Saksham Scholarship Yojana 2025:
Saksham Scholarship Yojana 2025 योजना विशेष करून अपंग विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश अपंग विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय करणे.या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षाला पन्नास हजार रुपयांची मदत केली जाते. त्याचा उपयोग ते शिक्षणामध्ये होणाऱ्या खर्चात करू शकतात. ही योजना भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाने चालू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हा अपंग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळवून देणे. जेणेकरून ती विद्यार्थी आपले स्वप्न पूर्ण करू शकतील व आपल्या आयुष्यात काहीतरी सफल करू शकतील.ही योजना केवळ आर्थिक दृष्टीने मदत करत नसून ती अपंग विद्यार्थ्यांसाठी एक सकारात्मक वातावरण तयार करण्यास मदत करते. जेणेकरून हे विद्यार्थी आपली क्षमता ओळखू शकतील आणि त्यातून पुढे जाऊ शकतील.
या योजनेअंतर्गत मान्यता प्राप्त कॉलेजमध्ये शिकत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना दरवर्षाला 50 हजारापर्यंत ची रक्कम स्कॉलरशिपच्या रूपामध्ये दिली जाईल. या रकमेच्या मदतीने ते विद्यार्थी त्यांची कॉलेजची फी आणि शिक्षणासाठी लागणारी सामग्री खरेदी करू शकतील. या योजनेच्या माध्यमातून असे विद्यार्थी ज्यांच्या परिवाराची आर्थिक स्थिती चांगली नाही व ते उच्च शिक्षण प्राप्त करू इच्छित असाल तर त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे. देशामध्ये राहणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण ग्रहण करून त्यांची स्वप्न साकार करण्यास ही योजना अत्यंत मदत करते.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार द्वारे विद्यार्थ्यांच्या हितामध्ये नवनवीन योजनेची सुरुवात केली जाते. केंद्र सरकार द्वारे एक अजून योजना सुरू होत आहेत. ज्याच्या माध्यमातून देशातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण प्राप्त करण्यास सहायता मिळेल. या योजनेच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दरवर्षाला 50 हजारापर्यंतची स्कॉलरशिप रक्कम प्रदान केली जाते. जे विद्यार्थी या योजनेच्या पात्रतेला पूर्ण करतील ते सर्व ऑनलाइन माध्यमातून योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकतात. या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या शिक्षणास खूप मोठी मदत मिळेल.
Saksham Scholarship Yojana 2025 आवश्यक माहिती:-
योजनेचे नाव | Saksham Scholarship Yojana 2025 |
लाभार्थी | अपंग विद्यार्थी |
आर्थिक सहाय्यता | 50000 वर्षाला |
राज्य | महाराष्ट्र |
कालावधी | 4 वर्ष (डिग्री) /3 वर्ष (डिप्लोमा) |
अर्जाची प्रक्रिया | ऑनलाईन |
पात्रता | जो लाभार्थी 40% पेक्षा जास्त अपंग असेल आणि 8 लाख पेक्षा कमी उत्पन्न असेल. |
विभाग | शिक्षण मंत्रालय भारत सरकार |
Saksham Scholarship Yojana 2025 योजनेचे लाभ:-
Saksham Scholarship Yojana 2025 योजनेअंतर्गत अपंग विद्यार्थ्यांना वर्षाला पन्नास हजाराची रक्कम दिली जाते. ही रक्कम लाभार्थी कॉलेजच्या फी साठी किंवा कम्प्युटर विकत घेण्यासाठी ,वह्या, पुस्तके खरेदी करण्यासाठी वापरू शकतो.
ही योजना विशेष करून अशा विद्यार्थ्यांसाठी आहे. जे तंत्रज्ञानामध्ये शिक्षण घेऊ इच्छितात जेणेकरून त्यांना चांगले करिअर मिळेल.
ह्या योजनेचा उद्देश अपंग विद्यार्थ्यांमध्ये एक सकारात्मक वातावरण तयार करणे.जेणेकरून हे विद्यार्थी स्वतःमधील क्षमता ओळखू शकतील व त्याचा विकास करू शकतील.
हे पण वाचा उच्च शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती पहा सविस्तर !
Saksham Scholarship Yojana 2025 पात्रता:-
या योजनेसाठी अर्ज करताना काही पात्रता निर्धारित केली आहेत ते बघूया.
- अर्जदार लाभार्थ्याचे अपंग असल्याचे प्रमाण हे 40% पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिग्री किंवा डिप्लोमा चे शिक्षण घेत असणे आवश्यक आहे.
- या योजनेसाठी अर्ज करणारा विद्यार्थी भारताचा रहिवासी पाहिजे.
- विद्यार्थ्यांच्या कुटुंबामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीला नसावा.
- विद्यार्थ्याने कोणत्याही मान्यताप्राप्त असलेल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेले असणे गरजेचे आहे.
Saksham Scholarship Yojana 2025 अर्ज प्रक्रिया:-
या योजनेसाठी अर्ज करताना प्रक्रिया ही सरळ सोपी आणि ऑनलाईन पद्धतीने आहे.
- सर्वात आधी विद्यार्थ्याने शासकीय अधिकृत वेबसाईटवर जावे व त्यानंतर “नवीन रजिस्ट्रेशन” वर क्लिक करावे.
- सर्व माहिती व्यवस्थित वाचावी व “चालू ठेवा” या बटन वर क्लिक करावे.
- अर्जाचा फॉर्म भरत असताना आवश्यक माहिती व्यवस्थित भरावी. जसे नाव मोबाईल नंबर जन्मतारीख इत्यादी.
- अर्जदाराने स्वतःची बँक माहिती व्यवस्थित भरावी.
- ओळखीचा पुरावा देताना आधार कार्ड किंवा बँक खाता नंबर व्यवस्थित निवडावे व अपलोड करावे.
- अर्जदाराने सर्व माहिती व्यवस्थित परत वाचावी व सबमिट बटन वर क्लिक करावे. त्यानंतर विद्यार्थ्याला आयडी आणि पासवर्ड प्राप्त होईल.
- भेटलेल्या आयडी आणि पासवर्ड चा वापर करून लाभार्थ्याने लॉगिन करावे आणि आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावी. जसे अपंग प्रमाणपत्र, आय कार्ड ,आधार कार्ड.
Saksham Scholarship Yojana 2025 योजनेसाठी लागत असलेले आवश्यक कागदपत्रे:-
- आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र
- आय प्रमाणपत्र
- नुकतेच दिलेल्या परीक्षेचा रिझल्ट
- फी भरल्याची पावती
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक पासबुक
- दिव्यांग प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- रेशन कार्ड
हे पण वाचा उच्च शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती पहा सविस्तर !
Saksham Scholarship Yojana 2025 निष्कर्ष:-
Saksham Scholarship Yojana 2025 ही योजना अपंग विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे जी त्यांना उच्च शिक्षण घेण्यास मदत करते.
या योजनेमुळे अपंग विद्यार्थ्यांच्या आजूबाजूला एक सकारात्मक वातावरण तयार होते. ही योजना अपंग विद्यार्थ्यांना नुसती आर्थिकच मदत करत नसून त्यांना मानसिक दृष्ट्या पण खूप मदत होते. त्यामुळे अपंग विद्यार्थी स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यास तत्पर होतील.
Saksham Scholarship Yojana उद्देश
Saksham Scholarship Yojana 2025 सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे असे विद्यार्थी चे दिव्यांग असताना सुद्धा उच्च शिक्षण घेऊ इच्छितात त्या सगळ्यांना मान्यताप्राप्त कॉलेजमध्ये दाखला देण्यासाठी पाच लाख पर्यंत स्कॉलरशिप राशी दिली जाणार आहे.त्याच्या मदतीने ती विद्यार्थी त्यांची कॉलेज फी आणि शिक्षण सामग्री खरेदी करू शकतात .दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याची कामना करताना केंद्र सरकार या योजनेची सुरुवात करत आहेत.या योजनेचा अर्ज करणारे विद्यार्थी हे भारताचे निवासी पाहिजे
Disclaimer : Saksham Scholarship Yojana 2025 योजना नेमकी कशाबद्दल आहे हेच यामध्ये सांगितले आहे योजनेची पात्रता व योजनेबद्दल जाणून घेण्यासाठी त्या संबंधित अधिकाऱ्यांना अवश्य भेट द्या.