Vihir Anudan Yojana :
महाराष्ट्र शासन राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा यासाठी विविध योजनांची सुरुवात करत असते. राज्य शासनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सुरू करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत. त्या योजनेचे नाव आहे Vihir Anudan Yojana. या योजनेला ‘मागेल त्याला विहीर योजना‘ या नावाने देखील ओळखण्यात येते.
आपल्या महाराष्ट्र राज्यातील बरेच शेतकरी पैशाच्या अभावी शेतात विहीर करण्यासाठी समर्थ नसतात त्यामुळे या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये विहीर खोदण्यासाठी शासनाकडून चार लाखाचे अनुदान देण्यात येते. जेणेकरून शेतकऱ्यांना शेती पिकासाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल.
आपल्या राज्यांमधील बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नसते त्यामुळे ते शेती क्षेत्राकडे लक्ष देताना दिसत नाहीत. शेती पिकासाठी विहिरी मधून पाण्याची उपलब्धता केली जाऊ शकते परंतु आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असल्यामुळे शेतकरी शेतात विहीर खोदण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांचा या समस्यांचा विचार करून राज्य सरकारने विहीर अनुदान योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मागील काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्याने मनरेगाच्या योजनेतून प्रत्येक कुटुंब लखपती करण्याचा निर्धार केला आहे. भूजलाच्या सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजून 387500 विहिरी खोदणे शक्य आहे. मनरेगा अंतर्गत या विहिरी लवकरात लवकर खोदल्या गेल्यास तर त्यातून उपलब्ध पाण्याचा वापर ठिबक किंवा तुषार सिंचन लावून मोठ्या संख्येने शेतकरी पिके काढू शकतो.
हे पण वाचा : Maharashtra Govt Jobs for 12th Pass: 12वी पास उमेदवारांसाठी महाराष्ट्रातील 8 सरकारी नोकऱ्या!
Vihir Anudan Yojana उद्देश:
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाण्याची उपलब्धता व्हावी या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
- गरीब शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे.
- शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे .
- राज्यातील शेतकऱ्यांची दारिद्र्य संपविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- राज्यातील शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी अनुदान उपलब्ध करून त्यांना आत्मनिर्भर बनवणे.
- राज्यातील शेतकऱ्यांना मागील त्याला विहीर अनुदान योजनेचा सहाय्याने विहीर खोदण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देऊन त्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे त्याचबरोबर राज्यातील इतर नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे.
- शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाण्याचा मुख्य स्रोत उपलब्ध करून देणे.
- Vihir Anudan Yojana या योजनेच्या सहाय्याने शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल बनवणे.
- राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी पाण्याची चिंता करण्याची आवश्यकता भासू नये तसेच पाण्याच्या टंचाई पासून मुक्तता करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असलेल्या शेतकऱ्यांना शेतात विहीर खोदण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणाकडून व्याजाने कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
Vihir Anudan Yojana लाभ:
- मागेल त्याला विहीर अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील दुर्बल शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी चार लाखांचे आर्थिक अनुदान देण्यात येते.
- राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होईल.
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाण्याचा स्रोत मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास मदत होईल.
- या योजनेच्या मदतीने शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळेल.
- राज्यातील शेतकरी शेती व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित होतील तसेच इतर नागरिक शेती व्यवसाय करण्यासाठी आकर्षित होतील.
- या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून देते त्यामुळे शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी पैशांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही कोणाकडून जास्त व्याजदराने पैसे उधार घेण्याची गरज येणार नाही.
Vihir Anudan Yojana विहीर कोठे खोदावी सविस्तर माहिती!
- दोन नाल्यांच्या मधील क्षेत्रामध्ये व नाल्यांच्या संगमा जवळ जिथे मातीचा किमान 30 सेंटिमीटरचा थर व किमान पाच मीटर खोलीपर्यंत मऊ भिजलेला खडक आढळतो तिथे विहीर खोदावी.
- नदी व नाल्याजवळील उथळ गाळाच्या प्रदेशात विहीर खोदावी.
- दमट वाटणाऱ्या किंवा असणाऱ्या जागेत.
- नदी किंवा नाल्याच्या गोलाकार वळणाच्या आतील भूभागात.
- जमिनीच्या सखल भागात जिथे झिजलेला खडक आढळतो.
Vihir Anudan Yojana विहीर कोठे खोदू नये?
- भूपृष्ठावर कडक खडक दिसणाऱ्या जागेत.
- जिथे डोंगराचा कडा व त्याजवळ दीडशे मीटरच्या अंतरावर विहीर खोदू नये.
- मातीचा थर 30 सेंटिमीटर पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात.
- विहीर खोदताना खाली काळा खडक पाषाण लागल्यास मशीन वापरून पुढील खोदकाम करता येते मात्र त्याने खर्च वाढतो. त्यामुळे पुढील खोदकाम न करता त्या विहिरीचे खोदकाम तेथेच बंद करून पंचनामा करून पूर्णत्वाचे दाखले घ्यावे. 14 क मध्ये नमूद केल्याप्रमाणे अंदाजपत्रकात मंजूर केलेल्या खोली इतके काम करू नये एखाद्या विहिरीत पाणी लागले नसल्यास विहीर निष्पळ ठरवण्यात यावी.
Vihir Anudan Yojana महत्त्वाची माहिती:
- विहीर अनुदान योजनेला मागेल त्याला विहीर अनुदान योजना या नावाने देखील ओळखण्यात येते.
- या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना अर्ज करताना कुठल्या समस्यांचा सामना करण्याची आवश्यकता येणार नाही.
- विहीर अनुदान योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाइन केली गेली आहे जेणेकरून अर्जदार घरबसल्या आपल्या मोबाईलच्या सहाय्याने अर्ज करू शकेल व त्याला कुठल्या सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता येणार नाही त्यामुळे त्याचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
- विहीर अनुदान योजना अंतर्गत राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घेता यावा याकरिता महाराष्ट्र शासनाने गावात मंजूर करण्यात येणाऱ्या विहिरींची संख्यांची अट ही रद्द केली असून जास्तीत जास्त लोकांना या योजनेअंतर्गत लाभ मिळता येणार आहे.
- या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे व त्यांना आर्थिक पाठबळ देणे.
- या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल त्यामुळे योजनेत घोटाळा होण्याची शक्यता नसेल.
- या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व जाती-धर्माच्या शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे.