Talathi Bharti Maharashtra 2025:
तलाठी भरती संदर्भात मोठा अपडेट समोर आला आहे. तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकाऱ्यांची एकूण 1700 पदे रिक्त आहेत. ही पदे लवकरच भरली जाणार असून त्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. फक्त वित्त विभागाची मान्यता मिळताच ती रिक्त पदे भरली जाणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या राज्यातील उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच खुशखबर मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य मध्ये 2023 झाली तलाठी पदांसाठी भरती करण्यात आली होती. त्यावर्षी एकूण 4793 पदांची जाहिरात काढण्यात आली होती. त्यामध्ये 4212 उमेदवारांना राज्यभरात नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे जाहिरातीपैकी 943 तलाठी पदांच्या जागा रिक्तच राहिल्या. त्याशिवाय त्या व्यतिरिक्त ही 757 पदे रिक्त आहेत. अशी सर्व मिळून तब्बल 1700 पदे रिक्त असून ती भरावी लागणार आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या वतीने आता प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या लेखी उत्तरात आमदार दाते यांना कळवले आहे.
राज्यात एकूण 1700 तलाठी पदे भरली जाणार असल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना डिसेंबर शेवटपर्यंत ही आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. 2023 सालच्या तलाठी पदभरतीच्या परीक्षा आयोजनातील गैरप्रकार आणि नियुक्तीवेळी पेसा क्षेत्रातील पदांच्या भरतीच्या उमेदवारांवरून राज्यातील 13 जिल्ह्यात समस्या निर्माण झाली होती. पण न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतिक्षित असलेल्या शासनाने पेसा क्षेत्रातील मित्रांना अकरा महिन्यांसाठीचे नियुक्तीच्या आदेश दिले आहेत. त्यामुळे निर्णयानुसार या उमेदवारांची पुढील नियुक्ती बाबत निर्णय होईल.
राज्यात तलाठ्यांची पदे रिक्त असल्याबाबत
राज्यामध्ये महसूल विभागात तलाठी भरती संदर्भात मोठा अपडेट समोर आला आहे. तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकाऱ्यांची एकूण 1700 पदे रिक्त आहेत. ही पदे लवकरच भरली जाणार असून Talathi Bharti Maharashtra 2025 3000 पदे रिक्त असून त्यापैकी 2471 पदे तलाठ्यांची असल्याचे दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी निदर्शनास आले आहे.
तसेच सातबारा, शेतसारा वसुली करणे, गारपीट पंचनामे करणे नैसर्गिक आपत्ती रेतीवर देखरेख करणे व निवडणुकीची सर्व कामे ही तलाठ्यांनाच करावी लागतात.
तसेच सध्या एका तलाठ्याकडे तीन-चार गावांचा अतिरिक्त भार असल्यामुळे तलाठ्यांना व नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.
2018-19 मध्ये तलाठी भरती झाली. त्यानंतर कोरोनामुळे दोन वर्षे लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमुळे तसेच न्यायालयीन प्रकरणांमुळे भरती रखडली होती. 2023-24 मध्ये भरती पुन्हा सुरू झाली. सरळसेवेने 208 तसेच अनुकंपाच्या माध्यमातून अंदाजे 28 पदे भरली. त्यानंतर अजूनही भरती घेण्यात आली नाही. मात्र नवीन आकृती बंधानुसार तलाठी भरती होण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात तलाठ्यांची एकूण 654 पदे मंजूर आहेत. त्यातील 619 तलाठ्यांची भरती झाली आहे. राहिलेले 35 पदे अजूनही रिक्त आहेत. इतर जिल्ह्यांचा विचार करता सोलापूर जिल्ह्यात तलाठ्यांच्या कमी जागा रिक्त आहेत.
हे पण वाचा : MPSC Group B Bharti 2025 : सरकारी नोकरीसाठी 282 पदांची भरती सुरू!
Talathi Bharti Maharashtra 2025 important documents:
- आधार कार्ड
- पदवी प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- सही
परीक्षा कधी होणार?
डिसेंबर महिन्यापर्यंत ही आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी आत्ताच अभ्यासाला पुन्हा जोरदार सुरुवात करणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक खूप मोठी सुवर्णसंधी आहे. सतराशे पदांची भरती झाल्यामुळे अनेक तरुणांना सरकारी सेवे देण्याची संधी मिळेल.
नाशिक जिल्ह्यासाठी खास संधी(Talathi Bharti Maharashtra 2025)
या भरती प्रक्रियेमध्ये नाशिक जिल्ह्यातील रिक्त जागाही भरल्या जाणार आहेत. मागच्या भरतीतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनाही नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे अनेक उमेदवारांची स्वप्न पूर्ण होणार आहेत. नाशिक जिल्ह्यामधील 2023 सालच्या भरतीमध्ये 173 पदांची भरती करण्यात आली होती. यामध्ये बिगर पेसा आणि पेसा क्षेत्रातील उमेदवारांना नियुक्तीच्या आदेश दिले होते.
How To Apply Online For Talathi Bharti Maharashtra 2025:
- सर्वात आधी तुम्हाला महसूल आणि वनविभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- वेबसाईट ओपन केल्यानंतर होम पेजवर तलाठी सरळ सेवा भरती 2025 ऑनलाइन अर्ज या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर ऑनलाईन अर्ज या लिंक वर क्लिक करा.
- तुम्हाला तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा लागेल. अर्ज भरताना तुमच्याकडे स्वतःचे Gmail account असणे आवश्यक आहे.
- सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा.
- अर्ज हा व्यवस्थित सबमिट झाल्यावर त्याची एक प्रत तुमच्या Gmail account वर पाठवली जाईल.
- ही प्राप्त झालेली अर्जाची प्रत प्रिंट करून तुम्हाला मुलाखतीच्या वेळी प्रिंट केलेल्या अर्जाचा उपस्थित राहावे लागेल.
FAQS : Talathi Bharti Maharashtra 2025 वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- Talathi Bharti Maharashtra 2025 तलाठी भरतीसाठी अर्ज कुठे करायचा?
महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत भरती पोर्टलवर किंवा संबंधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावर अर्ज करायचा असतो. अधिकृत जाहिरातीमध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाते. - अर्ज करण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता काय पाहिजे?
तलाठी पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेची पदवी असणे गरजेचे आहे. - तलाठी भरती अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा काय आहे?
साधारणपणे खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष आणि मागासलेल्या प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्ष अशी वयोमर्यादा असते. याबद्दलची अचूक माहिती जाहिरातीमध्ये उपलब्ध असते. - तलाठी परीक्षेमध्ये किती गुण असणे आवश्यक असते?
तलाठी परीक्षेसाठी एकूण 200 गुणांसाठी शंभर प्रश्न विचारले जातात. यात मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे विषय सामील आहे. - Talathi Bharti Maharashtra 2025 तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप कसे असते?
या परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि भौतिक चाचणी या विषयांवर प्रश्न असतात आणि परीक्षाही ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते. - तलाठी भरती या परीक्षेमध्ये अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
तलाठी भरती चा अर्ज करताना पदवी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, सही आणि ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे लागतात.