Voter Id Card Download Online:
नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही सायबर कॅफेमध्ये न जाता किंवा बिना लॅपटॉप व कम्प्युटरच्या मदतीने स्वतःच्या मोबाईल ने वोटर आयडी कार्ड डाऊनलोड करू इच्छित असाल. तर ही पोस्ट तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल. या पोस्टमध्ये आम्ही सविस्तरपणे मोबाईल नंबर वरून वोटर आयडी कार्ड कसे डाउनलोड करायचे याबद्दल सांगितले आहे. जेणेकरून तुम्ही सोप्या पद्धतीने तुमचे कार्ड डाऊनलोड करू शकता.
मतदार ओळखपत्र ज्याला (EPIC) इलेक्शन फोटो आयडेंटिटी कार्ड म्हणूनही ओळखले जाते.हे भारतीय निवडूणूक आयोगाने(ECI) मतदानासाठी पात्र असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना जारी केलेले फोटो ओळखपत्र आहे.मतदार ओळखपत्राचा उद्देश मतदारांसाठी ओळखीचा पुरावा म्हणून काम करणे,कार्यक्षमता वाढवणे आणि मुक्त आणि निष्पक्ष लोकशाही निवडणुकांत दरम्यान फसवणूक रोखणे हा आहे.हे कार्ड मुख्यतः निवडणूक ओळखपत्र मतदार ओळखपत्र म्हणूनही ओळखले जाते.
वोटर आयडी डाऊनलोड करण्यासाठी तुमच्याजवळ EPIC नंबर किंवा रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.या माहितीच्या मदतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरून वोटर आयडी कार्ड डाऊनलोड करू शकता.
Voter Id Card Download Online महत्त्वाची माहिती:
पोस्टचे नाव | Voter Id Card Download Online |
पोस्टचा प्रकार | सरकारी सेवा |
माध्यम | मोबाईल |
प्रक्रिया | या पोस्टला पूर्ण वाचा. |
हे पण वाचा:Land Registry New Rules 2025: जमीन रजिस्ट्री नियमांमध्ये झालेले चार मोठे बदल!
मतदार ओळखपत्रासाठी ऑफलाईन अर्ज कसा करावा?
- जवळच्या राज्य निवडणूक कार्यालयाला भेट द्या आणि फॉर्म 6 ची विनंती करा.
- आवश्यक तपशीलांस फॉर्म 6 भरा.
- भरलेला फॉर्म6 फोटो आणि सहाय्यक कागदपत्रांसह निवडणूक कार्यालयात सबमिट करा.
मतदार ओळखपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे:Voter Id Card Download Online
मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे सबमिट करणे आवश्यक आहे:
- ओळखीचा पुरावा
- पत्त्याचा पुरावा
- जन्मतारखेचा पुरावा
- फोटो
Voter ID Card Eligibility:Voter Id Card Download Online
मतदार ओळखपत्र साठी पात्र होण्यासाठी व्यक्तीने खालील निकष पूर्ण केले पाहिजेत:
- भारतीय नागरिक
- 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे असावे
- कायमचा पत्ता असणे आवश्यक आहे.
How to download voter Id card
आता तुम्ही बिना कम्प्युटर वर लॅपटॉपचे फक्त तुमच्या मोबाईलच्या मदतीने वोटर आयडी कार्ड डाउनलोड करू शकता.यासाठी तुम्हाला काही सोप्या ऑनलाईन स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
1.सर्वात आधी रजिस्टर करा
- सर्वात आधी तुम्ही नॅशनल वोटर सर्विस पोर्टल(NVSP) च्या अधिकृत वेबसाईटवर जावे.
- वेबसाईटच्या होम पेजवर “Search in Electoral Roll”या पर्यायावर क्लिक करा.
- आता तुमच्यापुढे एक नवीन पेज ओपन होईल त्यात तुम्ही “Search by mobile” यावर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर नवीन फॉर्म उघडेल.
2.मोबाईल नंबर टाकून ओटीपी टाका:
- आता तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि ओटीपी व्हेरिफिकेशन करावे लागेल.
- प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुमचे वोटर आयडी बद्दलची माहिती स्क्रीनवर दिसेल.
3. वोटर आयडी डाऊनलोड करा:
- आता तुम्हाला या “View Details”पर्यावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमचं वोटर आयडी कार्ड स्क्रीनवर दिसेल.
- खाली दिलेल्या “Print”या पर्यावर क्लिक करा आणि वोटर आयडी कार्ड डाउनलोड करा.
या पद्धतीने स्टेप्स ला फॉलो करून तुम्ही तुमच्या मोबाईल नंबर च्या मदतीने वोटर आयडी कार्ड डाउनलोड करू शकता आणि त्याचा फायदा घेऊ शकता.
Voter Id Card Download Online important links:
Download – electoralsearch.eci.gov.in
Official website – voters.eci.gov.in
मतदार ओळखपत्र हे भारतातील वैयक्तिक ओळखपत्राचा स्वीकृत प्रकार आहे.कारण ते सरकारी संस्थेद्वारे जाहीर केले जाते मतदार ओळखपत्रात खालील तपशील असतात:
- एक अनुक्रमांक
- कार्डधारकाचे छायाचित्र
- संबंधित राज्य राष्ट्रीय चिन्ह असलेला होलोग्राम
- कार्ड धारकाचे नाव
- कार्डधारकाच्या वडिलांचे नाव कार्डधारकाचे लिंग
- कार्डधारकाची जन्मतारीख
- मतदार ओळखपत्राच्या मागील बाजूस कार्डधारकाचा निवासी पत्ता आणि जारी करणाऱ्या प्राधिकरणाची (निवडणूक नोंदणी अधिकारी )स्वाक्षरी आहे.
मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करण्यापूर्वी लक्षात घेण्यासारखे मुद्दे:
मतदार ओळखपत्र हा भारतीय नागरिकांसाठी आवश्यक असलेला एक महत्त्वाचा दस्तावेज आहे कारण तो त्या व्यक्तीसाठी लोकशाही निवडणुकांमध्ये मतदान करण्याचे मूलभूत कर्तव्य बजावण्या सक्षम करतो मतदार ओळखपत्र ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणूनही काम करतो येथे काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात:
- अर्जदारांचे किमान कायदेशीर वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे.
- ते सदृढ मनाचे गुन्हेगारी आरोप मुक्त असले पाहिजेत आणि आर्थिक दृष्ट्या दिवाळखोर नसावेत.
- त्यांनी फॉर्म6 भरावा आणि संबंधित कागदपत्रे प्रदान केली आहेत याची खात्री करावी.
- या उद्देशासाठी अर्जदार केवळ NVSP वेबसाईट किंवा सरकार मान्यता प्राप्त केंद्राद्वारे मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकतात.
- अर्जदाराने त्यांच्या नावाची स्पेलिंग, जन्मतारीख, पत्ता आणि इतर तपशील बरोबर असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
- अर्जदारांनाही हे देखील सुनिश्चित केले पाहिजे की दिलेली सर्व माहिती कायदेशीर रित्या योग्य आहे.
- मतदार ओळखपत्र यशस्वीरित्या प्राप्त झाल्यावर माहिती योग्य आहे की नाही हे पाहण्यासाठी अर्जदाराने त्यांच्या कागदपत्रांची आणि मतदार ओळखपत्राची पुन्हा पडताळणी करणे आवश्यक आहे.