Sheli Palan Yojana 2025 मिळणार अनुदान! लवकरच अर्ज करा!

Sheli Palan Yojana 2025:

महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रामीण भागात जोडधंदा म्हणून शेळी पालन व्यवसाय केला जातो. पशुपालनामध्ये नागरिक शेळ्या, मेंढ्या, म्हैस व गाय यांसारखे पशु पाळून त्यांच्या निघणाऱ्या दुधावर ते स्वतःचा व कुटुंबाचा उदर निर्वाह करतात. ग्रामीण भागामध्ये असे बरेचसे लोक राहतात. त्यांना दुधाच्या धंद्यासाठी गाय व म्हैस पाळणे शक्य होत नाही. असे लोक दूध धंद्यासाठी शेळी व मेंढ्या पाळतात. शेळ्या व मेंढ्या पाळण्यामध्ये प्रामुख्याने धनगर समाज अग्रेसर आहे. त्यांच्या तुलनेत इतर समाजातील लोक हे एवढे जास्त प्रमाणात शेळ्या मेंढ्यांचे पालन करत नाहीत. शेतकरी मोजक्या शेळ्या पाळतात. शेतकरी शेती बरोबरच शेळीपालन चा व्यवसाय करतात. शेती व इतर जोडधंदा बरोबरच शेळीपालन हा प्रमुख व्यवसाय मानला जातो. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी Sheli Palan Yojana 2025 चालू केली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अनुदानाच्या माध्यमातून शेतकरी पशुपालनाचा व्यवसाय उत्तम प्रकारे करू शकतात. या योजनेद्वारे भरपूर अनुदान मिळाल्यामुळे शेतकरी कमी भांडवलामध्ये जास्त पशु पाळू शकतात. शेळीपालन या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला सरकारद्वारे 75 टक्के अनुदान दिले जाते व नागरिकाला स्वतःच्या खिशातून 25 टक्के भरून शेळ्या विकत घेऊन घेता येऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्याला या योजनेतून खूप फायदा मिळतो.

Sheli Palan Yojana 2025 या योजनेमुळे शेतकऱ्याचे आर्थिक मदत होते. हाच या योजने पाठीमागचा शासनाचा उद्देश आहे. तसेच जे नवीन नागरिक किंवा तरुण वर्ग या व्यवसायामध्ये उतरण्यासाठी इच्छुक आहे त्यासाठी एक सुवर्णसंधी आहे आणि तेही शेळीपालन योजनेचा लाभ घेऊ शकतात.

हे वाचा ->गाय गोठा योजना ! शेतकऱ्यांसाठी खुशखबर! लवकरच अर्ज करा.

Sheli Palan Yojana 2025 आवश्यक माहिती:-

योजनेचे नाव Sheli Palan Yojana 2025
योजनेची सुरुवात 25 मे 2019
राज्य महाराष्ट्र
सुरुवात कोणी केली महाराष्ट्र सरकार
अनुदान 75 टक्के ते 50 टक्के
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी
अर्जाची पद्धत ऑफलाइन/ ऑनलाईन

 

शेळीपालन योजनेच्या माध्यमातून जे बांधव अनुसूचित जाती जमाती मध्ये मोडतात .अशा नागरिकांना 75 टक्के अनुदान मिळते व जे खुला प्रवर्गात शेतकरी येतात त्यांना 50 टक्के पर्यंत अनुदान मिळते.
या अनुदानाच्या माध्यमातून शेतकरी शेळ्यांची खरेदी करू शकतात.
अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांसाठी 75 टक्के अनुदान येते. त्यात शेतकऱ्याला 25% स्वतः रक्कम भरावी लागते व सामान्य प्रवर्गातील शेतकऱ्याला 50 टक्के अनुदान मिळते. त्या शेतकऱ्याला स्वतः 50 टक्के खर्च करावा लागतो.
जे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करणार आहे. त्यांच्याकडे जमीन असणे आवश्यक आहे. कारण अनुदान अंतर्गत मिळालेल्या शेळ्यांचे पालन पोषण करण्यासाठी त्यांना गोठा करण्यासाठी शेतकऱ्याकडे पुरेसे जमीन असणे आवश्यक आहे.

Sheli Palan Yojana 2025 योजनेची उद्दिष्टे:-

शेतकऱ्यांना इतर व्यवसायासोबत शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
राज्यातील पशुपालन करणाऱ्या नागरिकांची परिस्थिती सुधारणे. ज्या नागरिकांची किंवा शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशा लोकांना शेळी पालन योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत देणे.
शेळी पालनच्या माध्यमातून शेतकऱ्याला शेतीवरच अवलंबून राहावे लागणार नाही शेतकरी शेळीपालन हा जोडधंदा करून उदरनिर्वाह करू शकतो.
राज्यातील सुशिक्षित बेरोजगार असलेल्या तरुणांना शेळी पालन व्यवसाय हा खूपच लाभदायी ठरू शकतो.
तरुणांनी या व्यवसायात उतरणे हाच सरकारचा उद्देश आहे.

Sheli Palan Yojana 2025 आवश्यक कागदपत्रे:-

1. आधार कार्ड
2. पॅन कार्ड
3. रेशन कार्ड
4. रहिवासी दाखला
5. ई-मेल आयडी
6. मोबाईल नंबर
7. उत्पन्नाचा दाखला
8. बँक पासबुक
9. जात प्रमाणपत्र
10. दारिद्र्य रेषेचा दाखला
11. 7/12 आणि 8 अ

वर दिलेली सर्व कागदपत्रे अर्जदार नागरिकाकडे असणे आवश्यक आहे.

हे पण वाचा ! तरुणांसाठी अत्यंत महत्वाची बातमी मिळणार 25 लाखांपर्यंत कर्ज

Sheli Palan Yojana 2025 ऑनलाइन अर्ज कसा भरावा:-

Sheli Palan Yojana 2025 या योजनेसाठी अर्जदार ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. परंतु तुम्ही ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करा कारण ऑफलाइन पद्धतीने अर्ज केल्यास त्या अर्जाची प्रोसेस लवकरात लवकर होते. जर तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास तुम्ही तुमच्या गावातील सीएससी केंद्राला भेट द्या.

ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट असल्यामुळे तुम्हाला स्वतःला खूप अडचण येऊ शकतात नागरिकांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरणे गरजेचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरताना कृषी विभागाच्या वेबसाईटवरून शेळीपालनाचा अर्ज डाऊनलोड करावा व तो अर्ज व्यवस्थित रित्या भरून त्यासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे जोडून तो अर्ज तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा करावा. अर्ज जमा झाल्यानंतर अर्जाची पडताळणी होईल व त्यानंतर शेळी पालन चे अनुदान मंजूर होईल. अर्ज भरताना काही अडचण आल्यास तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत विचारपूस करून माहिती घेऊ शकता. तसेच तुम्ही भरलेल्या अर्जांपैकी तुमची नावे आले की नाही ते अधिकृत वेब साईट वर जाऊन तपासा.

Leave a Comment