प्रमाणपत्र
  • घर टॅक्स पावती
  • असेसमेंट पावती
  • पासपोर्ट साईज फोटो
  • जन्म दाखला किंवा शाळेचा दाखला
  • या आधी शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नाही याचे हमीपत्र
  • कुटुंबाचे उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक

Ramai Awas Yojana Maharashtra ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया

  • अर्ज करण्यासाठी सर्वात आधी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे.
  • तुमच्यापुढे होम पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमची नगरपंचायत निवडायची आहे.
  • त्यानंतर तुम्हाला रमाई घरकुल योजनेवर क्लिक करायचे आहे.
  • तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमची सर्व माहिती जसे की तुमचे नाव, लिंक, तुमची जन्मतारीख, इमेल इत्यादी टाकायचे आहे.
  • सर्व माहिती भरून झाल्यावर सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
  • तुम्हाला लॉगिन वर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकून रमाई घरकुल आवास योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमची सर्व विचारलेली माहिती भरायची आहे व आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करायचे आहेत.
  • त्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा.
  • अशाप्रकारे तुम्ही या योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकता.

ऑफलाइन अर्जाची पद्धत:

  • अर्जदाराने आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालय नगरपालिका कार्यालय यामध्ये जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
  • अर्जात विचारलेले सर्व माहिती योग्य प्रकारे भरून आवश्यक अशी कागदपत्रे अर्जाला जोडून जमा करावी.

Leave a Comment