Vihir Anudan Yojana 2025:
Vihir Anudan Yojana या योजनेविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत जर तुम्हाला पण विहीर अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दल माहिती तसेच कोणकोणती कागदपत्रे आणि प्रक्रिया काय असेल याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहे.
या योजनेबद्दल संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये दिली आहे त्यामुळे पोस्ट पूर्ण वाचा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल.
विहीर अनुदान योजना(Vihir Anudan Yojana 2025) महाराष्ट्र सरकारची योजना आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना विहीर खोदण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी सरकारकडून अनुदान दिले जाते.
Vihir Anudan Yojana
विहीर अनुदान योजनेचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे विहीर निर्मितीसाठी किंवा दुरुस्तीसाठी सरकारमार्फत अनुदान दिले जाते. ही विहीर अनुदान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत इंजिनिअरिंग कामे विहिरीच्या बांधकामासाठी लागणारे आवश्यक साहित्य तसेच खर्चाप्रमाणे डिझाईन या पद्धतीची आर्थिक मदत सरकारकडून दिली जाते.
Vihir Anudan Yojana 2025 पात्रता
विहीर अनुदान योजनेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अटी आहेत. विहीर बांधायची असल्यास त्याचा अंदाज निर्माण करण्याचे ठिकाण, उपलब्ध असलेले शेत जमीन आणि विहिरीची लागणारे रक्कम अशा प्रकारच्या विविध घटकांचे वर्णन करून सरकार मार्फत विहीर अनुदान योजनेविषयी रक्कम निश्चित करण्यात येते.
जर या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर याविषयी संपूर्ण माहिती आपण आपल्या ग्रामपंचायत मधून घेऊ शकता. तसेच याची तपशील माहिती,अर्ज प्रक्रिया, अर्जाची शेवटची तारीख तसेच योजनेच्या संबंधित असणाऱ्या विभागाविषयी संपूर्ण माहिती ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे. याबद्दल तुम्ही लाभ घेऊ शकता.
- विहीर अनुदान योजना( Vihir Anudan Yojana 2025) ही महाराष्ट्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली शेतकऱ्यांसाठी ची अत्यंत महत्त्वाची योजना आहे.
- या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे विहिरीची मांडणी विकास करणे, तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करून देणे.
- या उद्देशाने विविध अनुदान योजना सुरू करण्यात आले असून या योजनेच्या अंतर्गत वित्तीय मदत सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Vihir Anudan Yojana Maharashtra 2025 ! नवीन विहिरीसाठी पाच लाख रुपये अनुदान! लवकरच अर्ज करा!
विहीर अनुदान योजना( Vihir Anudan Yojana 2025) निष्कर्ष
विहिरीचा विकास करणे:
विहीर अनुदान योजनेमुळे विहिरीचा विकास आणि सुधारणा करण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होते तसेच ग्रामीण भागातील विविध विकासासाठी अनुदान देणे या सरकारची योजना सुरू करण्यामागचे उद्दिष्ट आहे.
विहिरींची सुरक्षितता सुधारण्यास मदत करणे:
विहीर अनुदान योजना सुरू केल्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विहिरींची अवस्था सुधारण्यास मदत झालेली आहे.तसेच सुरक्षितता प्रदान करण्यात आलेली आहे.या योजनेमुळे सर्वात मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे कारण विहिरींमुळे पाण्याचा साठा वाढेल पाण्याची टंचाई कमी होईल. शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामोर करण्याची वेळ येणार नाही.
विहीर अनुदान योजनेचे (Vihir Anudan Yojana) महत्त्व :
विहीर अनुदान योजना या योजनेचे महत्त्व म्हणजे विहिरींची सुरक्षितता वाढवणे ,विहिरींचा विकास करणे आणि विहिरींची स्वच्छता ठेवणे, विहिरींचे प्रमाण वाढवणे ,विहिरींची भूजल पातळी वाढवणे ,विहिरींची स्वच्छता ठेवणे अशा प्रकारचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र सरकारने विहीर अनुदान योजनेची सुरुवात केली आहे.
लाभार्थ्यांची निवड:
- विहीर अनुदान योजनेअंतर्गत आधार कार्ड साठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम यांच्या अंतर्गत प्रवर्गासाठी प्रधान्यक्रमाने वीर सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असते.
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- भटक्या जमाती
- दारिद्र्यरेषेखालील कुटुंब
विहीर अनुदान योजनेचा प्रभाव:
शेती क्षेत्राचे आधुनिकरण :विहिरींच्या माध्यमातून सिंचन सुविधा उपलब्ध झाल्याने शेतकरी शेती पद्धतीचा अवलंब करू शकतील. यामुळे शेती आधुनिकरण होण्यास मदत होईल.
उत्पादन वाढ: नियमित सिंचन सुविधांमुळे पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल. त्यामुळे शेतकरी विविध प्रकारची पिके घेऊ शकतील आणि त्यांचे उत्पन्न वाढू शकेल.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल:
या योजनेमुळे ग्रामीण भागात रोजगारांच्या संधी निर्माण होतील विहीर खोदायी, बांधकाम, देखभाल सारख्या कामांमधून स्थानिक लोकांना रोजगार मिळेल.
या योजनेतून कशासाठी किती पैसे मिळतात?
1.नवीन विहिरीसाठी अडीच लाख: नवीन विहीर प्रति लाभार्थी अनुदान मर्यादा 2लाख 50 हजार रुपये आहे.
2. विहीर दुरुस्तीसाठी 50 हजार रुपयांची अनुदान:
जुनी विहीर दुरुस्तीसाठी जास्तीत जास्त 50 हजार रुपये शासनाकडून अनुदान मिळतात.
Vihir Anudan Yojana 2025 आवश्यक कागदपत्रे:
विहीर अनुदान योजनेसाठी लागणारे कागदपत्रे ही खालील प्रमाणे आहेत:
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड उत्पन्नाचा दाखला
- बँक खात्याचा तपशील
- 7/12 उतारा
- पासपोर्ट फोटो
Vihir Anudan Yojana 2025 योजनेची वैशिष्ट्ये:
- योजनेची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन आहे त्यामुळे शेतकऱ्याला वेगवेगळ्या सरकारी कार्याला जाण्याची गरज येणार नाही.
- शेतकऱ्याचा वेळ आणि पैसा दोघांची पण बचत होईल.
- या योजनेचा Online अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
- महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी या योजनेचा फायदा होईल कारण शेतकरी विहिरीमुळे जास्तीत जास्त उत्पन्न काढू शकतील त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांचे बँक खाते मध्ये खाते असणे आवश्यक आहे कारण या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाचे पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटी द्वारे जमा होईल.
Vihir Anudan Yojana 2025 अर्जासाठी आवश्यक अटी
- अर्ज करणारा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
- महाराष्ट्र बाहेरील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्जदार व्यक्ती ही शेतकरी असणे आवश्यक आहे .
- त्याची शेतजमीन ही योग्य असणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत अर्ज करताना शेतात विहीर असता कामा नये.
- या शेतकऱ्याने योजनेअंतर्गत अर्ज केला आहे अशा शेतकऱ्याचे कुठले राष्ट्रीयकृत बँक खाते असणे आवश्यक आहे तसे बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे.
- अर्जदार शेतकऱ्यांनी या योजने व्यतिरिक्त कुठल्याही विहीर योजना शेततळे योजना किंवा सामूहिक शेततळे योजना यामध्ये अर्ज केलेले नसावा.
- या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्याकडे 0.40 हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक आहे.
- शेतात ज्या ठिकाणी विहीर करायचे आहे त्या ठिकाणापासून कमीत कमी 500मीटर परिसरामध्ये दुसरी विहीर असता कामा नये.
- अर्जदार शेतकऱ्यांच्या 7/12 वर यापूर्वी विहिरीची नोंद नसावी.